उदारीकरणाने ठोक राष्ट्रीय उत्पाद वाढण्याची गती वाढते, हा देसाईंच्या युक्तिवादाचा गाभा आहे. आणि हे गती वाढणे कार्यकारणाच्या तर्कावर नव्हे तर निरीक्षणावर आधारित आहे. १९९१ नंतर वाढीचा दर ५.२% झाला, तर आधीच्या चाळीस वर्षांत तो ३.७% होता.
पण केवळ राष्ट्रीय उत्पादाच्या वाढीने काय घडते, त्याची गुणवत्ता काय, परिणाम काय, यावर देसाई कुठेच काही म्हणत नाहीत. गेल्या काही वर्षांतील वाढीमुळे बेरोजगारीही वाढली आहे, विषमताही वाढली आहे, असल्या काळजीत पाडणाऱ्या अंगांबद्दलही देसाई प्रश्न विचारत नाहीत. भारताची सर्वांत मोठी, महत्त्वाची उपलब्धी जी लोकशाही, तिच्यावर या वाढीचे तेजाबासारखे होणारे परिणामही देसाईंना शंकास्पद वाटत नाहीत.
लॉर्ड मेघनाद देसाई हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक आहेत, व पूर्वाश्रमीचे ‘डावे’ आहेत. त्यांच्या ‘डेव्हलपमेंट अँड नेशनहुड’ (ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, २००४) या ग्रंथाचे परीक्षण प्रफुल्ल बिडवाईंनी २५ डिसें.च्या ‘तहलका’ साप्ताहिकात केले आहे. त्यातील हा उतारा.