जाने २००५ च्या अंकातील “पायवा”तील काही मतांचे स्पष्टीकरण मागतो आहे.
१) अध्यात्मावरील टीकेत “अध्यात्मिक ज्ञान हे केवळ पूर्ण श्रद्धावानासच प्राप्त होऊ शकते असे नमूद केले आहे. येथे आधुनिक भारतीय शिक्षणसंस्थाचा प्रवर्तक मॅकॉले याची एक गोष्ट सांगावीशी वाटते. हा गृहस्थ पूर्णतः भारतीय परंपरागत धर्मशिक्षणाचे (वेदपाठशाला इ.) समूळ उच्चाटण करून त्याऐवजी आधुनिक आंग्लशिक्षणाचे बीजारोपण करताना भारतातील सर्व धर्मशिक्षणकेंद्रे नष्ट करण्याचा प्रयास करी. एकदा आन्ध्रप्रदेशातील मंत्रालयम् येथील “श्रीराघवेन्द्रस्वामी” यांच्या तीर्थक्षेत्री जाऊन तेथील मठाधीन जमीन जप्त करण्यासाठी गेला असता त्यास साक्षात् राघवेन्द्र स्वामींचे दर्शन होऊन त्याने हिंदू धर्म स्वीकारण्याची इच्छा प्रकट केली; तेव्हा स्वामींनी त्यास “प्रथम चांगला ख्रिश्चन हो” असे सांगितले.
मासिक संग्रह: एप्रिल, २००५
‘तर्कशास्त्र’ : पूर्णपणे फसलेले लिखाण
काही दिवसांपूर्वी डॉ. संतोष ठाकरे ह्यांनी ‘अमरावती विद्यापीठाच्या बी.ए. अंत्य परीक्षेसाठी नेमलेल्या अभ्यासक्रमावर आधारित’ लिहिलेले तर्कशास्त्र हे पुस्तक वाचनात आले. पुस्तक वाचून हसावे की रडावे हेच समजेना. अलीकडच्या तरुण प्राध्यापक मंडळींना अल्पावधीतच आपल्याला मान्यता मिळावी ही इच्छा असते आणि ह्या इच्छेपोटी मग एखादा लेख, एखादे पुस्तक लिहिण्याचा उपक्रम हाती घेतला जातो. परंतु त्यासाठी आवश्यक असलेले परिश्रम घेण्याची मात्र त्यांची तयारी नसते. मग तुटपुंज्या माहितीच्या आधारे काहीतरी चुकीचे लिहिणे, कोणत्या तरी पुस्तकातून मजकूर चोरून पुस्तक सिद्ध करणे या मार्गांचा अवलंब केला जातो.
स्त्रियांचे पुरुषावलंबन नष्ट व्हावे
खाली दिलेला लेख आजचा सुधारक मध्ये प्रकाशित होण्यापूर्वी लोकसत्ता च्या २७-१०-२००४ च्या अंकात प्रसिद्ध झाला. तेथे तो ह्यापेक्षा थोडा विस्तृत होता. त्या लेखामधील काही तपशील ह्यात कमी केला आहे.
माझा लेख लोकसत्ता ने प्रकाशित केल्यानंतर त्यावर अनुकूल, प्रतिकूल टीकेचा भडिमार होईल अशी अपेक्षा होती. तेवढ्यासाठीच प्रस्तुत लेख आ.सु.मध्ये आधी प्रकाशित न करता जास्त खपाच्या वर्तमानपत्राकडे पाठविला होता. त्या लेखावर श्री. हुमणे ह्यांनी आमच्याकडे एक प्रतिक्रिया पाठविली. ती पुढे येत आहे.
मुळ लेख
गेल्या शतकात महाराष्ट्रात कुटुंबाच्या संदर्भात काही महत्त्वाच्या घटना घडल्या.
स्त्रियांवरील अत्याचार
गेल्या वर्षाच्या उत्तरार्धात बंगलोरमधील एका महिला संघटनेने स्त्री-सखी मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यात अनेक स्त्री-पुरुषांनी महिलाविषयक प्रश्नांवर चर्चा केली, अनेक नवीन प्रश्नांना वाचा फोडली. या मेळाव्यातील श्रोत्यांच्या सहभागासाठी एक नावीन्यपूर्ण उपक्रम योजला होता. आयोजकांनी काही महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फुटावी म्हणून असे प्रश्न वेगवेगळ्या चिठ्यांवर लिहून ते श्रोत्यांमध्ये सोडत पद्धतीने वाटले. नंतर त्या श्रोत्यांनी या प्रश्नांना यथायोग्य उत्तरे दिली. त्यातल्या एका प्रश्नाला एका प्रथितयश श्रोत्याने दिलेले उत्तर ऐकून मी पुष्कळ अस्वस्थ झालो. शिवाय त्या उत्तरावर काहीच प्रतिक्रिया किंवा आक्षेप, विशेषतः सहभागी स्त्रियांकडून, न आल्याने मनात खंत निर्माण झाली.
नागरीकरण विशेषांकातील पत्रांना उत्तरे
विशेषांकाचे बहसंख्य वाचकांनी स्वागत केले. काहींनी पत्रे पाठवून तर काहींनी प्रत्यक्ष भेटीत प्रतिक्रिया दिल्या. नागरीकरणाचा विषय सर्वांनाच महत्त्वाचा वाटला हे विशेष. अपवाद फक्त श्री प्रभाकर करंबेळकर यांचा. खरे म्हणजे नागरीकरण आणि नागरीकरणाच्या अभावाचे परिणाम हे जगातील सर्वांनाच स्पर्श करणारे आहेत. नागरीकरण काही फक्त आधुनिक काळाचा विषय नाही. ती एक अत्यंत सावकाशीने, हजारो वर्ष उत्क्रांत होत गेलेली प्रक्रिया आहे. नगरांकडे भौतिक रचना म्हणून किंवा एक सातत्याची प्रक्रिया म्हणून बघता येते. नगरांच्या प्रक्रिया-स्वरूपाला उठावदार करण्याचा प्रयत्न विशेषांकात केला होता.
पाटणकर यांनी लोथल वा दिल्लीसारख्या शहरांची व्याप्ती किती होती हा प्रश्न उपस्थित केला आणि आधुनिकपूर्व काळात शहरे फार काही मोठी नसावीत असे मत मांडले.
सिंहस्थ कुंभमेळा: शोध आणि बोध
दर बारा वर्षांनी महाराष्ट्रात, त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे एकाच वेळी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. ऑगस्ट २००३ ते ऑगस्ट २००४ ह्या मागील वर्षात हा धार्मिक सोहळा येथे पार पडला. सदर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शोध घेण्याचा हा छोटेखानी प्रयत्न.
कुंभमेळा भरण्याबाबत काही कथा ‘कुंभमेळा’ ह्या उत्तम कांबळे लिखित पुस्तकात आहेत. पैकी पुढे दिलेली कथा ही चारही (प्रयाग, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक) कुंभमेळ्यांना लागू पडते. ‘खूपखूप वर्षांपूर्वी देवांनी समुद्रमंथन सुरू केले. दानवही त्यांच्या मदतीला होते. बराच काळ मंथन झाल्यावर अमृत बाहेर आले. इंद्राचा पुत्र जयंत याने हा अमृतकुंभ घेतला व तो स्वर्गाच्या दिशेने म्हणजे आपल्या निवासस्थानाकडे जाऊ लागला.
चोम्स्कींची रसेल-भाषणे
प्रा. नोम चोम्स्की (जन्म १९२८) हे अमेरिकन भाषावैज्ञानिक दोन कारणांसाठी जगप्रसिद्ध आहेत. भाषाविषयक त्यांच्या संशोधनाने या क्षेत्रात क्रांतिकारक पॅरॅडाइम बदल घडवून आणला, तसेच १९६०-७० च्या दशकात व्हिएतनाम युद्धकाळात अमेरिकेतील विद्यार्थ्यांनी आपल्या सरकारच्या विरोधात जो उठाव केला त्याला मार्गदर्शन करण्यासाठीही ते उभे राहिले. तेव्हापासून सातत्याने त्यांनी उदारमतवादी, लोकशाहीवादी भूमिकेतून डाव्या चळवळीचे वैचारिक प्रवक्ते म्हणून कामगिरी बजावली आहे. आदर्श अर्थाने आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकशाहीवर आधारित समाजवादी समाजरचना उभारण्याचे ध्येय ते वयाची पंचाहत्तरी ओलांडल्यावरही बाळगून आहेत, आणि तशी मांडणी करत आहेत.
जानेवारी १९७१ मध्ये चोम्स्कींना ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज, इंग्लड येथे ‘बर्हाड रसेल स्मृती व्याख्यानां’साठी आमंत्रित केले गेले.
आधुनिक मननशीलता
माणसे विचार कोणत्या अवयवाने करतात? माणसांच्या भावना कुठे उद्भवतात? माणसांच्या विचारांमध्ये कधीकधी ‘तर्कापलिकडे’ असाव्या अशा ज्या अंतःप्रेरणा येतात, त्या कोणत्या जागेतून येतात ? तीन्ही प्रश्नांचे उत्तर मेंदू’ हे आहे.
एखादी व्यक्ती विचार करते आहे, तिच्यात काही भावना उपजल्या आहेत किंवा त्या व्यक्तीची अंतःप्रेरणा तिला काही सांगते आहे हे सारे आपण अखेर त्या व्यक्तीच्या वागणुकीच्या निरीक्षणांमधूनच ठरवतो. जर अशा निरीक्षणांमध्ये व्यक्तीची स्थिती ‘जैसे थे’ असल्याचे दिसले तर आपण विचार/भावना अंतःप्रेरणा ओळखणार तरी कश्या ? स्थितीतले बदल उर्फ ‘वागणे’ यातूनच विचारासारख्या गोष्टींची चाहूल लागणार ना ?
ठोक राष्ट्रीय उत्पादनवाढीचे तेजाब
उदारीकरणाने ठोक राष्ट्रीय उत्पाद वाढण्याची गती वाढते, हा देसाईंच्या युक्तिवादाचा गाभा आहे. आणि हे गती वाढणे कार्यकारणाच्या तर्कावर नव्हे तर निरीक्षणावर आधारित आहे. १९९१ नंतर वाढीचा दर ५.२% झाला, तर आधीच्या चाळीस वर्षांत तो ३.७% होता.
पण केवळ राष्ट्रीय उत्पादाच्या वाढीने काय घडते, त्याची गुणवत्ता काय, परिणाम काय, यावर देसाई कुठेच काही म्हणत नाहीत. गेल्या काही वर्षांतील वाढीमुळे बेरोजगारीही वाढली आहे, विषमताही वाढली आहे, असल्या काळजीत पाडणाऱ्या अंगांबद्दलही देसाई प्रश्न विचारत नाहीत. भारताची सर्वांत मोठी, महत्त्वाची उपलब्धी जी लोकशाही, तिच्यावर या वाढीचे तेजाबासारखे होणारे परिणामही देसाईंना शंकास्पद वाटत नाहीत.