अव्वल इंग्रजी अंमलातील शिक्षणविषयक आणि स्त्रीविषयक विचारातून निर्माण झालेले हिंगण्याचे ‘कर्वे विद्यापीठ’ विसाव्या शतकाच्या प्रारंभी एका मध्यमवर्गीय आकांक्षी शिक्षकाने आपल्या मुलींना शिक्षण देण्याचा निर्धार करणे. शंभर वर्षापूर्वी जन्माला आलेल्या बाळूताईंनी आपल्याला मिळालेल्या नव्या नजरेने स्वतःकडे, जगाकडे आणि उद्याच्या स्त्रीकडे पाहणे!
‘विभावरी शिरूरकर’ या वाययीन व्यक्तिमत्त्वाने कळ्यांचे निःश्वास, हिंदोळ्यावर, बळी, शबरी, खरे मास्तर अशा कथा कादंबऱ्यांची निर्मिती करणे. समाजाला हडबडून टाकणारे लेखन! विभावरीचे टीकाकार मध्ये सामाजिक प्रक्षोभाचे प्रतिसाद! बळी मध्ये तथाकथित गुन्हेगारी जमातीचे चित्रण स्त्रियांच्या प्रश्नावर समाजशास्त्रीय लेखन. विभावरीच्या साहित्यात विसाव्या शतकातील बदलत्या मध्यमवर्गीय स्त्रीजीवनाचे चित्र तिच्यासमोरील प्रश्नांचे आणि तिच्या व्यक्तिमत्त्वातील द्वंद्वाचे चित्रण! मनस्विनीचे चिंतन मधील स्त्रीच्या अंतरंगांविषयी प्रकट चिंतन ! या साऱ्याकडे आपण सारे मराठी वाचक एकविसाव्या शतकात कसे पाहतो? आजच्या सुधारकांचा विभावरीशी अन्वय आजच्या स्त्रीचळवळीला चिंतनाला विभावरीशी संवाद साधावयाचा आहे?