“महाराष्ट्रातील जातिसंस्थाविषयक विचार”, प्रतिमा प्रकाशन, पुणे च) ख. ते (सावरकर) असे म्हणतात की, ‘चातुर्वर्ण्याच्या किंवा जातिभेदाच्या सर्व मुख्य प्रकारांच्या मुळाशी आनुवंशिक गुणविकासाचे सर्वसामान्य असे मुख्य तत्त्व आहे हे तत्त्व ‘जनहितकारक’ असून, ‘ज्यांच्या उपकारक प्रवृत्तीच्या पुण्याईच्या वशिल्यावरच आजवर ही संस्था (=जातिभेद) जगत आली’ त्या सर्वात हे तत्व ‘खरोखरच महत्त्वाचे’ आहे असेही ते (सावरकर) सांगतात.” वसंत पळशीकर यांचा लेख, जात्युच्छेदक निबंध व सावरकरांचे अस्पृश्यता निवारक कार्य, सुमंत यशवंत, (संपा.) महाराष्ट्रातील जातिसंस्थाविषयक विचार, प्रतिमा प्रकाशन, पुणे खख. “सावरकर हे वंश व वर्णश्रेष्ठत्ववादी कसे होते त्याचा परामर्श घेताना वसंत पळशीकर म्हणतात, “काही गुण श्रेष्ठ, काही कर्मे श्रेष्ठ, अशी त्यांची धारणा कायमच होती. ज्यांच्या ज्यांच्यापाशी श्रेष्ठ गुणसंपदा, व जो जो उच्चतर कर्मे करतो तो तो श्रेष्ठ असावा. त्याच्या पदरात अधिकार, सत्ता, लाभ इत्यादी गोष्टी जास्त प्रमाणात पडाव्यात, आणि अशा गुणांची आनुवंशिक वाढ सतत करावी व ती करण्यासाठी सुजननशास्त्राच्या दृष्टीने आवश्यक त्या बंदी असाव्यातच, हा त्यांचा सिद्धान्त होता. असे गुण अनुवंशाने प्राप्त होत असतात, आणि सुजननाद्वारा ते वाढवीत नेता येतात. ही त्यांची समजूतही ठाम होती.” सुमंत यशवंत. छ) जोशी, गो. म., हिंदूंचे समाजरचनाशास्त्र, प्रकाशक – विश्वनाथ महादेव जोशी, पुणे, १९३४
I. “जन्म आणि धंदा या दोन तत्त्वाने जाती बांधली गेली असल्यामुळे आणि मुख्य भर अनुवंशावर असल्यामुळे, स्त्रीने आपल्या जातीबाहेरील पुरुषाकडून प्रजोत्पत्ती करून घेऊ नये, अशी समाजशास्त्रज्ञांची इच्छा असणे साहजिक आहे. ही जाती स्थिर ठेवण्याकरिता बालविवाह आणि अस्पृश्यता (नित्य आणि नैमित्तिक) या दोनही तत्त्वांचा फार उपयोग आहे. स्त्रीचे मन फाकण्याच्या सुमारालाच तिला सहचर निवडून दिला तर जातिसंकराकडे कमी प्रवृत्ती होईल, असे हिंदुसमाजशास्त्रज्ञांचे मत आहे.” “सुप्रजाशास्त्राचा मुख्य हेतु होतकरू सहचरांची संख्या मर्यादित करणे हा आहे. तो हेतू डोळ्यापुढे ठेवला असता, पूर्ण वाढ झालेली स्त्री समाजात वावरू लागली, तिला पूर्ण स्वातंत्र्य असले, तर ती आपल्या जातीतच विवाह करील या गोष्टीची हमी कोण देऊ शकेल ? सुप्रजाशास्त्र काही वाढलेल्या प्रत्येक स्त्रीला कळण्याइतके सोपे नाही. प्रौढविवाह, स्त्रीशिक्षण, अस्पृश्यतानिवारण वगैरे वरवर गोंडस दिसणारी, परंतु अंती नाशक अशी तत्त्वे सांगणे म्हणजे हिंदूंनी ज्या तत्त्वावर समाजरचना केली आहे. त्या तत्त्वांनाच हरताळ फासण्यासारखे आहे. अशा त-हेची मूल रचनेशी विसंगत नैतिक मूल्ये पसरविणे म्हणजे समाजसुधारणा नव्हे आणि ती पसरविणारे समाजसुधारकही नव्हेत.” III. “सृष्टीचा असा हेतू दिसून येतो की, अनंत जीव निर्माण करून त्यांतील जे कोणते परिस्थितीशी टिकाव धरून राहण्याला लायक नसतील, त्यांचा नाश करून टाकावयाचा. म्हणजे जे आपल्या बलावर जिवंत राहिले ते, अर्थातच नष्ट झालेल्या जीवपिंडापेक्षा कोणत्यातरी गुणाचे बाबतीत श्रेष्ठ असणार. या प्रक्रियेमध्ये दोन गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत. पहिली म्हणजे, जेवढ्या जीवाचे भरणपोषण करण्याइतके अन्नाच्छादन मिळत असेल त्यापेक्षा जास्त जीव उत्पन्न झाले पाहिजेत. मग त्यांच्यामध्ये जीवनार्थ कलह होऊन त्यांपैकी सबल-दुर्बलांची निवड व्हावयास पाहिजे म्हणजे सबल तेवढे शिल्लक राहतील.”
II. “ब्राह्मणांनी शेदोनशे पिढ्या बुद्धिप्रधान कामे केली असल्याकारणाने, त्यांच्यामध्ये त्या गुणाला लायक अशीच शारीर आणि मांसरचना तयार झालेली आहे आणि ती वर दाखविल्याप्रमाणे, हे तत्त्व खरे मानल्यास तीव्रत्वाला गेली असलीच पाहिजे. वैद्यकीय धंदा करणाऱ्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये वैद्यकीय ज्ञानाला लायक असेच फरक पडत जात असले पाहिजेत.”
आंबेडकर, बी.आर., अॅनिहिलेशन ऑफ कास्ट, डॉ. बा.आं. रायटिंग अॅण्ड स्पीचेस, खंड १, एज्युकेशन डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, १९७९.
झ) हबीब इर्फान, प्रीहिस्ट्री – पीपल्स हिस्ट्री ऑफ इंडिया : १, तूलिका प्रकाशन, नवी दिल्ली, २००१
बामशाद मायकेल आणि इतर यांचा लेख, जेनिटिक इव्हिडन्स जॉन द ऑरिजिन्स ऑफ इंडियन कास्ट पॉप्युलेशन्स, जिनोम रिसर्च, (जून २००१). खंड दोन, अंक सहा, पृ. ११४-१००४ . (www.genome.org) ठ) इंगळे देवेन्द्र यांचा लेख, जनुकीय संशोधन, वर्ण-जातिसमाज व मूलनिवासी बहुजनवाद, (समाजप्रबोधन पत्रिका, जुलै-सप्टेंबर २००८, अंक : १८३, पृ.२७१-२७७) व्याख्याता, पदव्युत्तर इतिहास विभाग. एम.जे.कॉलेज, जळगाव-४२५००२
IV.