सध्या नॉन-गव्हर्नमेंटल संस्था, स्वयंसेवी संस्था, स्थानिक कृतिगट वगैरे बहुविध नावांच्या लक्षावधी संस्था जगभर बहरत आहेत. आफ्रिका, आशिया व लॅटिन (दक्षिण) अमेरिका यांच्यातील सर्व देश या संस्थांमध्ये मुरून गेले आहेत, कारण या संस्थांना प्रचंड आंतरराष्ट्रीय आर्थिक साहाय्य व प्रायोजकीय आधार मिळत आहे.
या संस्था आपण अडचणींनी ग्रस्त अशा नववसाहतवादी जागतिक व्यवस्थांमध्ये ‘जनवादी’ पर्याय पुरवतो आहोत असे सांगतात. प्रागतिक शक्तींची जागतिक पातळीवरील पीछेहाट, हिशेबी प्रॉपगँडा व मूलभूत विचारधारा असल्याचा आभास यांतून हे घडत आहे. यांचे खरे ध्येय मात्र लोकलढ्यांना न्यायाधारित समाजरचनेसाठीच्या सुयोग्य राजकीय वाटांपासून ढळवणे, हाच आहे.
[पी. जे. जेम्सच्या नॉन-गव्हर्नमेंटल व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स: द टू मिशन (मास-लाईन प्रकाशन, केरळ, १९९५) या पुस्तकातील हे एन्जीओं विरोधी मत!]