दिवाने सर्व जीवसृष्टी निर्माण केली, ती उत्क्रांतीतून विविधतेत परिवर्तित झाली नाही, या मताला रचनावादी, क्रिटाशनिस्ट मत म्हणतात. परंपरेने ते मत ख्रिस्ती धर्मावर श्रद्धा असणाऱ्यांमध्ये दिसते, पण इतर धर्मांवर श्रद्धा असणाऱ्यांनाही ते मान्य असते.
आजकाल आपण पारंपरिक धर्मश्रद्धाळू रचनावादी नाही असे दाखवत काही जण इंटेलिजंट डिझाइनवादी नावाचे एक मत मांडतात. पृथ्वीवरील जीवसृष्टी कोण्या तरी बुद्धिमान जीवाने किंवा शुद्ध बुद्धीने योजनाबद्ध रीतीने घडवली, ती उत्क्रांतीतून घडलेली नाही, असे हे इंटेलिजंट डिझाइनवादी मत आहे. परग्रहांवरील काही जीवांनी पृथ्वीवर जीवसृष्टी पेरली असणे, या कल्पनेभोवती इं.डि.वाद्यांचा युक्तिवाद बेतलेला असतो.]
परग्रहावरचे जीव जर पृथ्वीवर येऊन पोचले, तर आपण त्यांच्यापुढे लोटांगण घालून त्यांची ‘देव’ मानून पूजा करू का? आपल्या सूर्याला सर्वांत जवळ असलेल्या ‘प्रॉक्झिमा सेंटॉरी’ (Proxima Centaury) ह्या ताव्याच्या प्रभावळीतून इथे पृथ्वीवर येणे फार अवघडआहे. आपल्या आजच्या दृष्टिकोनातून तेथून इथे येऊ शकणारे जीव देवतुल्य तंत्रज्ञान वापरूनच तसे करू शकतात. आजवरच्या धर्मगुरूंनी, मौलवींनी, पंडितांनी, जादूगारांनी क्लपनेत आणलेल्या सर्व चमत्कारांपेक्षा हे तंत्रज्ञान ‘जादुई’ असेल. नुकताच (मार्च २००८) वारलेला आर्थर सी. क्लार्क म्हणला होता, “कोणतेही पुरेसे प्रगत तंत्रज्ञान जादूसारखेच भासते.’ आपण एखाद्या मध्ययुगीन खेड्याजवळ जंबो जेट उतरवू शकलो, तर तेथले लोक आपल्याला देव मानून पूजा करतील ना? आज एका ताऱ्याच्या क्षेत्रातून दुसऱ्याच्या क्षेत्रात जाण्याचे तंत्रज्ञान, त्यामागचे विज्ञान, आणि आपले आजचे विज्ञान तंत्रज्ञान यांच्यातील फरक तसाच आहे आपण आणि मध्ययुगीन खेडुतांमधला फरकासारखाच. जे एका ताऱ्यापासून दुसऱ्यावर जाऊ शकतात त्यांना मोझेससारखा समुद्र दुभंगणे किंवा महंमदाने चंद्र फोडल्याचे सांगतात तसे करणे अवघड जाणार नाही.
पण आता प्रश्न वेगळाच होतो ते परग्रवासी कोणत्या दृष्टीने देवतुल्य असूनही देव मात्र नसतील?उत्तर आहे एक महत्त्वाचा फरक आहे. देवत्व बहाल करण्यासाठी एखादे जंबो जेट किंवा तारकायान घडवता येणे पुरेसे नाही. त्यासाठी सगळे विश्वच घडवता यायला हवे. यातून एक मूलभूत विरोधाभासच ठसतो. काहीही, कोणतीही वस्तू घडवता येणारे जीव मग ते मानवी तंत्रज्ञ असोत की परग्रहवासी स्वतःच बरेच व्यामिश्र, improbable आहे. अशा सांख्यिकीयदृष्ट्या असंभाव्य घटना कशा घडल्या हे सांगायला एखादी कारणांची, स्पष्टीकरणांची मालिका असावी लागते. देवाने जीवसृष्टी घडवली आहे असे सांगणारे रचनावादी, creationists सतत हे सांगत असतात, की ‘असंभाव्य’ म्हणजे सपष्टीकरणांच्या मालिकेने उकल न करता येणारी घटना. त्यांना वाटते की डार्विनीय नैसर्गिक निवड ही स्वैरपणे होते चुकीचे मत आहे, हे वास्तवात नैसर्गिक निवड स्वैरपणाच्या थेट विरुद्ध आहे. व्यामिश्र, असंभाव्य घटनांचे स्पष्टीकरण देण्याची ती अंतिम, श्रिींळारीश पद्धत आहे. अगदी आपली माणसांची जीवजात जरी परग्रहावरच्या तंत्रज्ञांनी घडवली असेल, तरी ते परके तंत्रज्ञ कसे घडले हे सांगता येत नाही. तेही कोणतरी घडवलेले असणार, हे अंतिम स्पष्टकरण होत नाही. तसली स्पष्टीकरणे कशासेच अंतिम उत्तर देऊ शकत नाहीत. परग्रहवासी कितीही देवतुल्य वाटले तरी ते या विश्वाचे कर्तेधर्ते नाहीत, कारण मानवी तंत्रज्ञानासारखेच तेही इथे उशिराने आले आहेत विश्व घडल्यानंतर. ‘इंटेलिजंट डिझाइन’ तत्त्व मांडणारे फारदा हे परग्रहवासी स्पष्टीकरण वापरून आपण पारंपरिक रचनावादी नाही असे दाखवू पाहतात. “आप्लयाला नीटसे माहीत नाही, पण आपले नियोजक, कर्ते, निर्माते अवकाशातून आलेले परग्रहवासीही असू शकतील,” असे ते सांगतात. मुळात हे ‘तत्त्वे’ही नाहीच. हा फक्त विज्ञानात आही धर्म आणत नाही आहोत, असे सांगायचा एक लंगडा आणि भोळसट प्रयत्न आहे. समोरासमोरच्या चर्चांमध्ये ते हा तुटपुंजा बचावही सोडून देतात. आणि आपल्या भक्तांपुढे बोलताना तर ते परग्रही विज्ञानकथाही सोडून मूलतत्त्ववादी रचनावादी, fundamentalist creationists होतात.
पण हा त्यांचा खोटारडेपणा विसरून मी कधीकधी त्यांच्याशी मैत्री करू पाहतो त्यांचे परग्रहवासी स्पष्टीकरण गांभीर्याने घेतो, असे दाखवतो. अखेर इंटेलिजंट डिझाइनवाद्यांचे ते मोठे अस्त्र आहे सर्वांत मोठे. फ्रान्सिस क्रिक आणि लेस्ली ऑर्गेल या विख्यात रेण्वीय जीवशास्त्रज्ञांनी परग्रहवासी युक्तिवादाचे एक रूप मांडले होते बहुधा थट्टेने. त्यांनी त्यांच्या मांडणीला ऊळीशलींशव झरपीशिीळर, दिग्दर्शित सार्वत्रिक वीर्यबीजारोपण, असे नाव दिले. त्यांची मांडणी अशी पृथ्वीवर एक जीवाणूंनी भरलेले यान आले एखादेवेळी बीटलग्यूज या परग्रहावरच्या तंत्रज्ञांनी ते त्यांनी रुजलेल्या सूक्ष्मजैविक यंत्रांनी भरले होते. पण हे मानायला आधी बीटलग्यूजी कसे घटले, ते इतके प्रगत कसे झाले, देवतुल्य कसे झाले, हे सांगावे लागले. समजा बीटलग्यूजी जीव चार अब्ज वर्षांपूर्वी आकडेवरानी जीवांच्या ‘पेरणी’मुळे घडले कधीतरी तर ही पीछेहाट थांबवावी लागेलच, ना?
नाही, इंटेलिजंट डिझाइनवाल्यांचा परग्रह-बचाव पुरत नाही. त्यासाठी नैसर्गिक निवडीतून होणारी उत्क्रांती किंवा तिला तुल्यबल स्पष्टीकरण द्यावे लागेल, सांख्यिकीय असंभवनीयतेतून व्यामिश्र रचना कशा घडल्या, ते चांगल्या संशोधन-विकासातून, research and development मधून कसे घडले, हे सांगावे लागेल, कशाचीही घडण आयोजित करू शकणारे देव मुळात इतर कोणी घडवले यांच्याच व्यामिश्रतेमुळे असणे शक्य नाही.
देवशास्त्री याला उत्तर देण्याचे दोन प्रयत्न करतात. एक म्हणजे त्यांच्या मनातला देव व्यामिश्र नसून साधा-सोपा आहे. हे उघडपणेच अपुरे आहे. जीवाणू असो की सगळे विश्व, त्यांचा नियोजक व्यामिश्रच असणार पापांपासून मुक्ती देणे, कुमारी माता घडवणे, कुमारी माता घडवते वगैरे तर फार दूरचे. हा अपुरेपणा जाणवून इतर देवशास्त्री वेगळी मांडणी करतात. ते सांगतात की देव व्यामिश्र आहे. अनादि आहे. तो जन्माला आलाच नाही, केवळ नेहेमीच अस्तित्वात होता. जर असे मानायचे झाले, तर जीवाणूही नेहेमीच होते असे का मानू नये? दूरच्या तारकाव्यवस्थांमधून आपल्याला कोणी भेट देणे जितके असंभवनीय आहे त्यापेक्षा अनादि निर्माता जास्त असंभवनीय आहे. एखाद्या तत्त्वाचा प्रतिवाद करण्यासाठी त्या तत्त्वाचे सर्वाधिक शक्य वाटणारे प्रतिमान उभारून त्यासाठी मानावे लागणारी विधाने किती अवास्तव आहेत ते दाखवणे, हे विज्ञानात व तत्त्वज्ञानात अनेकदा वापरले जाणारे तंत्र आहे. पण रचनावादी यातला पहिला प्रतिमान उभारण्याचा भाग संपताच ओरडायला लागतात, “बघा! त्यांना आमचे तत्त्व मान्य आहे!” माझ्यावरही हा प्रयोग केला जाणार आहे. याच आठवड्यात एक चित्रपट प्रकाशित केला जाईल. त्यात “डॉकिन्सचा अखेर इंटेलिजंट जिढाइनवर विश्वास आहे’, डॉकिन्सला परग्रहावरची माणसे आणि उडत्या तबकड्या यावर विश्वास आहे” इत्यादी सांगितले जाईल.
याला “येशूसाठी खोटे बोलणे’ म्हणतात, आणि ते अत्यंत निर्लज्जपणे केले जाते. [लॉस एंजलिस टाईम्समधून १९ एप्रिल २००८ च्या इंडियन एक्स्प्रेसमध्ये उद्धृत]
अन्न स्वस्ताई:नव्याने घडणारे आर्थिक दलित!
वरील आलेखामध्ये उभी मोजपट्टी खरा दरडोई ठोक देशांतर्गत उत्पाद व अन्नाच्या खचा किंमती दाखवते. खरा/खऱ्या’ याचा अर्थ ‘चलनवाढीसाठी वजावट केल्यानंतरचा/च्या’ असा घ्यायचा. दोन्ही बाबतींत १९६० साल पायाभूत मानले असून पुढे त्याच्याशी टक्केवारीची तुलना केली आहे. उदाहरणार्थ, २००० साली खरा दरडोई ठोक देशांतर्गत उत्पाद १९६० च्या खऱ्या दरडोई देशांतर्गत उत्पादाच्या २४०% होता. याच ‘तारखे’ ला अन्नाची खरी किंमत मात्र १९०० मधील अन्नाच्या किंमतीच्या जेमतेम ११०% होती.
आडवी मोजपट्टी काळाचे माप दाखवते.
एक बाब लक्षणीय आहे १९७४-७५ सालापर्यंत दरडोई ठोक राष्ट्रीय उत्पाद व अन्नकिंमती साधारण समांतर अशा हलत होत्या. नंतर हरित क्रांती घडली. भारतात शेतमालाचे व अन्नाचे उत्पादन वाढून भारत अन्नाबाबत स्वावलंबी झाला. पण याच तीसेक वर्षांमध्ये तुलनात्मक दृष्टीने अन्नाच्या किंमती दोनशेचाळिसात शंभर, म्हणजे अंदाचे चाळीस टक्के इतक्याच उरल्या. या अपार अन्न-स्वस्ताईने देशाला प्रगतिपथावर नेले आणि नाण्याची दुसरी बाजू शेतकऱ्याला नागवले, आर्थिकदृष्ट्या दलित केले.
[आधारः इंटरनॅशनल लेबर ऑफिस (ILO) व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) यांच्या आकडेवारीवरून डेंटिफर्स्ट सेंचरी इंडिया (संपादक डायसन, कॅसेन, विसारिया, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, २००४) या ग्रंथाच्या कर्त्यांनी घडवलेला आलेख.]