माणसांना आपली अपत्ये शारीरिक, बौद्धिक, मानसिक, सामाजिक वगैरे दृष्टीने आदर्शवत् व्हावीत, निरोगी राहावीत असे वाटते. सर्वच सजीवांची पिल्ले सभोवतालच्या परिस्थितीशी जुळते गुण असले तर जास्त जगतात व जनतात. माणसे यात हेतुपुरस्सर, जाणीवपूर्वक काही करण्याचे प्रयत्नही करतात, हे माणसांचे वैशिष्ट्य. मुळात हे केवळ सजीव रचनांनी परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे एक अंग आहे पूर्णपणे नैसर्गिक आणि अपेक्षित. यामुळेच काही वर्षांपूर्वी पुण्याच्या डॉ. हे.वि. सरदेसायांचे घरोघर ज्ञानेश्वर जन्मती (किंवा तसल्या) नावाचे पुस्तक खूप लोकप्रिय झाले. त्याच काळात डॉ. स्पॉकचे बेबी ॲण्ड चाइल्ड केअर हे पुस्तक खपाबाबत बायबलशी स्पर्धा करत होते.
मासिक संग्रह: नोव्हेंबर, २००६
पत्रसंवाद
राजीव जोशींनी दोन कात्रणे व एक पत्र पाठवले आहे. मुद्दे महत्त्वाचे आहेत, पण एक कात्रण व पत्र इंग्रजीत आहेत. सारांशच देत आहोत.]
क)(लोकसत्ता, ३१ ऑगस्ट २००६, हज यात्रेचे अनुदान: आता लक्ष मुंबईतील याचिकेकडे, या बातमीवरून.) मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेली एक जनहितयाचिका सर्व प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपांनी धार्मिक कार्यांसाठी दिली जाणारी सरकारी मदत थांबवू पाहते. या याचिकेतील मागण्यांचा तपशील बातमीत आहे.
ख) (टाईम्स ऑफ इंडिया, ३१ ऑगस्ट २००६, युअर ब्रेन डझन्ट हॅव अ गॉड स्पॉट, या लेखावरून)
एक नवा अभ्यास दाखवतो की गूढवादी व धार्मिक अनुभवांसाठी मेंदूत एक ‘देव-स्थान’ नसते.
पुस्तक-परीक्षण एक होता कारसेवक
एक होता कारसेवक ही अभिजित देशपांडे यांनी सांगितलेली त्यांच्यातील कारसेवकाची कहाणी आहे. ६ डिसेंबर १९९२ च्या उन्मादी कारसेवेत अभिमानपूर्वक सहभागी होऊन मशीद पाडणारा हा कारसेवक ज्यावेळी अयोध्येहून परतला, त्यावेळी पेटलेला देश पाहून पुरता हादरला, नि तेथून सुरू झाला त्याचा अजूनही न संपलेला वैचारिक प्रवास. आपण ज्यासाठी अयोध्येला गेलो होतो, ते हेच होते का ? यातून आपल्याला किंवा कुणालाही काय मिळाले? हेच का ते रामराज्य ? या उन्मादाने देशाचे भले होणार म्हणतात ते कसे ? असे प्रश्न या विशीच्या युवकाला पडले.
ह्याची वृत्ती मुळातच चिकित्सक “धर्माची तपासणी” करणारी म्हणून तर सडेतोड युक्तिवादाने जानवे कधीच खुंटीला टांगून ठेवलेले.
स्त्रीजन्माची जैविक कहाणी
पुरुषी नजरेतून सुशिक्षित स्त्री
* अति-विद्येने स्त्रिया व्यभिचारी होतील.
* स्त्रियांस सोडचिठ्ठी द्यावयाची असेल तरच स्त्री-शिक्षणाचे अनुमोदन करावे.
* अनेक स्त्रिया करण्याची पुरुषांना आज मोकळीक आहे. आपल्या हातून कदाचित परदारागमन होते. स्त्रिया शिकल्या की त्या प्रश्न करतीलः “आम्हाला मोकळीक का नसावी?”
* स्त्रियांस शिकवून आपण भाकऱ्या भाजाव्या काय?
* स्त्रिया विद्वान झाल्यावर भ्रतार, आप्तपुरुष, वडील माणसे यांचा त्यांच्यावर वचक राहणार नाही.
* स्वयंवर, पुनर्विवाह, पुरुषासारखे अधिकार मागणे, यांकरिता स्त्री बंड करेल.
* बायका शिकू लागल्या तर त्यांचे नवरे मरतात.
* बायकांना शाळेत पाठवले तर पुरुषांच्या दर्शनाने भीडमर्यादा राहणार नाही.
सुप्रजननाचा इतिहास
अशी कल्पना करा की एक नवे वैज्ञानिक तत्त्व एका येऊ घातलेल्या आपत्तीची सूचना देते आहे, आणि त्या आपत्तीपासून वाचायचा मार्ग सुचवते आहे. तत्त्वाला अनेक अग्रगण्य वैज्ञानिकांचा, राजकारण्यांचा आणि मान्यवरांचा (Celebrities) आधार मिळाला आहे. अनेक दाते संशोधनासाठी देणग्या देत आहेत, आणि विख्यात विद्यापीठे संशोधन करत आहेत. आपत्तीबद्दल माध्यमे अहवाल देत आहेत. नवे वैज्ञानिक तत्त्व शालेय अभ्यासक्रमांत समाविष्ट केले गेले आहे. मी पृथ्वीच्या तापमानवाढीबद्दल बोलत नाही आहे मी शतकाभरापूर्वी घडलेली एक घटना सांगतो आहे.
त्यावेळी त्या वैज्ञानिक तत्त्वाला पाठिंबा देणाऱ्यांत थिओडोर रुजव्हेल्ट, वुड्रो विल्सन, विन्स्टन चर्चिल हे राजकारणी होते.
डिझायनर मुले
दोन किस्से सांगतो नवरा-बायकोस हवे आहे “उत्तम’ मूल. सर्वोत्तम असेल तर बरेच. गोरे, घाऱ्या डोळ्यांचे, कोणत्याही रोगाचा मागमूसही त्याच्या गुणसूत्रात नसलेले, बलवान,… वगैरे, वगैरे. यादी तशी मोठी आहे. यासाठी नवरा-बायकोस नैसर्गिकरीत्या मूल जन्मले नाही तरी चालणार आहे. म्हणजे दोघेही ‘नॉर्मल’ आहेत तरीसुद्धा. कारण ‘सर्वोत्तम’ मूल जन्माला घालायचे असेल तर त्यासाठी वेगळी पद्धत आहे. ‘इन व्हिट्रो’ पद्धत. यात स्त्रीबीज आणि पुरुष शुक्राणू तपासले जातील. त्यातील रोगट भाग काढून टाकला जाईल. ते ‘स्वच्छ, निरोगी’ केले जातील. मग दोन्ही एकत्र करून गर्भ तयार केला जाईल.
गावगाडा २००६ (भाग-२)
[सध्याच्या खेडेगावांमधील सामाजिक स्थितीवर गांवगाडा-२००६ या नावाने काही लेख प्रकाशित करण्याची इच्छा आम्ही गेल्या अंकात नोंदली. अनिल (पाटील) सुर्डीकर यांच्या लेखाचा एक भागही गेल्या अंकात प्रकाशित झाला. हा लेखाचा पुढील भाग दिवाळीनंतर येते कार्तिकी एकादशी, पंढरपूरची वारी. एकूण चार मोठ्या एकादश्या आषाढी, कार्तिकी, माही व चैत्री. त्यांपैकी जास्त मोठ्या आषाढी व कार्तिकी. हा इकडचा भाग विदर्भ-मराठवाडा ते पंढरपूर अशा मार्गावर येत असल्याने बहुतेक प्रत्येक गावात पंढरपूरला जाणारी कोणत्यातरी भागातील पालखी जाताना अथवा येताना ठेपतच असते. त्या दिवशी गावात गडबड असते.
आपल्याला पंढरपूरला जाता येत नाही पण निदान पंढरपूरची वारी करणाऱ्यांचे सत्कार करून त्यांचे तरी दर्शन घ्यावे, अशी भावना असते.
अज्ञाताचे दार
मला शंका, अनिश्चितता, अज्ञान सहन करत जगता येते. एखादी गोष्ट माहीत नसताना जगणे हे चुकीच्या उत्तरांसोबत जगण्यापेक्षा जास्त रंजक आहे. ही एक बाब मान्य करा आपण प्रगती करत असतानाच खात्री नसणेही सोबत येईल; पर्याय सुचण्याच्या, शोधण्याच्या संधीही येतील, (मग) आपण आजचे तथ्य, आजचे ज्ञान, आजचे केवल सत्य, यांबाबत फार उत्साही असणार नाही, प्रगती साधायला अज्ञाताचे दार किलकिलेच असायला हवे.
[भौतिकीचा तज्ज्ञ, नोबेल पुरस्कार विजेता रिचर्ड पी. फाइनमन, द सायन्स ऑफ गुड अँड ईव्हिल (The Science of Good and Evil, Michael Shermer, Henry Holt & Co.,