एका वेगळ्या युगात ऑस्वॉल्ड स्पेंग्लरने वर्तवलेले भाकित प्रसिद्ध आहे. तो द डिक्लाइन ऑफ द वेस्ट मध्ये म्हणाला “व्यक्तिमाहात्म्य, उदारमत, लोकशाही, मानवतावाद आणि स्वातंत्र्य यांचे युग संपत आले आहे.” स्पेंग्लर नव्वदेक वर्षांपूर्वी लिहीत होता, पहिल्या महायुद्धानंतर, जर्मनीला अपमानकारक व्हर्सायच्या तहानंतर, आणि महामंदीच्या सुरुवातीच्या काळात. तो म्हणाला, ” (जनता) शरणागत भावाने बलवानांचा, सीझरांचा विजय मान्य करेल, आणि त्यांच्या आदेशांचे पालन करेल. जागतिक बाजारपेठा नव्या मंदीच्या तडाख्यात असताना आणि जुनी ‘शाश्वत’ मूल्ये खचली असताना स्पेंग्लरच्या दृष्टान्ताचे भूत परत आपल्याला पछाडणार आहे का? ” [ जॉन कँफनरच्या फ्रीडम फॉर सेल (Freedom For Sale, पॉकेट बुक्स, 2009) या पुस्तकातून. उपशीर्षक आहे. How We Made Money and Lost Our Liberty. स्पेन्सलरचे मूळ जर्मन द्विखंडात्मक पुस्तक 1918/ 1922 मध्ये प्रकाशित झाले]