एकोणीसशे पन्नास-साठच्या दशकात वादविवेचनमाला नावाची एक ग्रंथमाला काही घरांमध्ये दिसत असे. जॉर्ज बर्नार्ड शॉचे अॅन इंटेलिजंट वुमन्स गाईड टु कॅपिटॅलिझम, सोशलिझम एट् सेटरा (नेमके नाव जरा वेगळेही असेल!) हे पुस्तकही इंग्रजी वाचणाऱ्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात ओळखीचे असे. नंतर मात्र विनय हर्डीकरांच्या शब्दांत ‘सुमारांची सद्दी’ सुरू झाली. अभ्यास थांबला आणि अडाणी अतिसुलभीकरणे वापरात आली.
कॅपिटॅलिझम म्हणजे मुक्त बाजारपेठ किंवा पाशवी पिळवणूक, समाजवाद म्हणजे भोंगळ सद्भाव (मृणाल गोरे, डॉ लोहिया) किंवा बनेल अवसरवाद (अमरसिंग-मुलायमसिंग!), साम्यवाद म्हणजे श्रमिकांचा स्वर्ग किंवा आडमुठे लालभाई, अशी सुलभीकरणे आज वापरात आहेत.
मासिक संग्रह: जानेवारी, २००९
पत्रचर्चा –
घारपांडेना मिळालेल्या इंटरनेटवरील प्रतिक्रिया विकास देशपांडे, बोस्टन
“परमसखा मृत्यू: किती आळवावा….” लेख वाचताना मला पटकन आठवले ते भा. रा. तांब्यांचे आणि लताच्या आवाजात स्वरबद्ध झालेले सुप्रसिद्ध गीत: “नववधू प्रिया मी बावरते, लाजते पुढे सरते, फिरते. कळे मला तू प्राणसखा जरि, कळे तूच आधार सुखा जरि, तुजवाचून संसार फुका जरि… मन जवळ यावया गांगरतें”.
शाळेत या गाण्याचा अर्थ समजला की तांबे ही कविता साक्षात् मृत्यूस आपला नवरदेव आणि स्वतःस त्याची नववधू म्हणत मृत्यूस एकीकडे कवटाळण्यासाठी आतुर तर दुसरीकडे थोडे लांबूनच… अशी अवस्था वर्णन करीत आहेत.
ब्रेन डेड् की हार्ट डेड् ?
मृत्यूची बदलती व्याख्या
मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात क्यूबा येथे शेकडो नसतज्ज्ञ, वैज्ञानिक व तत्त्वज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. त्या परिषदेतील चर्चेचा मुख्य विषय होता, ‘मृत्यूची व्याख्या’. जीवन व मरण यांच्यातील सीमारेषा दिवसेंदिवस अस्पष्ट व धूसर होत असल्यामुळे आता तो गंभीर चर्चेचा विषय होऊ पाहात आहे, व ती सीमा आखणे ही एक मोठी समस्या मानली जात आहे. या समस्येचा उदय सुमारे ४० वर्षांपूर्वी झालेला असून मेंदू पूर्णपणे निकामी वा मृतवत् झाल्यानंतरसुद्धा कृत्रिमपणे श्वासोच्छ्वास व हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या व्हेंटिलेटर्सचा शोध या समस्येला कारणीभूत ठरला आहे.
वाहतूक सेवांची वाढ
दीर्घकालीन वार्षिक वाढ/विकास अल्पकालीन वार्षिक वाढ/विकास
काळ १९९०/९१ ते २००३/०४ वार्षिक% काळ२००२/०३ ते २००३/०४ वार्षिक%
रस्त्यांची लांबी “ १.७ “ ०.७
ट्रक्सची संख्या ,, ८.१ “ ८.४
बसेसची संख्या ,, ६.७ ,, ६.६
वाहनांची विक्री २००२/०३ ते २००६/०७ २००५/०६ ते २००६/०७
क) कार-जीप “ १८.७ “ २२.०
ख) मध्यम भारवाहक “ १९.८ “ २२.६
ग) जड भारवाहक “ २४.८ “ ३२.८
घ) दुचाकी ,, ११.९
ङ) तिचाकी “ १४.९ “ १२.२
रेल्वे १९९०/९१ ते २००५/०६ २००४/०५ ते २००५/०६
क) टन-किमी मालवाहतूक ७.९
ख) प्रवासी-किमी वाहतूक ६.९
ग) टन-किमी भाडे ,,
घ) प्रवासी-किमी भाडे ,,
विमान वाहतूक २००५/०६ ते२००६/०७
क) प्रवासी २८.२
ख) माल
लोकसंख्या १९९०-२००८ १.७८
२००७-२००८ १.३२
[आधारः स्टॅटिस्टिकल आऊटलाइन ऑफ इंडिया २००७-०८ टाटा सर्व्हिसेस लि.
नका देऊ मला इतक्या दूर बाबा
बाबा, नका देऊ मला इतक्या दूर
जिथं मला भेटायला यायला
तुम्हाला घरातील बकऱ्या विकाव्या लागतील.
नका करू माझं लग्न त्या देशात
जिथं माणसापेक्षा जास्त
ईश्वरच राहतात.
नसतील जंगल नदी डोंगर
तिथं नका करू माझी सोयरीक
जिथल्या रस्त्यांवरून
मनापेक्षाही जास्त वेगाने धावतात मोटारी,
आहेत जिथं उंच उंच घरं आणि
मोठ मोठी दुकानंच नुसती
त्या घराशी नका जोडू माझं नातं
जिथं मोठं मोकळं अंगण नाही
कोंबड्याच्या आरवण्यानं होत नाही
जिथली सकाळ अन् संध्याकाळी मावळणारा सूर्य दिसत नाही.
नका निवडू असा वर
जो पारावर अन् गुत्त्यात असेल कुंबलेला
सतत कामचुकार, ऐदी
जो चतुर असेल जत्रेत पोरी फिरविण्यात
असा वर नका निवडू माझ्यासाठी.
फक्त हवा उपभोग, नवा नवा उपभोग
या वर्षीचे केंद्रीय अंदाजपत्रक दूरदृष्टीचे नव्हते. त्यात जगापुढील नव्या, परिणामांनी भीषण आणि एकमेकांशी निगडित अशा आह्वानांचा विचार नव्हता. अन्नाच्या किंमती वाढत जाणार भारतातही त्या वाढताहेत आणि जगात अनेक ठिकाणी अन्नासाठी दंगे झाले आहेत. दुसरे म्हणजे खनिज तेलाच्या किंमती वाढत जाणार मध्ये त्या बॅरलला १४० डॉलर्सला गेल्या होत्या. सध्या उतरल्या आहेत, पण कधीही चढू शकतात. तिसरे अंग आहे जागतिक हवामानबदलाचे पाण्याच्या तुटवड्याने पिकांची उत्पादकता घटते आहे. अकाली पाऊस व त्याच्याशी निगडित नैसर्गिक आपत्ती वाढताहेत. आणि चौथी बाब अमेरिकाप्रणीत जागतिक मंदी, ही.
कंपन्या, बँका बुडताहेत.
हवामानबदलाचे नीतिशास्त्र
हवामानबदलाबाबत आपण काय करावे, हा नैतिक प्रश्न आहे. विज्ञान, त्यात अर्थशास्त्रही आले, हे आपल्याला हवामानबदलाची कारणे आणि परिणाम सांगू शकेल. आपण काय केल्याने काय होईल, हेही विज्ञान सांगू शकेल. पण काय करणे इष्ट आहे, हा मात्र नीतीच्या क्षेत्रातला प्रश्न आहे.
अशा प्रश्नांच्या विचारी उत्तरांत वेगवेगळ्या मानवसमूहांच्या इच्छा-आकांक्षांमधल्या संघर्षांचा विचार करावा लागतो. जर हवामानबदलाबाबत काही करायचे असेल तर आजच्या माणसांपैकी काहींना (विशेषतः सुबत्ता भोगणाऱ्यांना) त्यांच्यामुळे होणारी हरितगृहवायूंची (यापुढे GHG उर्फ ग्रीनहाऊस गॅसेस) उत्सर्जने कमी करावी लागतील नाहीतर भावी पिढ्यांना सध्यापेक्षा गरम जगात भकास जिणे जगावे लागेल.
एक क्रान्ती : दोन वाद (भाग १)
प्रस्तावना:
इसवी अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत जगातील बहुतांश माणसे शेती व पशुपालन ह्यांवर जगत असत. त्यांच्या जीवनपद्धतीचे वर्णन अन्नोत्पादक असे केले जाते. त्यामागील राजकीय-आर्थिक-सामाजिक व्यवस्थेचे वर्णन सामंती , फ्यूडल (feudal) असे केले जाते. अठराव्या शतकाच्या मध्यावर मात्र एक नवी जीवनपद्धती उद्भवली. आधी इंग्लंडात उद्भवलेली ही पद्धत पुढे युरोप, अमेरिका, आशिया, आफ्रिका, अशी पसरत आज जगाच्या बहुतेक भागांपर्यंत पोचली आहे. आजही जगातली अनेक माणसे शुद्ध अन्नोत्पादक जीवनपद्धतीने जगतातच, पण बहुसंख्येचे बळ मात्र नव्या औद्योगिक जीवनपद्धतीने जगणाऱ्यांकडेच आहे.
औद्योगिक जीवनपद्धतीचा उद्भव औद्योगिक क्रांती, The Industrial Revolution, या आर्नल्ड टॉयन्बीने सुचवलेल्या नावाने ओळखला जातो.
पर्यायांचा ‘निष्फळ’ शोध
जर भांडवलवादाला व्यवहार्य पर्याय असता, तर आजचे संकट जास्त गंभीर होणे शक्य होते. असे म्हणता येईल, की १९३०-४० मधील स्थिती यामुळेच महामंदी ठरली. सोविएत यूनियन तेव्हा अ-भांडवलवादी पद्धतीने औद्योगिकीकरण करत होती, राज्य-समाजवादी अर्थव्यवस्थेने. भांडवलवादी औद्योगिक देशांत सबळ समाजवादी चळवळी होत्या, आणि त्या व्यवस्थाबदल करू पाहत होत्या. १९८० तील राज्य-समाजवादी व्यवस्थांच्या पतनाने आणि समाजवादी चळवळी क्षीण होण्याने ते पर्याय आज शिल्लक नाहीत.
जगभरात भांडवलवादच प्रभावी असल्याने त्या व्यवस्थेला पर्याय शोधणे निष्फळ आहे. पर्यावरणी आपत्ती वगळता कोणतेही अंतिम संकट’ दृष्टिपथात किंवा कल्पनेतही नाही.