मासिक संग्रह: मार्च, २००५

पत्रसंवाद

खांदेवाले यांनी एका अहवालाचा परिचय वाचकांना करून दिला आहे तेव्हा काय टीका करायची असेल ती माझ्यावर नको हे खांदेवाल्यांचे म्हणणे बरोबर आहे. अहवालात समस्यांची सोडवणूक सुचवली असती तर टीका किंवा समर्थन करता आले असते. पण अहवालात नुसते भाराभर प्रश्न आहेत. पुष्कळशा “विद्वत्तापूर्ण’ लिखाणाची हीच गत असते. एका अहवालाचा आधार घेऊन दुसरा कोणी एक प्रबंध लिहितो. मग तिसरा कोणी एक ‘शोध-प्रबंध’ लिहितो. अशा त-हेने अहवालांचे आणि प्रश्नांचे ‘पीक’ निघत जाते. उपाय कोणी सुचवत नाही. प्रश्न खूप विचारले की दुसरा मनुष्य नालायक आहे असे सूचित होते.

पुढे वाचा

विवेकवाद – भाग ६ : सत्य, सत् आणि साधु (प्रथम प्रकाशन सप्टेंबर १९९० अंक १.६, लेखक – दि. य. देशपांडे)

या लेखमालेच्या पहिल्या लेखांकात आपण सत्य म्हणजे काय ? या प्रश्नाचा विचार केला. आपण असे म्हणालो की ‘सत्य’ हे विशेषण फक्त विधानांनाच लागू पडू शकते. विधान म्हणजे स्थूलमानाने बोलायचे तर एखाद्या गोष्टीचे वर्णन. वर्णन हे यथार्थ किंवा अयथार्थ असते; म्हणजे वर्ण्य वस्तूचे स्वरूप जसे असेल तसे विधानात सांगितलेले असते, किंवा ते जसे नाही तसे सांगितलेले असते. जेव्हा विधानातील वर्णन यथार्थ असते तेव्हा ते सत्य असते, आणि अयथार्थ असते तेव्हा ते असत्य असते.
उदा. ‘पृथ्वी गोल आहे’ हे विधान सत्य आहे, कारण त्यात पृथ्वीच्या आकाराचे वर्णन तो जसा आहे तसे केले आहे ; उलट “पृथ्वी सपाट आहे’ हे विधान असत्य आहे कारण त्यात पृथ्वीचा आकार जसा नाही तसा असल्याचे सांगितले आहे.

पुढे वाचा

अमेरिकेला ‘घरचा आहेर’

बिोलिंग फॉर कोलंबाइन या वृत्तपटाद्वारे मूर अमेरिकेच्या शस्त्रनियंत्रण कायद्यातील त्रुटी दाखवून गिल्या. स्टुपिड व्हाईट मेन आणि एडन्साईज धिस या पुस्तकांद्वारे अमेरिकेच्या धोरणांमधला वंशवाद आणि कामगारविरोध उघडा पाडला. फॅरनहाइट ९-११ या वृत्तपटातून अमेरिकेच्या इराकबाबतच्या धोरणातील खोटारडेपणा ‘बाहेर’ काढला. हा आहे मायकेल मूर, अमेरिकेतील ‘बुशबाबा’चा आणि रिपब्लिकन स्थितिवादीवृत्तीचा सर्वांत उपरोधिक आणि निर्भीड टीकाकार. काही अंशी तो ‘गावरान नोम चोम्स्की’ आहे.तर मायकेल मूरच्या ड्यूड, व्हेअर्स माय कंट्री या (वार्नर बुक्स २००३) पुस्तकातील हाऊ टु स्टॉप टेररिझम ? स्टॉप बीइंग टेररिस्ट्स!’, या प्रकरणाचा हा संक्षेप
आजी आणि भावी दहशतवादी हल्ले कसे थांबवावे यावरच्या माझ्या सोप्या आणि झटपट अभ्यासक्रमात तुमचे स्वागत !

पुढे वाचा

अर्थसृष्टी-भाव आणि स्वभाव : परिचय

(लेखिका – सुलक्षणा महाजन, ग्रंथाली, मुंबई-२. प्रथमावृत्ती २००४)

‘अर्थसृष्टी भाव आणि स्वभाव’ हे पुस्तक जेन जेकब्स या अमेरिकन लेखिकेच्या मूळ पुस्तकावर (Nature of Economies) नेचर ऑफ इकानॉमीज आधारित आहे. मूळ पुस्तकातील विचार व प्रस्तुती लेखिकेची खरी प्रेरक शक्ती आहे. मनुष्यसमाजाच्या अर्थव्यवहारांचे गर्भित माणसाच्या उपजिविकेच्या प्रयत्नात निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्परावलंबी संबंधात कसे आहे याची यात उकल आहे. मानवप्राणी एकंदर निसर्ग-व्यवस्थेचा एक अविभाज्य घटक आहे ही प्राथमिकता मान्य करून लेखिका अर्थसृष्टी व निसर्ग यांच्या विकासाचे गतिनियम सारखे कसे आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न करते.

पुढे वाचा

दहशतवादाची कथा: एक मूल्यांकन (लेखिका – ललिता गंडभीर, ग्रंथाली, मुंबई-२. प्रथमावृत्ती २००३ मूल्य रु.२५०/-)

अमेरिकेत स्थायिक झालेल्या, पॅथॉलॉजिस्ट असलेल्या, ललिता गंडभीर यांच्या चिंतनातून आणि इतिहासाच्या कालचक्रात निर्माण होणाऱ्या मानवाच्या प्रतिशोधात्मक प्रवृत्तीच्या अन्वेषणातून उत्क्रांत झालेली दहशतवादाची कथा ही कादंबरी, तीन वेगवेगळ्या दहशतवादी घटनांतील कथावस्तूच्या घट्ट विणीतून निर्माण झालेली, एका शांतपणे जळणाऱ्या ज्योतीने शेवटी विझून जावे तशी शोकांतिका आहे. कादंबरीचा कालखंड चाळीस वर्षांचा असून कादंबरीचे लेखन पूर्ण होण्यासाठी पंधरा वर्षांचा दीर्घ कालावधी लागला आहे याचे मुख्य कारण लक्षात येते. ठरवून, जुळवून केलेल्या कथानकाच्या आकृतिबंधाला नियोजित पात्रांच्या शाब्दिक अभिव्यक्तीने सजवून केलेल्या लेखन-प्रयत्नातून ही कादंबरी निर्माण झालेली नाही. ‘दहशतवादाची कथा’ ही कादंबरी उत्क्रांत झालेली आहे.

पुढे वाचा

लेखनांतील अराजक (पुढे चालू)

लेखनांतील अराजक: परिणाम व उपाय ह्या शीर्षकाचे दोन लेख १५.५ व १५.६ अंकांत प्रसिद्ध झाले. त्या लेखांवर प्रतिक्रिया जितक्या अपेक्षित होत्या तितक्या आल्या नाहीत. हा लेख लिहिण्याचा हेतू छापलेल्या भाषेत प्रमाणीकरण (standardization) यावें (प्रमाणीकरण अशासाठी की त्यामुळे सर्वांच्या वाचनाची गति वाढेल, द्रुतवाचन शक्य होईल) हा होता. शब्दाचें लिखित रूप डोळ्यांना जितकें पूर्वपरिचित असेल तितकें तें वाचण्यास, म्हणजे ओळखण्यास वेळ कमी लागतो आणि द्रुतवाचन शक्य होते, ह्याकडे मला त्या लेखांतून लक्ष वेधायचे होते. मराठीत एकेक जोडाक्षर तीनचार प्रकाराने लिहितां येतें तें असें प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लिहिल्यामुळे त्याकडे जास्त निरखून पाहावे लागते आणि वाचकाचा कालापव्यय होतो ही गोष्ट वाचकाच्या लक्षात आणून द्यावयाची होती.

पुढे वाचा

‘स्वातंत्र्य आणि ‘मान्यता’

‘स्वातंत्र्य आणि ‘मान्यता’
ब्याण्णव साली तुम्ही पुरस्कार नाकारायला कशा उद्युक्त झालात? आपली स्वतंत्र ओळख टिकवायच्या गरजेतून का ?
आमच्यासारख्या देश आणि समाजाबाबत हळव्या शिपीळींळींश) कल्पनांच्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांनी स्वतंत्र भूमिका राखायला हवी, असे मला वाटते. आणि दुर्दैवाने आपण व्यावसायिक पुरस्कारांना पुरेसे महत्त्व देत नाही. अखेर मान्यता आपल्या क्षेत्रातल्या समकक्ष लोकांकडूनच मिळायची असते. भारतीय इतिहास परिषदेने मला काही वर्षांपूर्वी सामान्य अध्यक्षपद दिले. मला हाच पुरस्कार वाटतो.
पद्मभूषण पुरस्कार दोनदा नाकारणाऱ्या इतिहासाच्या अभ्यासक रोमिला थापर याची या नकारांबद्दलची मुलाखत इंडियन एक्स्प्रेसने (२ फेब्रु.२००५) छापली.

पुढे वाचा