सुमारे पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट. माझ्या बालपणी एक घटना माझ्या मनावर कोरली गेली. आम्ही वाड्यात राहत होतो. आमच्या घरी काही नातेवाईक मंडळी मुक्कामाला आलेली होती. खरे तर त्यांचा काश्मीरदर्शनासाठी जाण्याचा बेत होता. त्या निमित्ताने घरून रवाना होण्याआधीचा वेळ सत्कारणी लावण्यासाठी कॅरम खेळण्याची टूम निघाली.
माझे वडील कॅरम खेळत असत. तेव्हा पाहण्यांपैकी वयस्काबरोबर, प्रतिस्पर्धी भिडू म्हणून माझ्या वडिलांना बोलावले गेले. खेळ सुरू होण्याआधी पाहुणे मंडळींनी कॅरम खेळण्याच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या नियमांसारखे अनेक नियम सांगितले. माझ्या वडिलांनी ते सर्व ऐकून आणि समजून घेतले. मग पाहुण्यांनी माझ्या वडिलांना पृच्छा केली की, तुमचे काही नियम असल्यास सांगा.
मासिक संग्रह: फेब्रुवारी, २००५
भ्रष्टाचार: कारणे व उपाय (भाग ३)
भ्रष्टाचार निर्मूलनाचे उपाय
आतापर्यंत आपण भ्रष्टाचाराची विशिष्ट कारणे, स्वरूप व परिणाम यांच्याविषयी विचार केले. त्यावरून भ्रष्टाचाराचे निर्मूलन ही आजच्या समाजापुढील सर्वांत मोठी समस्या असल्याचे आपणास जाणवते. सदर समस्या सोडविणे हे समाजाच्या भवितव्याच्या दृष्टीने अपरिहार्य आहे, हेही आपणास पटण्यासारखे आहे. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कोणते उपाय योजावेत, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. भ्रष्टाचाराचे स्वरूप गुंतागुंतीचे असल्याने व त्याची कारणेही सामाजिक, आर्थिक, नैतिक अशी अनेकविध असल्याने त्यावरील उपायांचा विचार विवेकावर आधारित असणे आवश्यक आहे. उपायांचा विचार करताना भ्रष्टाचाराची कारणे समोर ठेवल्यानेच त्याचे सम्यक् आकलन आपणास होऊ शकेल.
डॉ. लागू-एक ‘लमाण’?
‘लमाण’ नुकतेच प्रसिद्ध झाले. रूढार्थाने ज्याला आत्मचरित्र म्हटले जाते, तसे प्रस्तुत ग्रंथाचे स्वरूप नसून ‘मनोगता’त म्हटल्याप्रमाणे त्यांच्या एकूण नाट्यप्रवासाचा तो धावता आढावा आहे. आपले खाजगी जीवन चित्रित करण्यात लेखकाला स्वारस्य नाही. साडेतीनशेहून अधिक पृष्ठसंख्या असलेल्या ह्या पुस्तकात कौटुंबिक उल्लेख अपवादात्मकच आहेत. नाट्यक्षेत्राशी संबंधित व्यावसायिक जीवन शब्दबद्ध करण्यासाठी, सुहृदांच्या आग्रहानुसार ‘लमाण’ची निर्मिती झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या जडणघडणीत किंवा व्यक्तिमत्त्व समृद्ध होण्यासाठी ज्यांचा हातभार लागला, त्यांच्याविषयीच्या आठवणींनी पुस्तकाची सुरुवात होते. आई-वडिलांपासून निघून भालबा केळकर, प्रा. दीक्षित, वसंत कानेटकर, इंदिरा संत, पु.शि. रेगे, जी.ए.
एक जेवतानाची मुलाखत
माझी जगदीश बारोटियांशी ओळख नव्हती, पण ओळख करून घ्यायची इच्छा होती. मला शत्रू मानणारा भेटावा; तो मला शत्रू का मानतो, स्वतःपेक्षा वेगळ्यांना शत्रू का मानतो, हे समजून घ्यायची इच्छा होती. सन २००० मध्ये ‘हिंदू युनिटी’ नावाच्या एका वेबसाईटवर हिंदू भारताच्या शत्रूची एक यादी झळकली आणि त्यात माझे नाव होते. नवजागृत, डाव्यांना विरोध करणाऱ्या, जहाल राष्ट्रवादी अशा त्या गटांना माझ्यासारख्या ‘गद्दार’ हिंदूंबद्दल खास द्वेष होता.
त्याच सुमाराला न्यूयॉर्क टाईम्स मध्ये एक बातमी आली की मुस्लिमांविरुद्ध हिंसेला आवाहन केल्यामुळे एका हिंदू वेबसाईटला सेवा पुरवणे तिच्या ‘सर्व्हर’ने थांबवले.
विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा
हे प्रा. मे. पुं. रेगे ह्यांचे शेवटचे पुस्तक. वस्तुतः ते नवे पुस्तक नव्हे, ते रेग्यांच्या १९७८ ते २००० या काळात, दोन निबंध सोडल्यास, नवभारत मासिकात प्रसिद्ध झालेल्या निवडक लेखांचा संग्रह आहे. पण ते सर्व लेख मुख्यतः नवभारत मासिकात आणि अन्य दोन तीन मासिकांत प्रसिद्ध झाल्यामुळे मासिकांतील लेखांचे दुर्भाग्य त्यांच्याही वाट्याला आलेले होते. विशेषतः त्या लेखांतील विचारांत हळूहळू दूरगामी बदल घडला असल्यामुळे त्यांचे एकत्रित चित्र वाचकाच्या मनात सहसा उतरत नाही. त्यामुळे आता त्या लेखांचा संग्रह प्रसिद्ध झाला ही गोष्ट स्वागतार्ह आहे. रेग्यांचे विचार कसे कसे बदलत गेले आणि शेवटी ते काय होते हे सांगणे आता शक्य झाले आहे.
शिडी
प्रत्येक व्यक्तीची क्षमता मर्यादित असते. ती शक्य तितकी टोकापर्यंत ताणणे, आपली दृष्टी जास्तीतजास्त विस्तारणे हे त्यांचे संशोधनाचे ध्येय होते. या दृष्टिकोनाचे प्रतीक असे एक छायाचित्र त्यांच्या खोलीच्या भिंतीवर टांगलेले होते. पिएरो बोरेलो या चित्रकाराच्या ‘एका व्यक्तीचे स्वतःचे दर्शन (शिडीवरील माणूस)’ या चित्राची ती प्रत होती.
यात एक मोठी भिंत असून तिला टेकविलेल्या शिडीवर एक माणूस चढत आहे; तो शिडीच्या अर्ध्यावर पोहोचलेला आहे. भिंतीवर छत नाही, त्यामुळे त्यापलीकडे आकाशाचा तुकडा आणि बाहेरील जगाचे थोडेफार दर्शन होत आहे. माणसाची भिंतीवर पडलेली सावली त्याच्यापेक्षा खालच्या अंगाला आहे.
पत्रसंवाद
तुमचा नागरीकरणावरील विशेषांक वाचला. काही लेख उदा. बोंगिरवार, सुजाता खांडेकर, विद्याधर फाटक असेही इतर-नागरीकरणाच्या प्रश्नाला हात घालतात आणि वाचून समाधान होते. पण विशेषतः संपादकीयातील जेन जेकब्ज, एबेक्झर हॉवर्ड, फ्रँक लॉइड राईट, जुवाल पोर्तुगाली वगैरे उल्लेख हे पानभरू वाटतात. गरीब देशातील नागरीकरणाकडे जमिनीवर उभे राहून पहाणारे वाटत नाहीत. अशा उल्लेखांचा उपयोग दागिन्यांसारखा वाटतो. दागिन्यांना स्थान नक्कीच आहे. पण नागरीकरण हा भारतीय देह समजला तर भारतीय देह त्याच्या प्रवृत्ती, सुदृढता, अंगभूत निरोगीपणा, रोगिष्ट असल्यास त्याची कारणे व आवाक्यातील उपाय याचा यथायोग्य अभ्यास करून देह निरोगी झाला तर त्याला अधिकतर सौंदर्य प्राप्त करण्याकरिताच या दागिन्यांचा उपयोग असतो.