पत्रसंवाद

प्रतिवाद करता आला असता. “भारतीय व इतर गरीब देशातील शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला” अशी अतिव्याप्त व टोकाची विधानेदेखील आसु मध्ये येण्याच्या पात्रतेची वाटत नाहीत. आपली निवड अधिक चोखंदळ असावी.
(२) संदर्भः महानगराची वाढ = झोपडपट्टीची वाढ १३४/आसु/जून २००५
महानगराच्या वाढीबरोबर झोपडपट्टीची वाढ होणारच, असे अटळ समीकरण बांधणे सोपे, पण चुकीचे आहे..
झोपडपट्टीत राहणाऱ्या बहुतेक सर्वांची आर्थिक क्षमता भाड्याने जागा घेऊन राहण्याची किंवा स्वतःचे लहानसे घर बांधण्याची असते. पण नागरी कमाल जमीन धारणा कायदा व भाडे नियंत्रण कायदा यामुळे कायदेशीरपणे भाड्याने देण्यासाठी चाळी बांधणे बंदच झाले, असलेल्या चाळींची देखभाल अशक्य झाली, व जमिनींच्या किमती अवास्तव वाढून स्वतःचे घर बांधणे अशक्य झाले. नगरपालिकेनेदेखील भाड्याने दिलेल्या घरांवर प्रचंड कर लादून भाड्याने घर देणे हा मूर्खपणा ठरवला. या कायद्यांचा हा अवांच्छित परिणाम (की इच्छितच परिणाम ?) लक्षात येऊनही अनेक दशके उलटली, पण अद्याप हे कायदे रद्द केलेले नाहीत.
अजूनदेखील भाड्याने देण्यासाठी घरे बांधण्यासाठी आयकर, संपत्तीकर, मालमत्ताकर यामध्ये मोठ्या सवलती दिल्या तर हा प्रश्न सुटण्यास मदत होईल. वस्त्र-गिरण्याची रिकामी होणारी जमीन यासाठीच वापरल्यास योग्य होईल. याउलट स्वतःच्या उपयोगासाठी मोठ्या क्षेत्रफळाची घरे बांधण्यावर जास्तीत जास्त संपत्तीकर, मालमत्ताकर व आयकर लादून तो पैसा, जागा व साधन-सामुग्री भाड्याने देण्याच्या घरांकडे वळवावा. मेधा पाटकर व इतर समाजवादी मंडळी झोपडपट्टी-निर्मूलनाविरुद्ध आंदोलन करताना या कायद्यविरुद्ध चकार शब्दही बोलत नाहीत – हा दांभिकपणा म्हणायचा, की ह्रस्व दृष्टी म्हणायची की अज्ञान म्हणायचे?

माझ्या जानेवारी २००५ च्या अंकातील काही आक्षेपांच्या विरुद्ध ललिता गंडभीर यांचे जून २००५ च्या अंकात पत्र आहे. आक्षेप १) प्रकृती उत्तम असूनही अशरीरी अनुभव येऊ शकतात. उत्तरः फुफ्फुसाने सजीवाच्या आयुष्यभर कार्य करावे अशी त्याची उत्क्रांती झाली आहे. त्याला विश्रांतीची गरज नाही. प्राणायामाचा मेंदूच्या प्राणवायू पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाल्यावर जेव्हा ‘प्रकृती उत्तम’ उरत नाही तेव्हाच असे अनुभव येतात. श्वासोच्छवास सुरू केल्यावर प्रकृती बहुतेकदा पूर्ववत होत असल्यामुळे ‘मधल्या काळात सुद्धा ती उत्तम असल्याचा गैरसमज होऊ शकतो. कलाकारांनी कधीही “मी माझे शरीर बाहेरून बघितले’ या अर्थाचे दावे (अशरीरी अनुभव) केलेले नाहीत. असे अनुभव केवळ रोग किंवा प्राणायामुळे ‘आजारी’ पडलेल्यांनाच येतात.
“ज्या आजारांमध्ये मेंदूमध्ये हिस्टॉलॉजिकल बदल नसतात त्यांच्याविषयी आपल्याला अगदीच कमी ज्ञान आहे” या गंडभीर यांनी मांडलेल्या सत्यावरून असे सिद्ध होते की अशरीरी अनुभव येणारे आणि तरीही निरोगी भासणारे लोक निरोगी नसण्याची शक्यता आहे. देव मानणारे सगळे लोक मनोरुग्ण असल्याचे सिद्ध करता येईल तो सुदिन. आक्षेप २) ‘जगाबाहेरचे अनुभव’ हा शब्दप्रयोग अयोग्य आहे आणि गंडभीर यांनी तो केलेला नाही. उत्तरः अशरीरी अनुभवांत जाणविणाऱ्या वस्तू (उदा. देव, इ.) या जगात आढळत नाहीत. हे अनुभव या जगाच्या नियमांच्या
पलिकडील भासल्यामुळे त्यांना जगाबाहेरचे म्हणणे योग्य आहे. सप्टेंबर २००४ च्या अंकात पान २८३ वरील गंडभीर यांच्याच पत्रातील तिसऱ्या परिच्छेदाच्या पाचव्या ओळीत “ती आता दुसऱ्या जगात गेली आहे’ हे वाक्य आहे. शरीराबाहेर न जाता होऊ न शकणारे, परंतु ‘आऊट ऑफ बॉडी अवस्थेतून’ होणारे, असे ज्ञान (उदा. पाठीमागचे, खोलीबाहेरचे दिसणे) अशरीरी अनुभवांचा दावा करणाऱ्या व्यक्तीला झाल्याचा एकही पुरावा नाही. अशा दाव्यांमध्ये रुग्ण त्याच वस्तूंचे वर्णन करतात ज्या त्यांनी पडल्यापडल्या, बेशुद्ध होण्याआधी/नंतर (अजाणता किंवा लबाडीने) अनुभवलेल्या असतात. आऊट ऑफ बॉडी अनुभवांमधील धार्मिक भाग रुग्णाच्या धर्माशी सुसंगतच असतो. हिंदू रुग्णाला ग्रीकांच्या कल्पनेतील स्वर्गाच्या वाटेवरील कॉकिटस नदी दिसत नाही. असे लक्षशलींळींश अनुभव अवैज्ञानिक असतात. वैमानिक नसलेल्याला संमोहनाद्वारे विमानात असल्याचा भास निर्माण करून विमान चालविण्यास सांगितले तर तो कारचे स्टीअरिंग धरल्यासारखा वागतो, किंवा पृथ्वीपेक्षा प्रगत परग्रहवासीयांशी संपर्क झाल्याचा दावा करणाऱ्यांना परग्रहवासीयांनी दिलेल्या भेटवस्तू मात्र पृथ्वीवरच्या प्रगतीएवढ्याच असतात, तसेच हे आहे.
‘बेशुद्धीचे औषध असलेल्या कीटामीनमुळे आऊट ऑफ बॉडी अनुभव येतात, अॅट्रोपिनमुळे उडण्याचा भास होतो. अॅम्फिटामाईन्समुळे वय कमी झाल्यासारखे वाटते, डायमिथाईलट्रिप्टामिनमुळे जगाच्या तुलनेत स्वतःचा आकार सूक्ष्मरूप किंवा महाकाय भासतो, ङ..ऊ मुळे आत्मा ब्रह्माशी एकात्म झाल्यासारखे वाटते.” असे कार्ल सेगानने ब्रोकाज ब्रेन या पुस्तकात दिलेले आहे. ही नशेची औषधे मानवी शरीरात नैसर्गिक पद्धतीने निर्माण होणारच नाहीत असे म्हणणे धोक्याचे आहे कारण अफूसारखी रसायने मेंदू स्वतःसाठी निर्माण करतो असे आधीच सिद्ध झालेले आहे. अशी अनुभूती सत्य नसून भ्रामक असते. ते रोगाचे लक्षण आहे. अन्यथा दोरीला साप समजणेसुद्धा विवेकवादात बसेल. आक्षेप ३) रिडक्शनिझमनेच इिथे माझा ‘च’ ला आक्षेप आहे. रिडक्शनिझमही ज्ञान मिळवण्यासाठी आवश्यक व उपयोगी आहे, ही मांडणी मला जास्त नेमकी वाटते. सं.(नंदा खरे) जगाचे आकलन होऊ शकते याचा आधार काय आहे ? उत्तरः जगाचे काही नियम नसतील असे मानले तरीही त्या काल्पनिक परिस्थितीतसुद्धा, मर्यादित ज्ञानक्षमता असलेल्या सजीवांना ‘नियम नाही’ या सत्याचे आकलनच होऊ शकत नाही. हा माझा युक्तिवाद आहे. समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यासाठी, भासमान का होईना, परंतु जगाचे आकलन आवश्यक आहे त्यामुळे रिडक्शनिझमला पर्याय नाही. ‘जेवढे संशोधन असेल तेवढेच तात्पुरते सत्य आहे’ असा पवित्रा घेण्याचा माझा आग्रह आहे. ‘मेंदूमध्ये रासायनिक अभिक्रियांव्यतिरिक्त काही मन असू शकेल’ असे काहीही संशोधन नाही किंवा असे दूरान्वयानेसुद्धा सुचविणारा पुरावा नाही. आक्षेप ४) अमेरिकेतील डॉक्टर योग, ध्यान, प्राणायाम, अध्यात्म, धर्म इ. सुचवितात. उत्तरः अमेरिका हे विवेकवादाचे नंदनवन नाही. अमेरिकन शब्दप्रामाण्याची कास आ.सु.च्या वाचकांनी धरू नये. सुधारकाच्या elite वाचकांची मते अशी असतील तर सुधारकांपुढील आव्हान वाटते त्यापेक्षा प्रचंड आहे. मी वैज्ञानिक वैद्यकाचा वापरकर्ता व्यावसायिक आहे. त्यापलिकडे केवळ भोंदू (ििरलज्ञी) असतात हे माझे प्रतिपादन आहे.
प्लॅसिबोचा अंतर्भाव नसलेले प्रयोग वैज्ञानिक नसतात. म्हणून ध्यानविषयक प्रयोग अवैज्ञानिक असतात. आक्षेप ५) किमान काही आजाऱ्यांना प्राणायामाचा फायदा होतो, उत्तरः मन आणि शरीराचा संबंध सर्वांनाच मान्य आहे. परंतु प्राणायामाचा मनाशी संबंध सिद्धच झाला नाही. प्राणायाम, योगासने
यामुळे शारीरिक व्यायाम होईल, ध्यानाचा प्लॅसिबो-परिणाम होईलही. परंतु धर्मामुळे कत्तली होतील. बाकी त्यात काही नाही. “मी सजीव आहे असे मला समजले’ या वाक्याचा असा अध्याहत अर्थ होतो की ‘श्वास रोखणे आरोग्याला वाईट आहे’. आजाऱ्यांना त्याचा तोटाच होऊ शकतो.
निखिल जोशी, तत्त्वबोध, हायवे, नेरळ, (रायगड) ४१० १०१.

लोकार्थी विज्ञानप्रसारासाठी ते सुगम पाहिजे. व्याख्याने, प्रकाशने, प्रदर्शने इत्यादी विविध उपक्रम हवेत. दरवर्षी मराठी विज्ञान परिषदेचा विचार झाला. संघटन उभारले गेले. जमीन, द्रव्यनिधी यांसाठी खटपटी करून संस्थेचे विज्ञान भवन (पुरव मार्ग, मुंबई ४०० ०२२) सुरू झाले. कित्येकांनी सहकार्य व सहाय्य दिल्याने संस्था समर्थ झाली. त्यांत माझाही सहभाग होता.
काही जुन्या सूचना पुन्हा मांडतो. मराठीने इंग्रजी विरामचिन्हे घेतली. पाठ्यपुस्तके व मराठी विज्ञान परिषद यांनी जागतिक अंक स्वीकारले. अन्यत्र सहसा देवनागरी लिहितात. (जागतिक नऊ) (देवनागरी एक) समान दिसल्याने घोटाळे होतात. सर्वत्र जागतिक अंक लिहावेत ते विविध साधनांवर (उदा. फोनतबकडी, नाणी) असल्याने परिचित आहेत. देवनागरी लिपी बरीचशी ध्वनिनिष्ठ आहे. काना, अनुस्वार, मात्रा, विशिष्ट अक्षरे इत्यादींमुळे देवनागरी शब्द संक्षिप्त होतात. रोम लिपीतील मराठी लेखन पसरट होते. पण ती लिपी एकस्तरीय असून माहिती-संचयात (उदा. फोनबुके) शब्द शोधण्यास सोपी आहे. एके काळी मी या लिपीचा एकांडा प्रचारक होतो. कित्येक लोक आता त्यांच्या मर्जीनुसार रोमन लिपीत मराठी ईमेल लिहितात. इंग्रजीच्या यंत्रातील उपलब्ध चिन्हे वापरून रोमन लिपी पुरेशी धनवनिनिष्ठ व प्रमाणित करावी. गरज भासली तर अवश्य वापरावी.
मराठी भाषा शक्य तितकी सोपी करावी. (आठ पूर्णांक चार दशांश) ऐवजी (आठ बिंदु चार = एट पॉइंट फोर) असे इंग्रजीनुसार सुगम शब्द घ्यावेत. (अमेरिकेपासून) हा लांबलचक आहे. (अमेरिका) (पासून) असे अलग, कोशसुलभ, छोटे शब्द असलेली सुगम भाषा प्रारंभी शिकवावी. विज्ञानातही (एक वर्ष = ३६५ दिवस असे) सुगम पण जरा चुकीचे आरंभी सांगतात. ऋषी ऐवजी रुशी शब्द घ्यावा, अ, आ, ए, ओ हे स्वर उच्चारात हस्व व दीर्घ होतात पण लेखनात समरूप असतात. इ-ई उ-ऊ हा दुहेरीपणा नको. इंग्रजीत -हस्वदीर्घ तरतूद असूनही (हिंदी) या शब्दांच्या स्पेलिंगमध्ये दोन्ही इकार समान असतात. (दीन)चा अर्थ (दिन, दीन) संदर्भाने समजेल. कधीकधी गायनात हस्व स्वर दीर्घ होतो. ॲ ऑ यांना स्वरमालेत स्थान नाही. कॅमेरा, कॉफी या शब्दांचे कोशातील स्थान समजत नाही. कित्येक कोशात असे शब्द नसतात व मग भाषा शब्ददरिद्री राहते.
म. ना. गोगटे, ४, पवन अपार्टमेंट, लक्ष्मी पार्क, नवी पेठ, पुणे ४११०३० इ-मेल पत्ताः mngogate@vsnl.com

विजेच्या तुटवड्यामुळे लोकांना अतोनात त्रास होत आहे. याबाबत महत्त्वाचे प्रश्न उभे राहतात. १. ऊर्जेचा ताळेबंद : भारनियमनावर ‘मात’ करण्यासाठी इन्व्हर्टरचा वापर होतो. भारनियमन नसते अशा वेळी बॅटरीत वीज साठवून भारनियमनाच्या वेळी इन्व्हर्टरद्वारे वापरण्यात येते. भारनियमन नसताना होणाऱ्या विजेच्या नियमित घरगुती उपयोगाच्या वापरासोबतच भारनियमनकालीन वापरासाठी विजेची साठवणूक करण्यासाठी इन्व्हर्टरने अतिरिक्त विजेचा वापर करून भारनियमनाच्या उद्दिष्टाला बगल देऊन दिली जाते. सर्वांनी इन्व्हर्टरचा वापर केला तर भारनियमन निरर्थक होईल.
कोणतीही यंत्रणा १०० टक्के सक्षम नसते. इन्व्हर्टरने बॅटरीचे चार्जिंग करण्यासाठी वापरलेल्या ऊर्जेपैकी थोडी कमी उदा. ७० टक्के वीजच बॅटरीत साठविली जाते आणि ३० टक्के वीज वाया जाते. बॅटरीत साठविलेल्या या विजेच्या उपकरणांसाठी वापर करताना पुन्हा त्याचा ७० टक्के (म्हणजे साठवणी करण्यासाठी होणाऱ्या मूळ वापराच्या ५० टक्के) वीजच उपयोगात आणता येते आणि उरलेली वीज वाया जाते. भारनियमनकालीन वापरासाठी भारनियमन नसताना साठविण्यात आलेल्या विजेच्या ५० टक्के वीजच वापरयोग्य असते. उदा. जर भारनियमनकाळात १०० वॉट विजेची बचत होण्याची अपेक्षा असेल आणि या भारनियमनाला बगल देण्यासाठी इन्व्हर्टरचा वापर झाला तर भारनियमन नसताना घरगुती वापरासोबतच जी अतिरिक्त २०० वॉट वीज इन्व्हर्टरसाठी खर्च होईल त्यापैकी भारनियमनकाळात १०० वॉट वीजच वापरता येईल आणि १०० वॉट वीज अक्षरशः वाया जाऊन तुटवडा वाढेल. २. संसाधनेः ज्यांच्याकडे साधनसामुग्री आहे, असेच याचा वापर करू शकतात. भूगर्भातील पाण्याबाबत अशीच परिस्थिती आहे. जे पाणी साठवण्यासाठी लक्षावधी वर्षे लागली. त्याची मालकी सार्वजनिक आहे. ज्यांच्याकडे मोठ्या अश्वशक्तीची मोटारीची क्षमता आहे त्यांनी समाजाचे पाणी खासगी शेतात/बंगल्यात खेचल्याने पाण्याची पातळी खाली जाते आणि सर्वच समाजाचे नुकसान होते. अत्यावश्यक सेवा वगळता इन्व्हर्टरचा वापराच्या प्रश्नीसुद्धा साधनसंपत्तीच्या न्याय्य वाटपाचा विचार होणे आवश्यक आहे.
३. सुसंवादः समाजाच्या विविध स्तरांमध्ये सुसंवाद असणे लोकशाहीला अत्यंत आवश्यक आहे. नरहर कुरुंदकर म्हणतात, “समाजजीवनातील प्रश्न, राजकारणातील प्रश्न जनतेला समजावून सांगावेत, हा आमच्या राजकारणाचा कधीच दंडक राहिला नाही.” (जागर, पान ३०) संवाद नसल्यामुळे येणारी दरी फक्त नेते-जनता यांच्यापुरती मर्यादित नसून, डॉक्टर-रुग्ण, वकील पक्षकार, दुकानदार-ग्राहक अशा अनेक पातळ्यांवर अस्तित्वात आहे. रुग्णावर डॉक्टरांनी उपचार करण्यापूर्वी रोग, त्यावरील विविध उपाय यांची सविस्तर माहिती रोगी आणि नातेवाईकांना देणे (Informed consent) हे डॉक्टरांचे कर्तव्य असते. १० मिनिटांचा संवाद टाळला तर ग्राहक मंचापुढील तक्रारीपायी १० वर्षे खर्ची पडतात हे डॉक्टरांना स्पष्ट झाले आहे. बार कौन्सिलपुढे अधिकाधिक प्रकरणे जात आहेत. त्यामुळे वकील-पक्षकार या पातळीवरसुद्धा लक्षणीय सुधारणा अपेक्षित आहे. मात्र विक्रेते-ग्राहक या पातळीवर खूप सुधारणा आवश्यक आहे. वीज तुटवड्यासारख्या संवेदनशील प्रश्नी या संवादाची अत्यंत
आवश्यकता आहे. बहुराष्ट्रीय कंपन्याऐवजी स्थानिक तंत्रज्ञ/कारागीर यांना प्रोत्साहन द्यावयाचे असेल तर ही दरी अडचण ठरू शकते. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तुलनेने स्थानिक तंत्रज्ञ/कारागीर यांना कच्च्या मालाच्या काही अडचणी येणार हे स्पष्ट आहे. स्थानिक बनावटीची वस्तू नावाजलेल्या कंपन्यांच्या वस्तूंइतकी दीर्घकाळ कार्यरत राहीलच असे नाही; परंतु ती तुलनीय मापदंडा (specifications) ने कार्यरत असणे आवश्यक आहे. उदा. नावाजलेल्या कंपनीच्या चारचाकी गाडीला स्थानिक दीड-दोन चाकी गाडी हा पर्याय असत नाही. नावाजलेल्या कंपनीच्या बॅटरीइतक्याच प्लेटस् स्थानिक बॅटरीत वापरल्या तरी वीज साठविण्याची क्षमता मात्र ६०-७०% एवढीच असते (उदा. २५-२७ प्लेट्सची नावाजलेल्या कंपनीची बॅटरी १८० अह वीज साठविते परंतु तितक्याच प्लेटस् असेलल्या स्थानिक बॅटरीची क्षमता १२० अह एवढीच असते), नावाजलेल्या कंपनीचा इन्व्हर्टर ६ अॅम्पिअर वीज चार्जिंगसाठी पुरवितो परंतु स्थानिक इन्व्हर्टरची क्षमता सर्वसाधारणतः २-३ अॅम्पिअर चार्जिंगपुढे जात नाही, इतकेच नव्हे तर एकूण अपेक्षित वापर किती, त्यासाठी किती अॅम्पिअरने किती वेळ करावे लागेल ; प्रत्यक्षात किती वेळ शक्य आहे, याची साधी आकडेमोडही केली जात नाही, ग्राहकांना याची माहिती देणे तर दूरच! विजेच्या तुटवड्याच्या प्रश्नी काही प्रक्षोभक आंदोलने झाली त्यामागे, इतर कारणांच्या जोडीला, संसाधनांच्या उपलब्धतेमधील विषमता, विसंवादातून येणारी दरी आणि उद्विग्नता ही कारणेसुद्धा असू शकतील. वीज प्रश्नाच्या चर्चेत या अंगांचाही विचार अत्यावश्यक आहे ही बाब आपल्यावाचकांपुढे मांडली जावी.
राजीव जोशी, तत्त्वबोध, हायवे, नेरळ, (रायगड) ४१० १०१.

अँब्रोज बिअर्स ह्याच्या व्याख्यासंबंधी ऋरळींह ला पर्यायी शब्द निष्ठा हा शब्द अधिक योग्य वाटतो. श्रद्धा आणि निष्ठा यांच्या शब्दार्थांत थोडासा भेद जरी असला तरी वजनांत बराच फरक आहे त्याचप्रमाणे ठरींळेपरश्र ला व्यवहारवादी हा शब्द अधिक योग्य. विवेकी व्यक्ती ही विचारी असते. अनेकदा ते विचार हे आदर्श असतात. पण ते आभाळातील असतात, जमिनीवरचे नसतात. वास्तववादी विचार हे जमिनीवरचे असतात. त्यामुळे ते विचार हे व्यावहारिक असतात.
श्रद्धा ही अनुभवावरून ठरते. एखाद्या व्यक्तीबद्दल असे अनेक चांगले अनुभव सतत येत गेले तर त्या व्यक्तीबद्दल आपल्या श्रद्धेचे रूपांतर त्या व्यक्तीविषयी निष्ठेत रूपांतर होते आणि त्याची शेवटची अवस्था ही अंधश्रद्धेत होते. व्यवहारवादी व्यक्तीला जे अनुभव येतात. ते बरे-वाईट दोन्ही प्रकारचे असतात. जगामध्ये तो ठोकर खाता-खाता ठोकर मारायला शिकतो. सत्य परिस्थिती सांगितली तर संबंध बिघडतात हे त्याच्या ध्यानात येते. ह्यासाठी तो गुळगुळीत, अर्धसत्य, असत्य, नरो वा कुंजरो वा असे बोलतो व संबंध बिघडू देत नाही. रॅशनलिस्ट हा कितीही रॅशनल असला तरी तो आपल्या आईला माझा बाप कोण हा प्रश्न कधीच करत नाही. त्याची त्याच्या आईच्या शब्दावरती निष्ठा, श्रद्धा असते आणि ह्याचा खरेपणा पडताळून पाहण्यासाठी त्याने डीएनए टेस्टचा आधार घेतला असे आजपर्यंतचे उदाहरण जगात एकही नाही.
‘राष्ट्रवादाचे पुनर्मूल्यांकन’ या लेखासंबंधी कुमार केतकर ह्यांनी देशवासीयांच्या काही कृत्याबद्दल लाज वाटते असे ते म्हणतात पण त्या लज्जास्पद कृतीबद्दल त्यांनी ठोस कार्य असे काय केले ? प्रत्यक्षात कृतीविरुद्ध काय केले ? बंदिस्त, एअरकण्डिशण्ड केबिनमध्ये बसून एक निषेध करणारा शब्दाचे मायाजाल पसरून एक लेख लिहिला असे म्हणणे योग्य नाही का ? अशा लज्जास्पद कृती जिथे होत होती तेथे महात्मा गांधी, पंडित नेहरू, आ. विनोबाजी, जयप्रकाश नारायण ही मंडळी स्वतः जात असत व परिस्थिती योग्य त-हेने हाताळून शांत करत असत.
ज्या देशात जन्म होतो त्याचे नागरिकत्व आपोआप मिळते, हे संपूर्ण सत्य नाही. सौदी अरेबियामध्ये राहणाऱ्या अनिवासी भारतीय दांपत्याला जर तेथे अपत्य झाले तर त्या अपत्यास तेथील नागरिकत्व मिळत नाही. तेथील नागरिकत्व अरेबियासाठी काही अतिविशिष्ट, विलक्षण काम करणाऱ्या गैर सौदीअरबासच मिळते. अमेरिकेमध्ये लाखोंनी ग्रीनकार्डहोल्डर्स भारतीय आहेत; पण केवळ हजारोच भारतीयांना अमेरिकन नागरिकत्व मिळाले आहे. परिस्थितीमुळे ते अमेरिकेतच राहतात. त्यांनी अमेरिकन जीवनपद्धती आत्मसात केलेली असते. त्यांच्या अपत्यांना जन्मजात अमेरिकन नागरिकत्व मिळालेले असते. त्यामुळे त्यांना अमेरिकेबद्दल भारतापेक्षा अधिक प्रेम असते, जे स्वाभाविकच असते.
देशभक्ती आणि राष्ट्रवाद ह्या एका नाण्याच्या दोन बाजू होत. प्रखर देशभक्तीतून प्रज्वल राष्ट्रवादी तयार होतो. राष्ट्रवादी असण्यासाठी रक्त सांडण्याची आवश्यकता नसते. देशप्रेम, देशभक्ती ह्यातून निघालेला राष्ट्रवाद हा आर्थिक बौद्धिक परिश्रमातून त्यागातून, निर्माण होतो. ह्यासाठी जातीचे धर्माचे बंधन नसते.
[ साधारण वापरानुसार ‘निष्ठा’ म्हणजे श्रूरश्रीं, ‘श्रद्धा’ म्हणजे षरळींह, “विवेक’ म्हणजे ‘शिरीप, “विवेकी’ म्हणजे rational आणि ‘विवेकवादी’ म्हणजे rationalist. आपण ‘व्यवहारवादी’ म्हणून जे ‘गुळगुळीत, असत्य’ वगैरे सांगता, तो शुद्ध बोटचेपा अवसरवाद आहे. विवेकवाद समजून घ्यायला ‘पायवा’ हे सदर सुरुवातीच्या अंकापासून वाचणे उपयुक्त ठरेल. वृत्तपत्री लेखन हीसुद्धा कृतीच आहे. सर्वांनी गांधी-नेहरू-विनोबा पद्धतीनेच कृती करावी, किंवा इतर पद्धती म्हणजे कृतीच नव्हेत असे मानणे हा दुराग्रह होईल. ‘देशभक्ती’ आपल्या देशातल्या व्यक्ती व परिस्थिती यांच्या सुधारणेसाठी, सुखासाठी धडपडते. ‘राष्ट्रवाद’ अपरिहार्यपणे इतर देशांच्या संदर्भातच कार्यरत होतो. आणि या बाबी ‘नाण्याच्या दुसऱ्या बाजूं’सारख्या नक्कीच नाहीत. देशभक्ती आणि राष्ट्रवाद एकत्र येणे आवश्यक नाही, हे मात्र इतिहासात वारंवार दिसते. सध्या चर्चेत असलेले जिन्ना राष्ट्रवादी होते पण त्यांची ‘भक्ती’ मात्र मुंबईप्रेमाखेरीज दिसली नाही]
दि.श्री. भट, ‘माऊली’, भटवाडी, श्रीधर नगर, पो. साईनगर, अमरावती – ०७. फोन ०७२१-२५२०६३७, इ-मेल : ati_dsbhat@sancharnet.in

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.