गेल्या ऑक्टोबरात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष निकलस सार्कोझी म्हणाले की विकासाच्या आकडेवारीत सुख हा घटकही देशांनी धरायला हवा. यावर अर्थातच टीका झाली, कारण सार्कोझी निवडून आले तेच मुळी श्रीमंतीच्या आश्वासनांवर. फ्रेंच लोक सुट्या फार घेतात. इतरही काही खास फ्रेंच वृत्ती आहेत. आता सार्कोझी या साऱ्याला अंकबद्ध करा असे म्हणताहेत. आता सुखासारखी मोजायला अवघड संकल्पना आकडेवारीत घ्यायचा प्रयत्न करणे, हे काहीसे वचनभंगासारखे दिसत आहे. पण सार्कोझी ठोक अंतर्गत उत्पाद, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट (यापुढे GDP) या संकल्पनेवर हल्ला करत आहेत. तो निदेशक फक्त दरवर्षी किती पैशाचे देशातल्या देशात हस्तांतरण होते, हे मोजतो. आपण मात्र GDP तील वाढ हे देशाच्या एकूण सुबत्तेचे माप मानून चालतो. जर विकासाचे माप घडवायचेच आहे, तर आपल्याला अखेर काय हवे आहे ते त्या मापाचा भाग असायला हवेच ना? १९२९-१९३९ च्या महामंदीच्या शेवटीशेवटी सायमन कुझ्नेत्स या अर्थशास्त्र्याने अर्थव्यवहार मोजायला ऋलझ ही संकल्पना घडवली. त्याने स्वतःच एक इशारा दिला की “देशाची सुबत्ता (welfare) ही राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापावरून निष्पादित करता येत नाही.” इतर धोरणे ठरवणाऱ्यांनीही वेळोवेळी अर्थव्यवहार आणि सुबत्ता यांच्यात गल्लत न करण्याचे इशारे दिलेले आहेत. आज कुझ्नेत्सनंतर पाऊणशे वर्षांनी अॅलन क्रूगर म्हणतो, “आपण शत्रूच्या डोक्यावर हाणायला किती वस्तू तयार करू शकतो, याचे (काही अर्थाने) मोजमाप GDP तून होते.” क्रूगर ओबामा प्रशासनातील मोठा अर्थशास्त्री मानला जातो. तो पुढे असेही म्हणाला, “शीतयुद्धानंतर आपण सुबत्तेची इतर मापे घडवणे नैसर्गिक ठरेल.”
असे म्हणता येईल, की जे काही दुरुस्त करायला आपण पैसे खर्च करतो, ते GDP मोजते. नैसर्गिक आपत्ती, मानवी व्यवहारातून होणारे अपघात, दंगेधोपे, गुन्हेगारी, सारे GDP ला वाढवते. शेजाऱ्याला जिने चढायला मदत करणे, मुलांच्या क्रीडास्पर्धांसाठी ऑफिसला दांडी मारणे, जंगलात भटकायला जाणे, हे ऋझ शी असंबद्ध असते. GDP एखाद्या वस्तूची बाजारातली किंमत सांगते; पण ती बनवताना होणारे प्रदूषण, कार्बन उत्सर्जन, खनिजसंपत्ती आणि परिसराचा हास, हे मोजले जात नाही. १९६८ साली रॉबर्ट केनेडी GDP बाबत म्हणाला होता, “त्यात नॅपाम आणि अणुबाँब मोजले जातात. दंगे आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांत दिलेल्या चिलखती गाड्या मोजल्या जातात. काव्याचे सौंदय, विवाहबंधनाची मजबुती, चर्चाची पातळी आणि नोकरशाहीची सचोटी GDP त समाविष्ट नाही.’
बरे, ऋझ ने जे मोजायचे, तेही सुसंगत पद्धतीने मोजले जातेच असे नाही. तुम्ही घराची सफाई स्वतःच केली का? मग तुम्ही GDP वाढवला नाही. तेच काम जर सफाई कंपनीकडून करवून घेतले असते, तर GDP वाढला असता. स्वतः कोंबड्या पाळण्याने ऋझ वाढत नाही. तो वाढतो अंडी विकत घेतल्याने. पूर्वीचे तउठ आजच्या DVD प्लेअर्सपेक्षा महाग असायचे. VCR घेतल्यास GDP जेवढा वाढायचा तेवढा DVD प्लेअरने वाढत नाही. चित्र जास्त चांगले असतेही, पण GDP मात्र तितकासा वाढत नाही.
GDP ला अवास्तव महत्त्व देण्याने नुसतीच फसगत होत नाही, तर चक्क नुकसानही होते. “एखादे धोरण GDP घटवत असेल, तर ते अंमलात येत नाही.” हे मत आहे जॉन हॉलचे, जो आर्थिक सहकार व विकास संघटनेसाठी (OECD) विकासाचे नवे निदेशक शोधतो आहे.
नोबेल विजेता अर्थशास्त्री जोसेफ स्टिग्लित्झ सांगतो (GDP) वाढीवरच लक्ष केंद्रित झाल्याने आजची आर्थिक मंदी दुर्लक्षित राहिली. आर्थिक संस्थांचे तात्पुरते फायदे, वाढती कर्जे, गृहबांधणी उद्योगातल्या फुगलेल्या किंमती, सायानी मापे चुकण्याला हातभार लावला.
पण GDP सदोष असला तरी सोपा आहे. प्रत्येक देश शेजाऱ्यांशी तुलना करायला हे एक आकड्याचे माप सहज वापरू शकतो. पण जएउऊ नव्हेंबर २९ मध्ये कोरियातल्या आपल्या सम्मेलनात सुबत्तेच्या जास्त व्यापक अर्थाशी सुसंगत असे निदेशक घडवू पाहणार आहे.
भूतानने ठोक अंतर्गत सुखाची कल्पना मांडली आहे. चीनने हिरवा GDP, जो प्रदूषणाला महत्त्व देईल, वापरायचा प्रयत्न केला. ऋझ चे आकडे कोसळले. काही प्रांतांमध्ये GDP शून्यवत् झाला. २००७ साली ती संकल्पना सोडून दिली गेली.
यातून GDP ला पर्याय शोधणे किती कठीण आहे ते दिसते. सोबतच GDP किती दिशाभूल करणारे माप आहे, हेही स्पष्ट होते. चीनला घाबरवणारे आकडे एखादेवेळी त्या देशाच्या दीर्घकालीन आर्थिक तब्येतीचे खरे रूप दाखवत असतील. ठीक आहे, आज GDP ला पर्याय नाही. पण तसा पर्याय सापडेपर्यंत ऋझ वाढीला प्रगती मानणे चुकीचे आहे, हे लक्षात ठेवू या.
[ टाईम च्या (२ नव्हें. ०९) अंकातील स्टीफन फॅरिसच्या अ बेटर मेझर या लेखाचा हा संक्षेप.]