आज अनेक देशांच्या प्रजा सुरक्षित आयुष्यासाठी, सुबत्तेसाठी आपली काही मूलभूत स्वातंत्र्ये सत्ताधीशांना बहाल करताना दिसतात. हे का घडते, हा राजकीय विचारवंतांना बराच काळ छळत आलेला प्रश्न आहे; कारण आजच्या स्थितीच्या जवळपासच्या प्रमाणांच्या आवृत्त्या पूर्वीही भेटत असत. आज सत्ताधीश आणि ते ज्यांच्यावर सत्ता गाजवतात ती प्रजा यांच्यात एक अलिखित, अघोषित करार असल्याचे दिसते. सत्ताधीश म्हणतात, “आम्ही तुम्हाला सुरक्षित, सुखवस्तू आयुष्याची हमी देतो, पण त्या मोबदल्यात तुम्हा प्रजाननांना काही स्वातंत्र्यांचा संकोच होणार, हे मान्य करायलाच हवे. खरे तर हे म्हटलेही जात नाही, पण दोन्ही पक्ष ते मानतात.
मासिक संग्रह: फेब्रुवारी, २०११
थोडेसुद्धा ‘बहु’ आहे
“शेतकीतून मिळालेले थोडेसुद्धा ‘बहु’ आहे. कारण ते थोडे झाले तरी नवीन पैदाशीचे आहे. बुद्धी विकण्याचे व्यवसाय करून धनाचे ढीग मिळवले तरी. त्यात नवीन कमाई नाही. द्रव्याचे नुसते स्थलांतर आहे. त्याने एक पिशवी भरल्याने दुसरी पिशवी रिकामी होण्यापलीकडे जगाच्या समृद्धीत भर अशी पडत नाही. परंतु शेतकऱ्याच्या कमाईच्या हरएक कणात साक्षात् लक्ष्मीचा निवास आहे. लक्ष्मी निराळी, पैसा निराळा, पैसा काय! चोरीने मिळतो, लुटीने मिळतो, सट्टेबाजीने मिळतो, लबाडीने मिळतो, तोंडपाटीलकीने मिळतो, दंडुक्याने मिळतो, राजाच्या शिक्क्याने मिळतो; आणि कशाने मिळत नाही? पण लक्ष्मींचा एक कणही मिळवण्याचे सामर्थ्य कोणत्याही पंडिताच्या तोंडपाटीलकीत नाही, कोणत्याही दांडगोबाच्या दंडुक्यात नाही किंवा कोणत्याही राजराजेश्वराच्या शिक्क्यात नाही.’
सँडेल व्याख्यानांची चिकित्सा – भाग एक
बाजार हाच आजार?
सँडेल यांची व्याख्याने आणि आसु ने ती मराठीत उपलब्ध करणे या दोन्ही घटनांचे प्रथम स्वागत करतो कारण त्यामुळे सध्या ऐरणीवर असलेल्या विषयांवर होणारी राजकीय चर्चा ही तत्त्वज्ञानात्मक व नीतिशास्त्रीय पातळीवर नेता येईल. सँडेल यांनी चर्चा अशा पातळीवर नेऊन महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. प्रथम सँडेल यांच्याशी सहमती असणारे मुद्दे सांगून नंतर सँडेल यांच्याच रोचक उदाहरणांच्या आधारे त्यांच्या भूमिकेबाबतचे आक्षेप, शंका व सँडेलने दुर्लक्षित ठेवलेले मुद्दे उपस्थित करणे असा क्रम घेत आहे. सहमतीचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.
1) जीवनाच्या सर्व अंगांमधील सर्वच समस्या, बाजार व्यवस्था या एकाच संस्थेमार्फत सुटू शकतील असे मानणे हे व्यर्थच नव्हे तर घातक आणि निषेधार्हही आहे.
शेतीसाठी जमीन आणि माती
जमीन आणि माती या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत. मराठीत बऱ्याच वेळा हे दोन शब्द आपण सहजपणे, फारसा विचार न करता एकाच अर्थाने वापरतो. आज आपण या दोन्हींचा स्वतंत्रपणे विचार करणार आहोत. उत्पादक, सुफला माती आणि जमीन ही सर्वकाळी, सर्व मानवजातीची गरज राहिलेली आहे. आपले अस्तित्वच त्यावर अवलंबून आहे आणि म्हणून त्यांची देखभाल करणे, योग्य निगा राखणे महत्त्वाचे आहे.
जमिनीची धूप हे सर्वांत मोठे अरिष्ट आहे. वारा, ऊन, पाऊस यांचे जमिनीवर सतत आक्रमण होत असते. इतके की काही ठिकाणी योग्य व वेळेवर काळजी न घेतल्याने प्रदेश उजाड झाले आहेत.
आपला देश, अन् आपलेच प्रशासन
[ राष्ट्रीय रोजगार हमी कायदा अंमलात आल्याला 2 फेब्रुवारी 2010 रोजी 5 वर्षे होतील, त्यानिमित्ताने त्या कायद्याच्या चांगल्या अंमलाचे एक उदाहरण खाली पुरवीत आहोत. प्रियदर्शन हा प्रगति अभियान, नाशिक या संस्थेचा तरुण, तंत्रसाक्षर कार्यकर्ता आहे. राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या आंध्रप्रदेशातील वापराच्या प्रत्यक्ष अभ्यासाचा हा निष्कर्ष. ]
प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सातत्याने टीका होताना आपल्याला दिसते. मीही अशी टीका करत आलो आहे. प्रशासनाकडून केलेल्या अपेक्षांची पूर्ती होत नाही आणि म्हणून शासनाचे वर्णन करताना बहुतेकदा ‘अनिच्छा’, ‘अकार्यक्षमता’, ‘उदासीनता’, ‘भ्रष्टाचार’ असे वाचायला मिळते. आपले प्रशासन ही अवाढव्य यंत्रणा आहे.
अंधश्रद्धानिर्मूलनार्थ (भाग ३)
[श्री सीताराम दातारांचे अन्धश्रद्धाविनाशाय हे विवेकवादी भूमिकेचे पद्यरूप आपण गेल्या अंकापासून क्रमशः देत आहोत. पहिल्या भागात 56 कडव्यांमधून (1) मानवाची वैशिष्ट्ये, (2) मानवांपुढील समस्या, (3) मानवाची उपाययोजना, (4) मानवाने कल्पिलेले ईश्वराचे स्वरूप, (5) ईश्वरविषयक सत्याची विस्मृती, (6) जनमानसावर ईश्वरकल्पनेचा प्रभाव, (7) सत्यवाद्यांचा पक्ष, (8) नास्तिकांच्या मतें सृष्टीतील विषमतेचे स्पष्टीकरण, (१) आस्तिकांचे कर्मसिद्धान्ताद्वारे स्पष्टीकरण, (10) नास्तिकांचा आक्षेप, (11) आस्तिकांचे उत्तर, (12) यावर नास्तिकांची प्रतिक्रिया. (अंक 21.9, डिसेंबर 2010.) हे विभाग दिले होते. दुसऱ्या भागात 54 कडव्यांमधून (13) प्रत्यक्षप्रमाण व अनुमानप्रमाण (14) प्रत्यक्षप्रमाणाविषयी शंका (15) शंकेचे निरसन (16) प्रत्यक्ष व अनुमान या प्रमाणांनी ईश्वरादि कल्पनाचे परीक्षण (17) शब्दप्रमाणपरीक्षा (18) श्रद्धा, अंधश्रद्धा व डोळस श्रद्धा (19) काही अंधश्रद्धा हे विभाग दिले होते.