श्रद्धा म्हणजे दृढविश्वास. ज्याला अनुकूल पुरावा लागत नाही, प्रतिकूल पुरावा बाधत नाही; तरी तो कायम राहतो. जरासंधासारखा. उदाहरणार्थ, मनुष्य मेल्याने आत्मा मरत नाही. आत्मा अमर आहे असे शास्त्रांनी सांगितले त्या अर्थी ते खरे असलेच पाहिजे. ही श्रद्धा.
पुढे सत्ययुग येणार आहे. पृथ्वीवर स्वर्ग अवतरेल असे गुरु महाराज म्हणतात, भगवान म्हणतात, पण त्यासाठी त्यांनी सांगितले तसे केले पाहिजे. अविश्वास दाखवू नका, विश्वास ठेवा. श्रद्धस्व!
सत्कर्म कोणते? दुष्कर्म कोणते ? योग्य कायह्नअयोग्य काय ? कशाने स्वर्गहह्नकशाने नरक लाभेल ? धर्म काय-अधर्म काय हे सगळे जुन्या जाणत्यांनी सांगून ठेवले आहे.
मासिक संग्रह: ऑक्टोबर , २००७
खरी पूजा
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला झंडीच्या झुंडी अंगारिकेला जातात याबद्दल अंनिसने केलेली टीका मी वाचली. त्याबद्दल मला कीव वाटली तरी दुःख होत नाही. परंतु सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश वाय.व्ही.चंद्रचूड हे त्या झुंडीत दर्शनासाठी उभे होते, (म.टा.ता.३०-०३-०५). हे वाचल्यावर अत्यंत दुःख वाटले. मी स्वतः पुण्याचा आहे. मला डॉ.पु.ग.सहस्रबुद्धे शिकवायला होते. आम्हाला आगरकरांचे चरित्र ‘देव न मानणारा देवमाणूस’ हे पुस्तक अभ्यासाला होते. मी ८० वर्षांचा स्वातंत्र्यसैनिक आहे. माझ्यावर डॉ. सहस्रबुद्ध्यांचे बुद्धिप्रामाण्यवादाचे संस्कार दृढ झालेले आहेत. न्या. चंद्रचूड यांनी रुईया कॉलेजचे माजी प्राचार्य द. के. केळकर यांचे ‘बुद्धिवादाचा ध्रुवतारा’ हे पुस्तक आणि प्रा.
हे ज्ञानिचि पवित्रता अखंड राहो
‘मराठवाडा’ या नावाने ३५ वर्षे आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ या नावाने १४ वर्षे पूर्ण करणाऱ्या औरंगाबादेतील विद्यापीठाचा सुवर्णमहोत्सव महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासातील एक मोठी घटना आहे. उच्चशिक्षण आधुनिक वळणाचे व काळानुरूप देण्याचा पाया मुंबईहून थेट मराठवाड्यात येऊन घालणारे डॉ. आंबेडकर आणि त्यांची दूरदृष्टी यांचे सुंदर फळ म्हणजे हा सुवर्ण महोत्सव ! बाबासाहेबांनी उच्च शिक्षणाला मराठी तोंडवळा बहाल केला हीही एक मोठी कामगिरी मानली पाहिजे. मराठी संस्कृती व ब्रिटिश राजवट यांच्या संयुक्त विद्यमाने उर्वरित महाराष्ट्र प्रगतीकडे वाटचाल करीत असताना मराठवाडा मात्र उर्दू आणि निजाम यांच्या कचाट्यात सापडून मागासलेलाच राहिला होता.
शोधः सर्वत्र सारखाच
तस्लिमा नासरीनमुळे या कादंबरिकेकडे आपले लक्ष जाते, अपेक्षाभंग मात्र होत नाही. जेमतेम सत्याऐंशी पानांचा विस्तार, तोही प्रकाशकांनी बळेबळे वाढवलेला, पण विचारांचा ऐवज लहान नाही. किंबहुना तेच या कादंबरिकेचे बलस्थान.
तस्लिमा ‘लज्जा’मुळे प्रकाशझोतात आली. पण ‘शोध’ ही तिच्याही आधी सहा महिने प्रकाशित झालेली. ‘फिटुं फाट’ हे या ‘शोध’चे भाषांतर. बंगालीत ‘शोध’ चा अर्थ संस्कृत ‘प्रतिशोध’ला जवळचा. ‘बदला’ – ‘सूड’, ‘परतफेड’ असा काहीसा. अशोक शहाण्यांनी अनुवादात बोलभाषेचा सहजपणा राखायचा बुद्ध्या प्रयत्न केलेला आहे. तो नावात आला.
ऑगस्ट ९२ मध्ये ‘शोध’ आली. जुलै ९३ मध्ये ‘लज्जा’वर बंदी येईपर्यंत ‘शोध’च्या पाच आवृत्त्या निघाल्या होत्या.
पुस्तक परामर्श -वस्ती
वस्ती या पुस्तकात वसंत मून यांनी नागपूरच्या बर्डी या मध्यवर्ती भागातील बौद्ध धर्मांतराच्या पूर्वीच्या महार लोकांचे जीवन चितारले आहे. हा काळ इ.स. १९३० ते १९५६ दरम्यानचा आहे. पूर्वीच्या महार लोकांची जीवनपद्धती, त्यांचे नागपंचमीसारखे सण, त्यांची सामाजिक एकी, हिंदू धर्माने त्यांच्यावर लादलेल्या अस्पृश्यतेच्या अन्यायाची चीड, त्यांची हलाखीची आर्थिक परिस्थिती व सदैव सतावणारी भूक, नातलगांचे कधी-आहे, कधी-नाही असे सहकार्य आणि ह्या साऱ्यांवर मात करणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘शिका, संघर्ष करा व एक व्हा’ हा गुरुमंत्र आणि त्याप्रमाणे वागून शिक्षणाद्वारे ह्या दलदलीतून सुटका हे सारे वसंत मून यांच्या वस्तीत वाचावयास मिळते.
‘मर्मभेद’च्या निमित्ताने, आमच्या विषयाची स्थिती
मर्मभेद हा ज्येष्ठ तत्त्वज्ञ प्रा. मे.पुं.रेगे ह्यांनी लिहिलेल्या टीकालेखांचा संग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे. संपादक आहेत प्रसिद्ध साहित्यिक एस्.डी.इनामदार. ह्या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या लेखकांनी, तज्ज्ञांनी तत्त्वज्ञान, सौंदर्यशास्त्र आणि धर्म इ. विषयांवर लिहिलेल्या पुस्तकांचे, लेखांचे रेगे सरांनी केलेले परीक्षण, त्याला काही लेखकांनी दिलेली उत्तरे तसेच रेगे सरांनी केलेला खुलासा समाविष्ट आहे. रेगे सरांचे लेख प्रामुख्याने नवभारत या वैचारिक मासिकातून प्रसिद्ध झालेले आहेत. १९६२ ते १९९९ असा सदतीस वर्षांचा हा कालखंड आहे.
ज्या ज्या वेळी हे लेख प्रसिद्ध झाले त्या त्या वेळी टीकेचा विषय झालेल्या काही ग्रंथकारांनी आणि लेखकांनी त्याला उत्तरेही दिलीत.
राष्ट्रपतिपदाची तिरकी चाल: बाबूजी ते बीबीजी! (भाग-२)
सप्टेंबरच्या अंकापासून सुरू झालेला हा अहवाल तीन भागांत तीन वैशिष्ट्यांवर भर देणारा आहे. ‘वाकडी वाट’, ‘बाबूजी’ व ‘बीबीजी’ हे त्यांतले ३ कोन आहेत. मागील लेखांकांत ‘बाबूजी’ व ‘इंडिया टुडे’ने शीर्षस्थ मानलेले दुसऱ्या क्रमांकाचे राष्ट्रपती अर्थात् ‘डॉ. स. राधाकृष्ण यांच्याबद्दल विस्ताराने लिहिले.
आता या दुसऱ्या भागात ‘वेडी’, ‘वाकडी’, ‘तिरकी’ वाटचाल कशी याचा ऊहापोह करू. त्याचबरोबर १२ वे व १३ वे (व्या) राष्ट्रपतींचा विचार पुढच्या लेखांकासाठी राखून चवथ्याच (व्यक्तिशः पांचव्या) चालीमध्ये वाकुडपणा कसा आला ते बघू.
तत्पूर्वी आणखी एका सूक्ष्म तिरपिटीकडे पाहणे आवश्यक आहे.
हृदयरोग हटविता येतो
डॉ. डीन ऑर्निश हे अमेरिकेतील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ आहेत. ते काही वर्षांपूर्वी ‘प्रिव्हेंटिव्ह मेडिसीन रिसर्च इन्स्टिट्यूट’चे अध्यक्ष व कॅलिफोर्निया विद्यापीठात क्लिनिकल प्रोफेसर ऑफ मेडिसीन या पदावर कार्यरत होते. श्री बिल क्लिंटन अमेरिकेचे अध्यक्ष असताना डॉ. ऑर्निश त्यांना आहार, पोषक तत्त्वे, जीवनपद्धती ह्यांबद्दल सल्ला देत असत. त्यांच्या जीवनातील काही अनुभवांची ओळख करून देण्याचे योजले आहे.
डीन ऑर्निश हे विद्यार्थी असताना त्यांना मेडिकल स्कूलमध्ये प्रवेश हवा होता. त्यावेळी असा समज होता की जो विद्यार्थी ऑरगॅनिक केमिस्ट्रीमधील विविध द्रव्यांचे गुणधर्म व त्यांच्या रासायनिक क्रिया नीट लक्षात ठेवू शकत असेल तोच विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यास पात्र आहे.
साला माझ्या जीवनाचे तात्त्विक अधिष्ठान
मला पाच मिनिटांत माझ्या जीवनाचे तत्त्वज्ञान सांगावयाचे आहे. तत्त्वज्ञान शब्दाचा अर्थ या संदर्भात मी सामाजिक तत्त्वज्ञान असाच समजतो. प्रत्येक मनुष्याला काहीतरी जीवनविषयक तत्त्वज्ञान असणे इष्ट आहे. आपल्या वर्तणुकीचे मोजमाप करण्यासाठी मनुष्याला काहीतरी निकष ठरविणे आवश्यक आहे आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान असणे आवश्यक आहे असे मी म्हणतो याचे कारण या तत्त्वांच्या निकषानेच आपण वाईट केले आहे याचे त्याला आकलन होते. आणि जेव्हा आपण चुकलो आहोत असे त्याला समजेल तेव्हाच त्याला आपल्या तत्त्वानुरोधाने आपली उन्नती साधण्याची जबाबदारी पटेल. माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान मी निश्चित केलेले आहे.
सुधारकाचा एक मित्र हरवला
आजचा सुधारक १९९० साली निघाला तेव्हा त्याचे जे वर्गणीदार झाले ते सगळे सुधारकी बाण्याचे होते असे नाही. काहींना मित्रत्वाच्या भावनेतून आम्ही तो घ्यायला लावला. हरिभाऊ त्यांतले एक. लौकरच ते आजीव वर्गणीदार झाले. आसु त माझे लेखन वाचून ते चेष्टा करत, वाः तुमचे शुद्धलेखन छान आहे! पुढे १७ वर्षांनी ‘शब्द-प्रभा’चे संपादक
ह्या नात्याने मात्र त्यांनी हातचे राखून न ठेवता मुक्तकंठाने जी दाद दिली ते त्यांचे शेवटचेच लेखन ठरले. गेल्या ऑगस्टच्या २५ तारखेला ते गेलेच.
हरिभाऊ प्रा. ह.चं.घोंगे सुधारकाचे हितचिंतक अन् हुकमी लेखक होते.