देशभक्ती (patriotism) आणि (nationalism) ह्या दोन शब्दांत फरक आहे. त्यांचा अर्थ आणि संकल्पना समजून घेतल्याशिवाय त्यांचा योग्य वापर होणार नाही.
ह्या शब्दांचा अर्थ समजून घेण्यासाठी आपण आपल्या अस्मितेचा अभ्यास केला पाहिजे. आपली अस्मिता ही आपल्या स्वप्रेमावर आधारित असते. मी, माझे देशबांधव, समाज ज्याच्याशी मी रक्ताच्या नात्याने बांधला गेलेलो आहे त्याच्यावरच्या प्रेमामुळे सर्व समाजाला ‘आम्ही’ म्हणले जाते. तर आपल्याशिवाय दुसऱ्याला ‘ते’ म्हणून संबोधले जाते. ‘आम्ही’वरचे प्रेम ही घन (positive) भावना आहे, तर ‘ते’ ह्या शत्रूरूप दुसऱ्यांच्या द्वेष करून मी माझे स्वप्रेम किंवा आम्हीवरचे प्रेम अभिव्यक्त करत असलो किंवा ते मजबत करत असलो तर तो अस्मितेचा ऋण आविष्कार होय. देशप्रेम ही ‘आम्ही’वरच्या प्रेम व्यक्त करणारी घन बावना आहे, तर राष्ट्रवाद हा त्या प्रेमभावनेबरोबरच ‘त्या’चा द्वेष करून आपली अस्मिता प्रगट करीत असतो.
राष्ट्रवाद ‘आपला’ असला तर ती देशभक्ती ठरते. तर दुसऱ्यांची तीच त्यांचय देशाबद्दलची भावना राष्ट्रवाद ठरते. देशावरची आपली निष्ठा, आपले देसावरचे प्रेम आणि तिचे समर्थन ह्या दोन्ही बाबी दोन्ही शब्दांत समान असल्या तरी बोलताना ‘आपल्या’ राष्ट्रवादाल देशभक्ती म्हटले जाते, तर दुसऱ्याच्या त्याच भावनेला राष्ट्रवाद संबोधण्यात येते. उदाहरणार्थ शिखांच्या स्वतंत्र राज्याच्या खलिस्तानच्या मागणीला आपण शिखांचा राष्ट्रवाद हा शब्द वापरू, तर शीख समाज ह्यालाच देशभक्ती म्हणतील. आपल्या दृष्टीने भिंद्रनवाले हे शीख राष्ट्रवादी ठरतात, तर अलगतावादी शिखांच्या दृष्टिकोनातून ते देशभक्त ठरतात. तामिळ एलमच्या श्रीलंकेच्या तामिळ अलगतावादींना श्रीलंकेतील आणि जगातील लोक तामिळ राष्ट्रवादी म्हणतात पण ते लोक स्वतःला तामळ देशभक्त मानतात. १८५७ च्या युद्धात जे लढले, त्यांना आपण देशभक्त महणतो आणि जे देशाकरता कामालशा एआले त्यांना हुतात्मे म्हणतो. त्यांनाच ब्रिटिश लोक बंडखोर म्हणतात, जास्ती जास्त भारतीय राष्ट्रवादी म्हणतील.
पण हा फरक फक्त भाषेपुरताच मर्यादित नाही. हो दोन शब्द मनाच्या दोन निरनिराळ्या अवस्था दर्शवतात. राष्ट्रवाद ही एक सुप्त शक्ती आहे आणि ती भावनिक असल्याने ती विवेकाधिष्ठित असत नाही. ती समंजस असत नाही. विवेकापेक्षा भावना प्रबळ ठरते. आपल्या लोकांशी भावनिक नाते हे ह्या शक्तीच्या मुळाशी असते. आपल्या जातीच्या, आपल्या रक्ताच्या संबंधातून ही भावना निर्माण झाल्याने ती प्राथमिक (primordial) स्वरूपाची भावना असते. ह्या असंमजस किंवा अतार्किक शक्तीचा (irrational force) अर्थ कळण्यासाठी हिटलर, बिस्मार्क किंवा माओ ह्यांनी ह्या शक्तीचा उपयोग कसा करून घेतला ह्याचा इतिहास नजरेखालून घालावा. ह्या उलट देशभक्ती ही विवेकाधिष्ठित/तर्काधिष्ठित (rational) भावना असून आपल्या देशावरचे प्रेम ती भावना व्यक्त करते. माझे देशावर प्रेम आहे, देशाकरिता मी तन, मन, धन अर्पण करण्यास तयार आहे. आणि जरूर पडल्यास देशाच्या रक्षणासाठी मी माझे प्राणही अर्पण करण्यास तयार आहे, ही भावना देशभक्तीत अंतर्भूत असते.एका अर्थाने देशभक्ती ह्या शब्दातून दातून त्याच भावनेची ऋण बाजू दिसते. स्वजातीवरील प्रेमापेक्षा परजातीवरचा द्वेष हेच एकमेव कारण देशाकरिता लढण्यासाठी असते असे नाही. देशभक्त हे स्वसंरक्षणार्थ लढतात हे खरे असले तरी, त्यांच्यात आत्मसमर्पणाची भावना (will to sacrifice) प्रबल असते, हेही लक्षात घेणे आवश्यक आहे.
साहजिकच राष्ट्रवाद ही भावना अतार्किक (irrational) असल्याने ती आक्रमक असते. आपला राष्ट्रवाद हा ‘त्यांच्या’ द्वेषातन निर्माण झालेला असतो. ‘माझ्या’ राष्ट्राचे प्रेम ह्यापेक्षा त्यांचा’ द्वेष ही भावना र देशभक्तीत देशप्रेम ही प्राथमिक भावना असते आणि त्यांचा’ द्वेष किंवा तिरस्कार, किंवा वर्णद्वेष इ. ऋण भावना असत नाहीत. त्यातूनच देशभक्ती आणि राष्ट्रवादातील तिसरा फरक स्पष्ट होतो. देशभक्ती ही संरक्षणात्मक असते, तर राष्ट्रवाद हा आक्रमक असतो. प्रश्न असा पडतो की देशभक्तीने प्रेरित झालेले सैनिक शत्रुपक्षाला मारतातच की? पण हे मारणे ही संरक्षणात्मक बाब असते. ह्या उलट राष्ट्रवाद आक्रमक असल्याने त्यांना मारणे हे राष्ट्रवादी आपले कर्तव्य समजतो. म्हणूनच ज्यूंना मारणे हे हिटलर आपले कर्तव्य समजत होता. (पण तो भाषा मात्र देशभक्तीची वापरत असे.) आक्रमण करणारा राष्ट्रवादी देश म्हणूनच नेहमी आत्मसंरक्षणार्थ लढत असल्याचे म्हणत असतो. म्हणूनच हिंदुत्ववादी भाषा देशभक्तीची करतात पण बाबरी मस्जिद पाडणे इ. आक्रमक गोष्टी करून आपला राष्ट्रवाद सिद्ध करत असतात. हिंदूंच्या प्रेमापेक्षा इतरेजनांचा, विशेषतः मुस्लिमांचा द्वेष हे त्यांच्या राष्ट्रवादाचे सूत्र आहे.
देशभक्ती ही प्रेमावर आधारलेली असल्याने ही युद्धविरोधी असते. ह्या उलट राष्ट्रवाद हा युद्धखोर असतो. अमेरिकन राष्ट्रवादाचे उदाहरण आपल्या समोर ताजेच आहे. आपल्या हितांसाठी अफगाणिस्तान, इराक ह्या देशांवर युद्ध लादण्यास अमेरिकेने कमी केले नाही. संपूर्ण अमेरिकन परराष्ट्र धोरण हे अमेरिकन राष्ट्रवादावर आधारित आहे. पण तेही हिटलरप्रमाणे भाषा जगाची वापरतात.
जगाच्या भल्याकरिता (वाचा ‘अमेरिकेच्या भल्याकरिता) अमेरिका आक्रमण करत असते. अमेरिकेचा कोणताही निर्णय हा जगाच्या फायद्याकरिता असतो. त्यातला अमेरिकन राष्ट्रवाद अध्याहृत असतो.
[राष्ट्र आणि राष्ट्रवाद याबद्दल देशमुखांचा लेख पुढे प्रकाशित करू. सं.]
देशमुख हॉस्पिटल, उदगीर ४१३ ५१७