विवेकी स्वार्थ हा कार्लचा धर्म आहे. तो मुक्त बाजारपेठेच्या वेदीवर पूजा करतो. फ्रॉईड जसे सर्व काही सुरत (Sex) आहे, असे मानायचा, तसे कार्ल सर्व सामाजिक व्यवहार, मग ते कितीही व्यामिश्र असोत, सोडवायला त्यांवर किंमतीचे लेबल लावतो, नागरी गृहसमस्या, शिक्षण. स्पर्धा आणि नफ्याची आशाच सर्व प्रश्न सोडवू शकते. मोठी थिअरी आहे, ही. सर्वांना प्रवाहातून त्यांचे त्यांचे बादलीभर पाणी घेण्यासाठी झगडू द्या, आणि त्या पाण्याचा हवा तो वापर करू द्या. काहीजण त्या पाण्यापासून वाफ बनवतील, काही पाणी पितील, काही आंघोळ करतील. उद्योजकता फोफावेल आणि लोक सुखी होतील. आपल्याला बॅल्समिक व्हिनीगर आणि मेंथॉलेटेड सिगरेटी मिळतील.
पण ‘मी’ आणि ‘माझे’ या शब्दांवर बेतलेली नैतिक-सामाजिक व्यवस्था कशी असेल? दोन वर्षांची बाळे आपले आयुष्य या शब्दांवर रचायला लागतात, व आपण नंतरची वीस वर्षे त्यांना जीवनात इतरही काही आहे, हे शिकवण्यात घालवतो. [स्कॉट टुरोच्या प्लीडिंग गिल्टी (Pleading Guilty, Scott Turow) या थ्रिलर कादंबरीतून. थ्रिलर्स ही थिल्लरच असतात, असे मानायची गरज नाही!] संपादकीय