१. तुमच्या हातात चहाचा कप येतो. त्याच्यामागे काय-काय घडलेले असते?
कोणीतरी चहाच्या मळ्यात चहा पिकवत असते, कोणीतरी चहाची पानं खुडून, त्याच्यावर प्रक्रिया करून त्याची चहापत्ती बनवलेली असते.
मग ती बडे व्यापारी, छोटे व्यापारी, दुकानदार करत आपल्यापर्यंत येते. तिकडे ऊस शेतकरी, तोडणी कामगार, साखर कारखाना करत साखर घरी येते. आणिक कोणी म्हैस पाळतो, दूध काढून डेअरीला घालतो, पिशवी बंद होऊन आपल्याकडे येते. याशिवाय सिंचन व्यवस्था, पशुखाद्य, मोटारउद्योग, वाहतूक-व्यवस्था अशा अनेक गोष्टी असतात. चहाची भांडी, गॅस असतोच. कपबश्या असतात.
इतके सगळे होते आणि आपल्या हातात चहाचा कप येतो.