अगदी ११ सप्टेंबर २००१ लाही त्या दिवशीच्या अमानुष दहशतवादाने जेवढी माणसे मेली त्यापेक्षा जास्त एड्सने मेली. इतर सामान्य दिवशी तर एड्स आणि तसल्या रोगांनी मरणारे संख्येने बरेच जास्त असतात. ह्या रोगांना अवरोध करता येतो, रोग्यांना दुरुस्त करता येते आणि रोगांचे व्यवस्थापन करता येते. या तथ्यांमुळे दहशतवादाच्या विकारीपणाचे, विखारीपणाचे अवमूल्यन होत नाही, किंवा दहशतवादाला थोपवायची गरजही कमी होत नाही. पण ही तथ्ये हे अधोरेखित करतात की थांबवता येणारी पण थांबवली जात नसलेली रोगराई जास्त महत्त्वाची आहे.
[टाईम साप्ताहिकाने प्रिन्सिपल व्हॉईसेस नावाचा जगापुढील आह्वानांवर चर्चा घडवण्याचा आंतरराष्ट्रीय प्रकल्प हाती घेतला आहे. याचा भाग म्हणून २१ नोव्हेंबर २००५ च्या अंकात अमर्त्य सेन यांची एक त्रोटक मुलाखत छापली आहे. तिच्यातला हा प्रास्ताविकाचा भाग.]