… एका सांसदीय वादविवादात चर्चिलने आपली वास्तवावरील पकड दाखवून दिली. संरक्षणखर्च का वाढवावा, हे सांगताना तो म्हणाला, “…आपण क्षीण वारसा आणि निरागस इतिहास असलेले तरुण समाज नाही आहोत. आपण जगाची संपत्ती आणि व्यापार यांचा सर्वथा प्रमाणाबाहेर भाग स्वतःसाठी हडपला आहे. आपण हवे तेवढे भूक्षेत्र घेतले आहे. ही आपली मालमत्ता हिंसेने कमावलेली आणि प्रामुख्याने बळजोरीने राखलेली आहे. आम्हाला ही सत्ता शांतपणे भोगू द्या, हा आपला दावा आपल्याला जितका विवेकाधारित वाटतो, तेवढा इतरांना बहुतेक वेळी वाटत नाही.”
यातील शब्दप्रयोगांचे स्पष्टीकरण भारतात द्यायची गरज नाही. ‘प्रबोधित राष्ट्रांनी आत्मसात केलेल्या स्वतःच्या इतिहासात मात्र ते वापरले जात नाहीत. ते इतर ‘थोर आदर्शाच्या परंपरे’ने विस्मरणात लोटले जातात. (पण) या परंपरेत श्रीमंतांनी “संपत्ती आणि व्यापार यांचा सर्वथा प्रमाणाबाहेर भाग स्वतःसाठी हडपणे” आहे. आणि त्या मालमत्तेचा अनिर्बंध उपभोग घेण्यासाठी आपापल्या जनतेला सराईतपणे भीती घालून ‘योग्य स्वसंरक्षणा’साठी संचालित करणेही आहे.
[निर्मलांशु मुकर्जी यांच्या डिसेंबर १३, टेरर ओव्हर डेमॉक्रसी (प्रोमिला अँड कं., नवी दिल्ली) या पुस्तकाला नोम चोम्स्कींनी प्रस्तावना दिली आहे. त्यातील काही भाग तहेलका (२३.७.०५) या साप्ताहिकात उद्धृत केला आहे, द अनमॉलेस्टेड एंजॉयमेंट ऑफ फिअर या नावाने. त्यातला हा भाग.]