शिक्षणाच्या प्रक्रियेत म्हणे दोन वेगवेगळ्या भूमिका वठवणाऱ्या गटांचा सहभाग असतोः शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान देतात आणि विद्यार्थी शिक्षकांकडून ज्ञान घेतात. पण प्रत्यक्षात प्रत्येक खुल्या मनाच्या शिक्षकाला हेही जाणवते की विद्यार्थीही शिक्षकांना ज्ञान देतात. कधी हे ज्ञानदान शिक्षकाच्या भूमिकेच्या गृहीततत्त्वांना आह्वान देण्यातून घडते, तर कधी शिक्षकाला न सुचलेले प्रश्न विचारून.
मी विद्यार्थ्यांना ईस्टर आयलंडचे समाज कसे कोलमडले ते सांगितले. विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नाची व्यामिश्रता माझ्या तोपर्यंत ध्यानात आलीच नव्हती ज्या झाडांवर आपले अस्तित्व आवलंबून आहे ती सर्व झाडे कापून टाकण्याचा आत्मघातकी निर्णय एखादा समाज कसा घेऊ शकतो ? एका विद्यार्थ्याने मला विचारले, “शेवटचे पामचे झाड कापणाऱ्याने झाड कापताना काय म्हटले असेल असे वाटते, तुम्हाला ?’
[जेरेड डायमंडच्या कोलॅप्स (पेंग्विन २००५) या पुस्तकाच्या व्हाय डू सम सोसायटीज मेक डिझास्ट्रस डिसिजन्स ? या प्रकरणातून]