गौतमांनी आप्तप्रामाण्य नाकारले, शब्द-पूजा नाकारली, गुरू नाकारले, कोणतेही मत-कसोटीवर घासून त्याच्या सत्यतेचा प्रत्यय आल्याशिवाय मान्य करू नये, असे गौतमांनी सांगितले; कुठल्याही दुसऱ्या बाह्य ज्ञानी पुरुषाला शरण न जाता केवळ स्वतःला म्हणजे स्वतःमधील बुद्ध-स्वरूपाला शरण जावे; आणि आपल्यामधले अव्यक्त बुद्धत्व व्यक्त करून बुद्ध-पदाला पोहोचलेल्या गौतमांसारख्या महात्म्याचा ‘सल्ला’ घेत घेत प्रत्येकाने स्वतःच स्वतःची वाटचाल करावी; हे सारे समजले ; पण गौतम बुद्धांनी दिलेला हा ‘सल्ला’ काय आहे? त्यांनी दिलेली शिकवण आपण स्वतः पडताळून पाहावी हे ठीक, पण ती शिकवण आहे तरी काय ?’ असा प्रश्न या लेखाचा पूर्वार्ध वाचून वाचकांच्या मनात उत्पन्न झाला असेल. ह्याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न लेखाच्या ह्या ‘उत्तरार्धा’त करू या.
भगवान बुद्धांच्या शिकवणीचे अगदी प्राथमिक आधारतत्त्व आहे ‘दुःख’. जीवनात दुःख आहे हे कुणालाही दुसऱ्या कुणी समजावून सांगायची गरज नाही. त्याची वास्तवता समजण्यासाठी कोणत्याही आप्तवचनाची किंवा धर्मग्रंथाची गरज नाही. दुःख हा प्रत्काचा प्रत्यक्ष स्वानुभव आहे. म्हणजे, गौतमांच्या शिकवणीचे हे प्राथमिक तत्त्व ‘सिद्ध करणअयाची गरज नाही. ते सूर्यप्रकाशाइतके स्वयंस्पष्ट आहे.
कुणी म्हणले, “यात ‘सांगण्या’सारखे काय आहे? अहो, धर्मोपदेशच करायचा असेल, तर ईश्वर, आत्मा, त्यांचे स्वरूप, त्यांची उपलब्धी इत्यादी गूढ आणि इंद्रियानुभवापलीकडील विषयांचे विवेचन करावे. ‘दुःख आहे’ हे तर शेंबड्या पोरालादेखील ठाऊक असते.
भगवान् बुद्धांना जर हा प्रश्न विचारला गेला असता, तर त्यांनी उत्तर दिले असते, “दुःख ह्या वास्तवाचा उत्कट प्रत्यय जर तुम्हाला आला असता, तर त्या दुःखापासून मुक्त होण्याचा उपाय शोधून, निःशेष दुःख-मुक्तीसाठी तुम्ही कासावीस झाला असता. पण प्रत्यक्षात मात्र दुःखाकडे काणाडोळा करून ईश्वर, आत्मा वगैरे कल्पनांच्या पळवाटा तुम्ही शोधता आहात. खऱ्या मुमुक्षूचा एकमेव प्रश्न असेल, ‘अवश्यंभावी भासणारे जीवनातील हे दुःख नाहीसे कसे होईल ?’ या मूळ आमि रास्त प्रश्नाकडे दुर्लक्ष करून अज्ञात विषयांबद्दल कल्पनारंजन करीत बसणे म्हणजे व्यर्थ कालापव्यय नव्हे काय?तो जर खरोखरच शाहाणा असेल तर तो विचार करील : ‘दुःख तर आहे; मग त्याचे कारणही असले पाहिजे; आमि त्या कारणाचा नाश करून दुःखाचाही नाश करता येईल; आणि असे करून दुःखमुक्त होण्याचा काही मार्गही असला पाहिजे.” दुःख (आहे), दुःखाचे कारण (असले पाहिजे), दुःखाचा निरोध (शक्य आहे), आगि दुःख-निरोध-मार्ग (आहे)हे भगवान् बुद्धांच्या शिकवणीचे थोडक्यात वर्णन आहे. गौतमांना जी बोधी प्राप्त झाली, त्या बोधीत कोणताही दिव्य साक्षात्कार झाल्याचे त्यांनी म्हटले नसून ‘दुःख, दुःखसमुदय, दुःखनिरोध, आणि दुःखनिरोधगामिनी प्रतिपदा’ या चार ‘आर्य-सत्यां’चे ज्ञान झाले, असे त्यांनी म्हटले आहे. कुणी म्हणतील, “सृष्टीचे आदिकारण कोणते? ईश्वर आहे की नाही?आत्मा आहे की नाही? मेल्यानंतर माणसाचे काय होते?इत्यादी, मनुष्याच्या मनात उत्पन्न होणाऱ्या, प्रश्नांचे उत्तर जी व्यक्ती देत नाही, तिला ‘बुद्ध’ किंवा ‘धर्मचक्रप्रवर्तक’ वगैरे बिरुद चिकटविण्यात काय हशील?हे गहन प्रश्न म्हणजेच तर धर्माचा गाभा. त्यांना बाजूला सारून केवळ ‘दुःख-निवृत्ती’च्या क्षुद्र ऐहिक प्रश्नाचा ऊहापोह करणे एखाद्या अधार्मिक नास्तिकाला शोभून दिसते, धर्माचार्याला नाही.”
खरे पाहिले, तर ईश्वर, आत्मा, नित्यानित्यता वगैरेसंबंधी प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीलासुद्धा त्या गोष्टींमध्ये उत्कट रूची असते असे नव्हे. त्या व्यक्तीचीसुद्धा ख़री समस्या असते दुःखनिवृत्ती कशी करावी?पण ह्या मूळ समस्येचा परिहार करण्यासाठी दुःखाचे हे वास्तव उघड्या डोळ्यांनी पाहाणे, ते समजून घेणे,वतयतचे कारण शोधणे, आणि ते कारण नाहीसे करण्याची उपाय शोधणे हेच सारे करावे लागेल. पण दुःखाचे हे वास्तव धैर्याने स्वीकारणे आम्हाला शक्य होत नाही. म्हणून त्याच्याकडे लक्ष न देता कल्पनारंजनाच्या नशेत आम्ही मशगुल होऊन जातो. कदाचित्, असे केल्यामुळे आपला दुःखभोग काही काळ आपण विसरू शकू, पण तदो नाहीसा नाही होणार. डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरावर दुःखाचा बडगा बसायचे चुकत नसते. एखाद्या भीषण वास्तवामुळे भयभीत झालेले कांगारूचे पिलू आपल्या आईच्या पोटझोळीचा आश्रय घेऊन जसे निर्धास्त होऊ पाहाते, तसेच दुःखाच्या वास्तवाने भयभीत होऊन ईश्वर वगैरे कल्पनांचा आश्रय आम्ही बहुधा घेत असतो. साधु-संतांची चरित्रे जर पाहिलीत तर असे दृष्टोत्पत्तीस येईल त्यांच्या ईश्वर-शोदनाची प्रेरणा त्यांना बहुतेककरून जीवनातील दुःखभोगामधूनच झालेली असते. म्हणजे ईश्वरवाद्यांच्या धर्मचिंतनाचा आरंभदेखील ‘ईश्वरा’पासून होत नसून ‘दुःखा’पासून होत असतो. धर्माचे नाते कोणत्या तरी ‘पवित्र’ तत्त्वाशी आहे, किंवा असले पाहिजे, ही सर्वकाळी असलेली मनु याची भावना लक्षात घेऊन आणि धर्माचे अधिष्ठान ‘पवित्र’ तत्त्व असले पाहिजे ही सामान्य माणसाची अपेक्षा लक्षात घेऊन भगवान बुद्धांनी ‘दुःखा’लाच ‘पवित्र सत्य’ म्हटले असून ईश्वरवाद्यांच्या धर्मात ‘ईश्वरा’ ला जे पूज्य स्थान असते, तेज गौतमांनी ‘दुःख’ ह्या पहिल्या आर्य-सत्याला दिले आहे. सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते असे पुराव्यांनिशी सिद्ध करून प्रस्थापित ‘मता विरुद्ध असलेल्या ‘सत्या’ची स्थापना कोपर्निकसने केली. अगदी तशाच प्रकारे, ईश्वर-केन्द्री किंवा परतत्त्वकेन्द्री ‘मता’च्या जागी दुःख-केन्द्री ‘सत्या’ची स्थापना भगवान् गौतमांनी केली.
मनुष्यजातीचे लक्ष परोपरीने दुःख ह्या वास्तवाकडे खेचण्याच्या भगवान बुद्धांचा प्रयत्न पाहून अनेक लोकांनी त्यांच्यावर ‘दुःखवादी’ “निराशावादी’ असा आरोप केलेला आहे. हा आरोप किती विपर्यस्त आहे, आणि ‘निःशेष दुःखमुक्ती’चा संदेश देणाऱ्या गौतमांवर बेधडक असा शिक्का मारणे किती खोडसाळपणाचे आहे हे एका दृष्टान्ताच्या आधारे आपण समजावून घेऊ या. समजा एखाद्या मनुष्याला एखादे अत्यंत गंभीर असे दुखणे जडले आहे. अशा प्रसंगी त्या मनुष्याने किंवा त्याच्या हितचिंतकांनी त्या दुखण्याच्या वास्तवाचा विचार न करता, त्या दुखण्याचे कारण शोधून त्यावर योग्य ती उपाययोजना न करता, जर ‘दुखणे मुळी नाहीच’ असा घोशा लावला, तर त्याला ‘आशावाद’ म्हणायचे की ‘पलायनवाद’?उलटपक्षी, ‘हे दुखणे’ आहे वास्तव आहे, त्याचे निदान केले पाहिजे, आणि त्यावर उपाय करून या दुखण्यातून मुक्त झाले पाहिजे असे सांगणारा मनुष्य हाच खरा ‘आशावादी’ नव्हे काय?दुःख ढळढळीत दिसत असूनदेखील त्याची इन्कार करणारी मनुष्य आशावादी, की ते दुःख-वास्तव मान्य करून त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी उपाययोजना करणारी आशावादी?आपल्याला जर दुःखमुक्त व्हायचे असेल, तर प्रथमतः दुःखाचे ‘अस्तित्व’ मान्य करायला पाहिजे. रोगाचे वास्तव मान्य करणे ही रोग-मुक्तीची पहिली अट आहे. आमि म्हणूनच बुद्धदेवांच्या शिकवणीत ‘दुःख (आहे)’ ह्या आर्यसत्याला प्रथम स्थान आहे. दुःखापासून पलायन न करता दुःखाला धैर्याने सामोरे जा, आणि त्याचा निःशेष निरास करा अशी अत्यंत संजीवक शिकवण भगवान् बुद्धांनी दिलेली आहे.
दुःखाच्या स्वानुभवाकडे डोळेझाक करून, अनुभवांच्या कक्षेत न येऊ शकणाऱ्या अज्ञाताबद्दल चिंतन करून परतत्त्वाविषयीच्या काल्पनिक वावड्या उडवीत बसणे म्हणजे व्यर्थ कालाववयव्य आहे, कारण त्या चिंतनाचा दुःखनिरासासाठी अजिबात उपयोग नाही अशी गौतम बुद्धांची व्यवहारवादी भूमिका आहे. आता, या इंद्रियगोचर सृष्टीपलीकडे काही सत्ता आहे काय?असल्यास तिचे स्वरूप काय?या नश्वर मनुष्य-जीवनापलीकडे काही अविनाशी तत्त्व आहे काय?जरा-मरणादींचा ज्याला स्पर्शही होऊ शकणार नाही असा अविनाशी आत्मा आहे काय?या सृष्टीचे संचालन करून जीवांच्या पाप-पुण्याचा न्यायनिवाडा करणारा कुणी ईश्वर आहे काय?असे अज्ञाताविषयीचे असंख्य प्रश्न मनुष्याच्या मनात निर्माण होत आले आहेत, आणि कदाचित यापुढेही निर्माण होत राहतील. अज्ञौताबद्दलचे कुतूहल हा मानवी मनाचा एक स्वभावधर्मच दिसतो. आमि या कुतूहलाचे समाधान करण्याचा प्रयत्न बहुतेक पारंपरिक धर्म-संप्रदाय करीत आले आहेत. किंबहुना ज्ञात जीवन गौण ठरून अज्ञाताविषयीच्या कल्पक ऊहापोहालाच रूढ धर्मात अग्रस्थान दिले गेले आहे. आणि त्यामुळे मानवी जीवनाची मुख्य समस्या असलेल्या ‘दुःखा’कडे त्याचे दुर्लक्ष झाले आहे. हा दृष्टिकोण बदलून मनुष्याची दृष्टी अज्ञात परतत्त्वाकडून ज्ञान मानवी दुःखाकडे वळविण्याचे महत्त्कार्य भगवान् बुद्धांनी केलेले आहे. आपल्या एका प्रवचनात ते म्हणतात “समजा एका मनुष्याच्या शरीरात एक विषारी बाण घुसला आहे. तो विषारी बाण दाबडतोब बाहेर काढून टाकणे हे त्यावेळी महत्त्वाचे आहे. तसे करायचे सोडून ‘हा बाण कुणी मारला असेल?तो कशाचा बनलेला आहे?त्याला माखलेले विष नेमके कोणते?…’ अशा प्रकारचे प्रश्न विचारून त्या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत तो बाण बाहेर काढू देणार नाही असा हट्ट जर त्या मनुष्याने केला, तर तो आत्मघातकच ठरेल; कारण या फालतू ऊहापोहात कालापव्यय करून, करायला हवी ती मुख्य गोष्ट (बाण उपसून काढणे) न केल्यामुळे तो मनुष्य मरून जाईल, आमि ते प्रश्नही जागच्या जागीच राहातील. म्हणून असल्या अनावश्यक प्रश्नांचा काथ्याकूट करीत न बसता, शाहाणा मनुष्य तो विषारी बाण उपसून टाकील. त्याचप्रमाणे जीवनातील दुःखाची निःशेष निवृत्ती करणे हे प्रत्येक शहाण्या मनुष्याचे आद्य कर्तव्य होय. ते पार पाडल्यानंतर मग, गरज उरल्यास, या अवांतर प्रश्नांचा समाचार घेता येईल.”
जे इंद्रियगम्य किंवा बुद्धिगम्य नाही, त्याबद्दल केलेले कोणतेही विधान ‘अर्थशून्य’ असते (‘खोटे’ नव्हे, तर ‘अर्थशून्य’. कारण ‘खोटे’ असण्यासाठीसुद्धा आधी ते ‘अर्थपूर्ण’ असायला पाहिजे), आणि म्हणून ‘अज्ञाता’ला ‘ज्ञाता’च्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न करणारा तत्त्वज्ञानाचा भाग अर्थशून्य असून तो जाळून टाकण्याच्या लायकीचा आहे असे डेव्हिड ह्यूम ह्या तत्त्ववेत्त्याचे म्हणणे आहे. परतत्त्वशास्त्रीय प्रश्नांच्या संदर्भातील भगवान बुद्धांची भूमिकासुद्धा या भूमिकेहून वेगळी नाही. (असे म्हणतात की ह्यूम यांना बुद्धदेवांच्या शिकवणीची माहिती होती). आपल्या ह्या भूमिकेवर भगवान् बुद्ध इतके ठाम होते की अनवधानानेसुद्धा त्यांच्या तोंडून एखादे परतत्त्वशास्त्रीय विधान निघाले नाही. मुमुक्षू साधकाला निरुपयोगी असलेल्या असल्या अर्थशून्य विधानांच्या संदर्भात त्यांनी सदैव मौन पाळले. ‘नित्य-अविनाशी-शाश्वत असे आत्मतत्त्व आहे की नाही?’ या प्रश्नाचे ‘अस्तिवाची’ उत्तरेही ते देत नाहीत आणि ‘नास्तिवाची’ उत्तरेही ते देत नाहीत. या ठिकाणी एक अत्यंत सूक्ष्म असा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. तो असा की एखादे विधान सत्य नाही याचा अर्थ ते असत्य असलेच पाहिजे असे नव्हे. ते सत्यही नाही आणि असत्यही नाही म्हणजे ते ‘अर्थशून्य’ आहे, अशी परिस्थिती असू शकते. ‘सत्य’ आणि ‘असत्य’ हे सार्थ विधानाचे गुण आहेत ; निरर्थक विधान ना सत्य असते ना असत्य ते केवळ ‘अर्थशून्य’ असते.
वरील परिच्छेदात केलेले भगवान् बुद्धांच्या भूमिकेचे विवेचन वाचून बुद्धवचनांचे अध्ययन करणारे बुद्ध-समर्थक तसेच बुद्धविरोधकही माझ्यावर रागावतील. अस्वस्थ होऊन ते विचारतील, “अहो, काहीतरीच काय सांगता?बुद्धदेवांनी अगणित वेळा ‘आत्मा नाही’ असे म्हटले आहे. त्यांच्या शिकवणीतील ‘अनात्म-वाद’ इतका मूलभूत सिद्धान्त आहे की तो वगळून टाकल्यास त्यांची शिकवण उरतच नाही.’
वाचकांची नाराजी मी समजू शकतो; पण तरीही माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी जरा सबुरीने घ्यावे. या ठिकाणी ना तुमचे मत महत्त्वाचे आहे ना माझे. महत्त्वाचे आहे ते खुद्द बुद्धदेव या संदर्भात काय म्हणतात ते. म्हणून ‘आत्म-वाद’ किंवा ‘अनात्म-वाद’ असा कोणताही पूर्वग्रह न बाळगता अगदी रिक्त मनाने बुद्धदेवांचे म्हणणे समजून घेऊ या.
शाश्वत आत्म्याच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रसंगी गौतमांनी दोन वेगवेगळी उत्तरे दिलेली आहेत. काही प्रसंगात ‘शाश्वत आत्मा आहे काय?’ या प्रश्नाला त्यांनी ‘मौना’ने उत्तर दिले आहे, तर इतर काही ठिकाणी ‘नकारा’ने उत्तर दिलेले आहे. एकाच प्रश्नाला दिलेली ही दोन विभिनन उत्तरे पाहून भांबावलेल्या बुद्धदेवाच्या एका निकटवर्ती श्रावकाने त्यांना विचारले, “महाराज, आम्ही लोक जेव्हा आत्म्यासंबंधी विचारतो, तेव्हा ‘आत्मा नाही’ असे निःसंदिग्धपणे तुम्ही सांगता; आणि आत्ता येथून निघून गेलेल्या माणसाने जेव्हा तेच विचारले, तेव्हा तुम्ही मौन धारण केले. असे का? त्या माणसालाही ‘आत्मा नाही’ असे का नाही सांगितले?” त्यावर बुद्धदेव म्हणाले, “तुम्ही लोक जे काही विचारता, ते केवळ निर्वाण-प्राप्तीच्या आत्यंतिक तळमळीपोटी विचारता, तत्त्वज्ञानाचे सिद्धान्त जाणून घ्यायच्या कुतूहलापोटी नव्हे; म्हणून तुमच्या ईप्सित-सिद्धीसाठी उपयोगी असा व्यावहारिक अनात्मवाद मी तुम्हाला सांगतो. पण आत्ता येथून निघून गेलेल्या माणसाचे उद्दिष्ट निर्वाण-प्राप्तीसाठी प्रयत्न करणे हे नसून, त्याला केवळ तत्त्वज्ञानाचे सिद्धान्त हवे होते. तत्त्वज्ञानाचे असे सिद्धान्त दिशाभूल करणारे असतात. ज्यामुळे त्या माणसाचे अहित व्हायला मदत होईल असे उत्तर मला द्यायचे नव्हते. म्हणून मी मौनाचा मार्ग पत्करला.”
याचा अर्थ असा की ‘आत्मा नाही’ असे जेव्हा भगवान् बुद्ध म्हणत, तेव्हा ते व्यावहारिक ‘स्व’विषयी (empirical self विषयी) बोलत असत, पारमार्थिक आत्म-तत्त्वाविषयी (transcendental self विषयी) नव्हे. इच्छा-वासना, भय-क्रोध, मोह-महत्त्वाकांक्षा इत्यादिकांचे गाठोडे असलेला जो ‘मी’ जो ‘अहं’ त्याचा त्यांनी इन्कार केला आहे. इच्छा वासना, भय-क्रोध, मोह-महत्त्वाकांक्षा इत्यादी घटकां’च्या गाठोड्यालाच आपण ‘मी’ किंवा ‘आत्मा’ हे ‘नाव’ देत असतो. कांद्याचे सगळे पापुद्रे जर काढून टाकले, तर कांदा नावाची काही वस्तू शिल्लक राहात नाही (कारण कांदा म्हणजे त्या पापुद्र्यांच्या समुच्चयाला दिलेले नाव), त्याचप्रमाणे आपल्या ‘मी’चे हे सगळे घटक जर वगळून टाकले तर ‘मी’ म्हणून काही पदार्थ उरतच नाही. (कारण ‘मी’ हे त्या घटकसमुच्चयाला दिलेले केवळ एक नाव होय). सतत परिवर्तनशील चित्तवृत्तींच्या समुच्चयालाच नित्य आत्मा म्हणून आपण कवटाळून बसत असतो, आणि हेच आपल्या दुःखाचे आदिकारण होय. “मी मेला, की सगळी कटकट चुकली”. ‘मी’ हे ‘दुःखाचे कारण’ आहे असे म्हणण्यापेक्षाही ‘मी म्हणजेच दुःख’ असे म्हणणे अधिक योग्य होईल. जेव्हा हा ‘मी’ नाहीसा होईल तेव्हा, आणि केवळ तेव्हाच, दुःखही नाहीसे होईल. पण आमची अडचण ही असते की ह्या ‘मी’ला मरू द्यायला आम्ही तयार नसतो. आम्हाला दुःख तर नको आहे, पण हा ‘मी’ मात्र सोडवत नाही. ही अडचण लक्षात घेऊनच भगवान् बुद्धांनी पुनःपुनः ह्या ‘नाह’ वादाचा उपेदश केला. ज्या शाश्वत आत्म्याचा उद्घोष वेदान्तात केला जातो, त्याच्याविषयीच गौतम बोलत आहेत असे मानणे म्हणजे ते एक अर्थशून्य विधान करताहेत असा त्यांच्यावर आरोप करण्यासारखे होईल. आणि हा आरोप नक्कीच समर्थनीय नाही मग तो त्यांच्या विरोधकांनी केलेला असो की त्यांच्या समर्थकांनी.
एका परतत्त्वशास्त्रीय (metaphysical) सिद्धान्त म्हणून आत्मवादाचे खंडन करून अनात्मवादाचा सिद्धान्त भगावन् बुद्धांनी प्रस्थापित केला असे म्हणणे विपर्यस्त होईल. आपल्या अनुभवाला न आलेल्या कोणत्याही ‘परतत्त्वाची कल्पना निर्वाण प्राप्त करण्यासाठी असंबद्ध तर आहेच, पण त्याशिवाय ती निर्वाणप्राप्तीच्या मार्गातील एक अडथळाही बनू शकते, याविषयी मुमुक्षूना बुद्धदेवांनी सावधानतेचा इशारा दिलेला आहे. ‘गेली पंचेचाळीस वर्षे (म्हणजे बोधिलाभानंतर महानिर्वाण होईपर्यंत) मी फक्त एकच उपदेश करीत आलो आहे दुःख आहे आणि त्याचा निःशेष निरास शक्य आहे.” निःशेष दुःख-निरोधाच्या आपल्या प्रत्यक्ष अनुभवातून त्यांनी शोधून काढलेल्या दुःख-निरोध-मार्गाचा त्यांनी अखंडपणे पंचेचाळीस वर्षे उपदेश केला. दुःख, दुःखसमुदय (दुःखाचे कारण), दुःख-निरोध, आणि दुःखनिरोधमार्ग या चार आर्यसत्यांचे वेगवेगळ्या लोकांपुढे वेगवेगळ्या पद्धतींनी त्यांनी निरूपण केले. “अधिकार तैसा करू उपदेश ।” असे तुकाराम म्हणतात. भगवान् बुद्धांच्या वचनांमध्येही आपल्याला हाच भाव आढळतो.
भगवान् बुद्धांचा सगळा रोख आहे आपल्या अंतरीच्या सुप्त बुद्धाला जागविण्याकडे. ज्या कोणत्या साधनाने ते शक्य होणार असेल, ते साधन उचित. पण तरीही, अगदी प्राथमिक अवस्थेतील साधकासाठी त्यांनी अष्टांगमार्गाचा उपदेश केलेला आहे. ह्या मार्गातील आठ अंगे आहेत : सम्यक् दृष्टी, सम्यक् संकल्प, सम्यक् वाचा, सम्यक् कर्मान्त, सम्यक् आजीव, सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृती, आणि सम्यक् समाधी. निष्ठावान् बौद्ध साधकांच्या मते, या आठ अंगांपैकी सर्वांत महत्त्वाचे अंग आहे सम्यक् स्मृती सम्यक् जागरूकता किंवा सम्यक् अवधान. बिकीची सात अंगे म्हणजे सम्यक्-स्मृतीरूपी प्रकाशाचेच वेगवेगळे किरण आहेत. एका जगप्रसिद्ध बौद्ध संतांच्या मते, “जेव्हा सम्यक् स्मृती विद्यमान असते, तेव्हा चार आर्य-सत्ये आणि अष्टांगमार्गाची इतर सात अंगेही विद्यमान असतात. जेव्हा आपल्या ठिकाणी सम्यक् जागरूकता विद्यमान असेल, तदेव्हा आपला संकल्प (विचार) ही सम्यक् असेल, आपली वाचाही सम्यक् असेल… असेच इतर अंगांविषयीदेखील. सम्यक स्मृती ही आपल्याला सतत वर्तमान क्षणाकडे खेचून आणणारी ऊर्जा होय. अशी नित्य जागरूकता म्हणजेच आपल्या अंतरीच्या बुद्धाला जागविणे… जेव्हा अशा सम्यक स्मृतीची साधना आपण करीत असतो, तदेव्हा आपल्या अंतरी तसेच आपल्या सभोवताली बुद्ध-ऊर्जा जागवीत असतो, आणि हीच जगाला वाचवू शकेल. जो बुद्ध असतो, तो दिवसाचे चोवीसही तास पूर्ण जागरूक असतो. आपण फक्त अर्ध-वेळ बुद्ध आहोत…”
[सुधाकर देशपांड्यांनी बुद्धाच्या शिकवणीचा उत्तम परिचय करून दिला पण तरीही बुद्धाचा धर्म ‘वैज्ञानिक’ ठरत नाही. विज्ञानाचे क्षेत्र जड (रारींशीळरश्र) भूतमात्राचेच आहे. त्यामुळेच विज्ञानात वैश्विक सत्ये शोधली जातात, असे आपण म्हणू शकतो. माणसांची दुःखे व्यक्तीप्रमाणे वेगवेगळी असतात. अशा स्थितीत बुद्धाचा धर्म विज्ञााचा समर्थक, त्यातून उत्पन्न होणाऱ्या काही तंत्रज्ञानाचाही समर्थक ठरतो पण तो विज्ञानापेक्षा व्यापक आहे. ऐहिकता, प्रत्यक्ष भवालाच महत्त्व देणे, अप्रप्रामाण्य शब्दप्रामाण्य नाकारणे, ही अंगे विज्ञानाशी जुळती आहेत. पण विज्ञानाचे शोधक्षेत्र फारतर बुद्धाच्या धर्माच्या वैज्ञानिकतेच्या मर्यादेत बसवणे मला तरी त्या धर्मावर अन्याय करणारे वाटते नंदा खरे]