सोबत दोन नकाशे आहेत, भारतातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या पावसाच्या प्रमाणांचे. कच्छ-सौराष्ट्र भागातच पाऊस सरासरीच्या जास्त झाला आहे. उत्तरप्रदेशाचा पश्चिम भाग, हरियाणा, दिल्ली या क्षेत्रांत पाऊस सरासरीच्या चाळीस टक्क्यांनाही पोचलेला नाही. ओरिसा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, गोवा, केरळ व दक्षिण कर्नाटक या क्षेत्रांत पाऊस सामान्य आहे (म्हणजे सरासरीच्या १९% वरखाली). उत्तर कर्नाटक व तामिळनाडू मात्र सहाच दिवसांच्या पावसातल्या तुटवड्याने सामान्य स्थितीतून कमतरतेच्या स्थितीत गेले. इतर सर्व देश आधी व नंतर कमतरतेच्या स्थितीत अडकलेला आहे.
याचा अर्थातच शेतीवर परिणाम होणार. नागरी पाणीपुरवठाही पुढे त्रासदायक तुटवड्यात अडकणार.
मासिक संग्रह: सप्टेंबर, २००९
पुस्तक परिचय- वेताळाच्या आरोग्यकथा
रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी लिहिलेले हे एक वेगळ्या प्रकारचे पुस्तक. “बंडखोरी करणाऱ्या व नवनिर्मितीच्या मुळाशी असणाऱ्या प्रश्न विचारण्याच्या व उपस्थित करण्याच्या प्रवृत्तीस’ ही अर्पण पत्रिकाही कुतूहल वाढवणारी आहे.
औषधशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण मिळवून मुंबईला एस्.एन्.डी.टी. विद्यापीठात २० वर्षे प्राध्यापिकी केलेल्या या लेखक महोदयांनी महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांनाही वाचा फोडली. स्त्री भ्रूणहत्येचे महाराष्ट्रातील वाढते प्रमाण, सोबतच औषधनिर्मिती व विक्रीचा बाजार, त्यात होत जाणारी रुग्णांची फसवणूक, जाणीवपूर्वक किंवा अजाणता डॉक्टर मंडळी यात का सामील होतात ; या सर्व प्रश्नांना उत्तरे शोधायचा प्रयत्न करतानाच त्यावर काही उपाय करता येतील का, हा महत्त्वाचा प्रश्न ते आपल्यासमोर मांडतात.
‘यू टर्न’च्या निमित्ताने
आनंद म्हसवेकर लिखित ‘यू टर्न’ ह्या नाटकाचा १४३ वा प्रयोग नुकताच पहिला. या नाटकाविषयी, कथानकाविषयी, प्रयोगाविषयी पूर्वी वाचलेलेच होते. त्यामुळे प्रत्यक्ष प्रयोग पाहण्याची उत्सुकता होती व तशी संधी मिळाली म्हणून ती सोडली नाही. नाटकाच्या तांत्रिक बाबींविषयी मी लिहिणार नाही कारण त्याविषयी मी पूर्णपणे अनभिज्ञ आहे. मला फक्त कथानकाविषयी व त्यात मांडणी केलेल्या समस्येविषयी काही लिहायचे आहे.
नाटकाचे कथानक म्हटले तर अभिनव आणि म्हटले तर ते तसे नाहीही. कारण यापूर्वी ह्याच कथानकाच्या आशयाचे ‘दुर्गी’ हे नाटक पाहिल्याचे मला आठवते आहे. कोणी लिहिले, कोणी दिग्दर्शित केले हे आज आठवत नाही.
विवेक आणि नीति यांच्यात विरोध?
बरोबर काय आणि चूक काय, न्याय्य आणि अन्याय्य, चांगले आणि वाईट, यांची समज किंवा ज्ञान माणसाला, उपजत बुद्धीनेच मिळतात, असे मला वाटते. जन्मानंतरच्या संस्कारांनी व शिक्षणाने या समजेत आणि ज्ञानात भर क्वचित् आणि थोडीच पडते. उलट संस्कारांनी आणि शिक्षणाने या संकल्पना पूर्णपणे उलट्या किंवा विकृत होण्याची शक्यता खूपच असते-विशेषतः धार्मिक संस्कारांनी, उदाहरणार्थ दोन शतकांपूर्वी सवर्ण हिंदूंना अस्पृश्यता, सती जाणे, विधवेचे विद्रूपीकरण या गोष्टी न्याय्य आणि बरोबरच वाटत होत्या – इतकेच नाही तर खुद्द अस्पृश्य आणि विधवा यांनादेखील या गोष्टी बरोबरच वाटत होत्या!
खेळ मांडियेला
खेळकरपणा अपरिपक्वतेचा निदर्शक आहे. इतर प्राणिमात्रांच्या तुलनेत मानवजातीच्या उत्क्रांतीत परिपक्वपणा उशीराने येणे ही एक महत्त्वाची बाब आहे. थोडक्यात म्हणजे मानव हा एक अपरिपक्व कपी (immature ape) आहे. प्रौढत्वाला पोचायला माणसाला जितका वेळ लागतो तेवढा इतर कोणत्याच कपीला लागत नाही. या विस्तारित बालपणातच आपण शिकतो आणि खेळतो. इतर कपींच्या एकूण आयुर्मर्यादेइतका वेळ आपण खेळत असतो.
इतर सस्तन प्राणी आणि पक्षीही खेळतात. वासरे, शिंगरे, शेरडे कानात वारा भरून नाचतात. कुत्री, मांजरे व त्यांचे नातलग यांची पिल्ले खोटीखोटी भांडणे करत खेळतात. अनेक प्राण्यांना माणसाळवायला एखादा सवंगडी, सोबती पुरवून खेळू देणे महत्त्वाचे असते.
हिंसेचा इतिहास
मांजर-दहन हा सोळाव्या शतकातील पॅरीसमधील मनोरंजनाचा लोकप्रिय कार्यक्रम होता. ह्या ‘खेळा’त मांजराला एका दोरीला टांगून हळूहळू खाली आगीत सोडण्यात येई. नॉर्मन डेव्हीज या इतिहासतज्ज्ञाच्या मते “मांजर जसजसे होरपळत, भाजत, जळत जाऊन अखेरीस काळे ठिक्कर पडे, तसे प्रेक्षक (ज्यात राजाराण्यांचा समावेश असे) खदाखदा हसत किंचाळ्या मारत.” परपीडनानंदाचे असे बीभत्स प्रदर्शन आजच्या काळात अतयं वाटते. माणसाच्या संवेदनशीलतेतील हा बदल, गेल्या काही शतकात हिंसेत झालेली घट, हा मानवी इतिहासातील सर्वांत महत्त्वाचा, पण दुर्लक्षित प्रवाह आहे.
हिटलर, स्टॅलिन व माओनंतरच्या शतकात व इराकच्या जखमा ओल्या असताना हिंसा उतरणीला लागल्याचा दावा करणे हा क्रूर विनोद किंवा अश्लील बाब वाटू शकते.
डार्विन आणि स्त्रीवादः संवादी शक्यता
निसर्गाविषयी भूमिका घेण्याबद्दल स्त्रीवाद्यांमध्ये बहुतांशी प्रतिकूलता आढळते. निसर्ग म्हणजे निष्क्रिय, अपरिवर्तनीय, ज्याविरुद्ध लढावे लागेल असा अडथळा – असेच चित्रण स्त्रीवादी साहित्यात दिसते. स्त्रीवादी राजकारणाचा रोखही बढेशी असाच राहिला आहे. अर्थात् मानवी किंवा सामाजिक जीवनाच्या जीवशास्त्रीय विश्लेषणाबद्दल स्त्रीवाद्यांना वाटणाऱ्या शंका अप्रस्तुत नाहीत. कारण शास्त्रज्ञांनी जीवशास्त्रीय अध्ययनांमध्ये शरीर, शारीरिक क्रिया-प्रक्रिया यांच्याविषयी मांडलेली गृहीतके, त्यांसाठी वापरलेली तंत्रे व निकष यांमध्ये अनेकदा पूर्वग्रहदूषित व अवैज्ञानिक बाबी आढळतात. विशेषतः उजवी मंडळी आपल्या मतांच्या पुरस्कारासाठी ज्या प्रकारचे विश्लेषण/अध्ययन वापरतात, त्याच्याबद्दल तर स्त्रीवाद्यांचे आक्षेप हमखास लागू पडतात. परंतु, सरतेशेवटी आपण सर्वच निसर्गाचा, जीवशास्त्राचा एक भाग असल्यामुळे निसर्ग किंवा जीवशास्त्रालाच नाकारणे कितपत योग्य ठरेल ?
कामाला लागा, तत्त्वचर्चा पुरे!
[अमर्त्य सेन यांचे द आयडिया ऑफ जस्टिस हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. त्यानिमित्ताने लेखकाने दिलेली एक मुलाखत इंडियन एक्स्प्रेस ने (८ ऑगस्ट ‘०९) प्रकाशित केली. त्यातील काही अंश असा -] प्रश्नकर्ता : हे पुस्तक आणि धोरणनिश्चिती यांतील संबंधाबद्दल तुम्ही म्हणालात की हा अभियंत्यांचा संदर्भग्रंथ (Engineer’s Handbook) नाही. सेन : तुम्हाला पूल कसा बांधावा हे या पुस्तकात सापडणार नाही – जमीन कशी, सामान कुठून आणायचे – नाही. तुम्हाला पूल किती रुंद असावा यावर कसा विचार करावा, ते इथे सापडेल; वाहतूक कश्या प्रकारची असेल ते हे सांगेल.