पुस्तक-परिचयामागील भूमिका
पैसा हा आपल्या आधुनिक जीवनाचा अतिशय महत्त्वाचा हिस्सा झाला आहे. आपले कोणतेही वैयक्तिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय किंवा सांस्कृतिक व्यवहार हे आता पैशांच्या मदतीशिवाय करता येत नाहीत. अठरा-एकोणिसाव्या शतकात नाणी वा कागदी नोटांच्या स्वरूपातला पैसा आजच्याप्रमाणे सरसकट वापरात नव्हता. अनेक आर्थिक व्यवहार हे वस्तूंच्या प्रत्यक्ष देवाणघेवाणीतून केले जात. सोन्याचांदीची नाणी चलन म्हणून वापरली जात असली तरी मुख्यत: व्यापारी लोक आणि राजेरजवाडे ह्यांच्यासाठीच त्यांचा वापर होत असे. साहजिकच आजच्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे, वस्तूचे, सेवेचे मोल पैशांत करण्याची पद्धत नव्हती. आजही अनेक गोष्टींचे मोल पैशाच्या स्वरूपात मांडलेले अनेकांना आवडत नाही आणि पैसा सामाजिक नात्यांमध्ये बाधा आणतो असे मानले जाते.
मासिक संग्रह: जून, २००९
“धक्कातत्त्व”: पुस्तक-परिचय
एखाद्या राजवटीत जाणता अजाणता झालेल्या जुलमांसाठी व अन्यायांसाठी त्या राजवटीमागच्या विचारधारेला जबाबदार धरणे योग्य की अयोग्य? बरे, सर्वच राजवटी, त्यांमागच्या विचारधारा, वगैरेंची आर्थिक अंगे महत्त्वाची असतात. कौटिल्याच्या राज्य कसे चालवावे याबाबतच्या ग्रंथाचे नाव अर्थशास्त्र असे आहे. अॅडम स्मिथच्या पुस्तकाचे नाव द वेल्थ ऑफ नेशन्स आहे. मार्क्सच्या पुस्तकाचे नाव भांडवल असे आहे. गोखले इन्स्टिट्यूटच्या नावात पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स आहे. सगळीकडे जाणवते हे, की राजवटी आणि त्यांच्या अर्थव्यवहाराच्या नीती, यांना सुटे करणे शक्य नाही.
पण राजवटींच्या आर्थिक-राजकीय विचारधारा आणि राजवटींमधले अन्याय यांची सांगड घालताना माणसे भेदभाव करतात.
दुष्टाव्याचे मूळ
दोन देशांमधील सशस्त्र संघर्षाकडे आपण भीतीने, घृणेने पाहतो. पण आर्थिक संघर्ष युद्धांपेक्षा कमी भीतिदायक किंवा घृणास्पद नसतात. युद्ध हे शल्यक्रियेसारखे असते, तर आर्थिक संघर्ष प्रदीर्घ छळासारखे असतात. त्यांचे दुष्परिणाम युद्धांबद्दलच्या साहित्यातील वर्णनांइतकेच भयंकर असतात. आपण आर्थिक संघर्षांना महत्त्व देत नाही, कारण आपल्याला त्यांच्या घातक परिणामांची सवय असते. युद्धविरोधी चळवळी योग्यच आहेत. मी त्यांना सुयश चिंततो. पण मला एक सुप्त, कुरतडणारी धास्ती वाटत राहाते, की ती चळवळ विफल होईल, कारण ती मानवी हाव, हव्यास, या दुष्टाव्याच्या मुळांना स्पर्श करणार नाही. [नॉन-व्हायलन्स ङ्कवद ग्रेटेस्ट फोर्स या महात्मा गांधींच्या पुस्तकातील हा उतारा नाओमी क्लाईन (द शॉक डॉक्ट्रिन, पेंग्विन, २००७) उद्धृत करते.]