मासिक संग्रह: जानेवारी, २००७

पुस्तकपरीक्षण ‘कातकरी’

कातकरी: विकास की विस्थापन हे पुस्तक छोटेखानी विश्वकोषाचे स्वरूपाचे आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर प्रामुख्याने रायगड जिल्ह्यात आदिवासी जमातीची म्हणजेच कातकरींची विविध प्रकारची माहिती इथे एका सुसंगत क्रमाने वाचकांना नवीन विषयाची पुरेशी ओळख करून देते. पुस्तकातील विवेचनाला श्री मिलिंद बोकील यांचा प्रत्यक्ष समाजकार्याचा त्यापरिसरातील दोन दशकांचा अनुभव आणि व्यासंगपूर्ण संदर्भ वाचनाचे साक्षेपी उल्लेख यांची जोड मिळालेली आहे.
पुस्तकाच्या मांडणीमध्ये सामाजिक-सांस्कृतिक दृष्टिकोणातन कातकरींची जीवनशैली आणि प्रामुख्याने इंग्रजी काळानंतर कातकऱ्यांची उपजीविकेची आर्थिक साधने यामध्ये होत जाणारे महत्त्वाचे बदल व्यवस्थित रीतीने मांडलेले आहेत. कात गोळा करणे, कोळसाभट्टी आणि वीटभट्टी मजूर, डोंगराळ जमिनीवर, पारंपरिक शेती करताना वनखात्याशी कातकऱ्यांचे आलेले संबंध आणि शेवटी मुंबईसारख्या महानगराच्या सावलीत भौगोलिक वास्तव्य असल्याने त्याचे अपरिहार्य परिणाम बोकील यांनी तपशीलवार दिलेले आहे.

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत काढण्यासाठी तो पुढे सरसावला. परंतु हे काय, समोरील दृश्य पाहून राजा विक्रमादित्याच्या मनाचा थरकाप झाला. आज त्याला जवळपास सगळ्याच झाडांवर प्रेते लटकलेली दिसत होती. झाडांवर इतकी प्रेते कशी काय आली असा विचार करीत असतानाच त्याची दृष्टी त्याला हव्या असलेल्या प्रेतावर पडली. झाडावरील ते प्रेत खांद्यावर टाकून विक्रमादित्याने आपली पावले स्मशानाकडे वळवली आणि तो झपझप मार्गक्रमण करू लागला तोच प्रेतातील वेताळ त्यास म्हणाला, “राजन्, आताचे दृश्य पाहून तू चांगलाच अस्वस्थ झालेला दिसतोस. माझ्याप्रमाणेच ह्या प्रत्येकाचा अंतिम संस्कार करण्याचे तू जर ठरवलेस तर तुला पुढील तीन चार वर्षे तरी काम पुरणार बघ!

पुढे वाचा

कामव्यवहाराची उत्क्रांती

स्त्री आणि पुरुष जेव्हा जोडीदार निवडतात तेव्हा ते कोणते डावपेच आखतात? स्त्रियांना कोणते पुरुष हवे असतात? पुरुष स्त्रियांना कोणत्या निकषांवर निवडतात? एकत्र राहण्यासाठी आणि वेगळे होण्यासाठी दोघेही विविध क्लृप्त्या कश्या योजतात? स्त्री पुरुष फक्त मित्र म्हणून राहू शकतात काय? अशा बहुविध प्रश्नांची वैज्ञानिक उत्तरे शोधणारे एक सुंदर व विचार करायला लावणारे पुस्तक आहे. ‘द इव्होल्यूशन ऑफ डिझायर-स्ट्रॅटजीज ऑफ ह्यूमन मेटिंग’. हे पुस्तक लिहिण्यासाठी पुस्तकाचे लेखक डेव्हिड बस यांना सखोल संशोधन करावे लागले आहे. ते युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमध्ये मानसविज्ञानाचे प्राध्यापक आहेत.

पुढे वाचा

शिक्षण: शिक्षककेंद्री व विद्यार्थिकेंद्री

सामान्यतः मुलांचे औपचारिक शिक्षण शाळांतून होत असते. हे शिक्षण प्रामुख्याने वर्गांतून होत असते. आज बहुसंख्य शाळांतील दर्जाविषयी होणारी ओरड ही मूलतः वर्गामधील शिक्षणाच्या दर्जाविषयीची असते. अनेक वरवरचे उपाय सार्वत्रिकरीत्या अंमलात आणूनही शिक्षणाच्या गुणवत्तेत फरक पडत नाही, हा आपला अनुभव आहे. ही आपली खंतही सार्वत्रिक स्वरूपाची आहे. शाळांमधील आणि शाळांतील वर्गांमधील शिक्षणाची गुणवत्ता अतिशय कमी असणे, ही गोष्ट, हा आजचा एक फार मोठा सामाजिक प्रश्न आहे. तो अशा शाळांमधील लाखो मुलांच्या दैनंदिन जीवनातील जसा प्रश्न आहे तसाच तो, या मुलांमधून जन्माला येणाऱ्या भावी प्रौढांच्या आयुष्यभराच्या जीवनाचा प्रश्न आहे.

पुढे वाचा

मानवी स्वभाव व डार्विनवाद (१)

[जेनेट रॅडक्लिफ रिचर्ड्स (Janet Radcliffe Richards), या इंग्लंडमधील मुक्त विद्यापीठात तत्त्वज्ञानाच्या व्याख्यात्या होत्या. सध्या त्या जैवनीतिशास्त्र (Bioethics) या विषयाच्या युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन, येथे प्रपाठक (Reader) आहेत. त्यांचे द स्केप्टिकल फेमिनिस्ट हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्यांच्या ह्यूमन नेचर आफ्टर डार्विन, Human Nature After Darwin (Routledge, 2000) या पुस्तकाचा परिचय काही लेखांमधून करून देत आहोत. विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी डार्विनचा उत्क्रांतिवाद व त्याभोवतीचे वादवादंग वापरायचे रिचर्ड्सना सुचले. त्या अनुभवांवर प्रस्तुत पुस्तक बेतले आहे. प्रभाकर नानावटींनी संपूर्ण पुस्तकाचे भाषांतरही केले आहे व ते प्रकाशनाच्या प्रयत्नात आहेत.

पुढे वाचा

सामाजिक सुरक्षाः अमेरिकन अनुभव (भाग १)

‘औद्योगिक क्रांती’ ही प्रक्रिया युरोपात सुरू झाली. अनेक वर्षे मुरत असलेले, पिकत असलेले घटक एकत्र होऊ लागले, आणि पारंपरिक शेती-बलुतेदारी जीवनशैलीने जगणाऱ्यांचे समाजातील प्रमाण कमी होऊ लागले. मुख्य फरक होता ऊर्जेच्या स्रोतांत. तोवर शेती व तिच्याशी संबंधित उद्योगांमध्ये मुख्यतः माणसे आणि जनावरे यांच्या स्नायूंची ऊर्जा वापरली जात असे. नव्या जीवनशैलीत इंधनाची ऊर्जा वापरून यंत्रे काम करू लागली. तोवर हस्तकौशल्य महत्वाचे असे, तर आता त्याची जागा यंत्रासोबत करायच्या श्रमांनी घेतली. अनेक हस्तकुशल कारागीर बेकार झाले, आणि इतर अनेक कौशल्ये आवश्यक असणारे पेशे घडले.

पुढे वाचा

स्त्री भ्रूणहत्याः कोल्हापुरातले वास्तव (भाग १)

[अमृता वाळिंबे यांनी मालतीबाई बेडेकर अभ्यासवृत्ती २००५-२००६ वापरून केलेले संशोधन आम्हाला प्राप्त झाले. त्याचा जुजबी संक्षेप करून आम्ही काही भागांमध्ये ते संशोधन प्रकाशित करीत आहोत. या प्रकारचे संशोधन महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांकरिता व्हायला हवे.]

कोल्हापूर. अनेक अर्थांनी समृद्ध म्हणवला जाणारा महाराष्ट्रातला एक जिल्हा. सहकारी चळवळींचा भक्कम पाया, त्यातून आलेली आर्थिक सुबत्ता, लघुउद्योगाचे पसरलेले जाळे, शिक्षणासारख्या सामाजिक सोयी-सुविधा, आणि या साऱ्याच्या मुळाशी असलेला शाहू महाराजांपासून चालत आलेला सत्यशोधकी-पुरोगामी विचारांचा वारसा; अशी भरभक्कम पार्श्वभूमी या कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेली आहे. पण इथल्या समृद्धीपल्याडचे भीषण वास्तवही आता समोर येऊ लागले आहे; ते स्त्रीभ्रूणहत्येच्या रूपाने.

पुढे वाचा

अराजक म्हणजे काय?

ऐतिहासिक दृष्टीने पाहता अराजकवाद (Anarchism) ही सध्याच्या समाजव्यवस्थेवर टीका करणारी, तिला ‘हवासा’ पर्याय सुचवणारी आणि इथपासून तिथपर्यंत जाण्याचा मार्ग दाखवणारी विचारप्रणाली आहे. अविचारी बंडे अराजकवादी नसतात. आजच्या ऐहिक शासनाला तात्त्विक किंवा धार्मिक भूमिकेतून नाकारणेही अराजकवादी नाही. गूढवादी व स्टोइक (mystics & stoics) यांना अराजक नको असते तर इतर कोणते तरी राज्य हवे असते. अराजकवाद मात्र इतिहासात नेहेमीच केवळ माणूस आणि समाज या संबंधांवर रोखलेला आहे. त्याचा हेतू नेहेमीच सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचा असतो. तो नेहेमीच सध्याच्या सामाजिक रचनेला दुष्ट मानतो. हे मानणे माणसांच्या स्वभावाच्या व्यक्तिवादी आकलनातूनही येत असेल, पण अराजकवादाच्या पद्धती मात्र नेहेमीच सामाजिक बंडखोरी करण्याच्या असतात, मग त्या हिंसेचा आधार घेवोत वा न घेवोत.

पुढे वाचा

पत्रसंवाद

आसु च्या नोव्हें.०६ च्या पत्रसंवादातील प्रदीप पाटील यांचे पत्रातील शेवटच्या परिच्छेदांत माझ्या नावाचा उल्लेख व उल्लेखाचे कारण वाचून मी आश्चर्यचकित झालो. प्रदीप पाटील लिहितात की “डॉ.देशकर यांना धर्म म्हणजे नीती या अर्थाने त्यांचे विवेचन अभिप्रेत असेल तर मी (प्रदीप पाटील) आस मध्ये पूर्वीच लिहिले आहे. आणि धर्माविषयी आस ने दि.य.देशपांडेंचे अनेक लेख छापले आहेत तीच माझी भूमिका आहे.” माझी प्रदीप पाटलांच्या मेंदूतील देव’ ह्या मूळ (जुलै ०६) लेखावर प्रतिक्रिया ऑक्टो.०६ च्या पत्रसंवादात प्रसिद्ध झाली होती. त्यात कुठेही मी नीती हा शब्द वापरला नव्हता.

पुढे वाचा