माझी जगदीश बारोटियांशी ओळख नव्हती, पण ओळख करून घ्यायची इच्छा होती. मला शत्रू मानणारा भेटावा; तो मला शत्रू का मानतो, स्वतःपेक्षा वेगळ्यांना शत्रू का मानतो, हे समजून घ्यायची इच्छा होती. सन २००० मध्ये ‘हिंदू युनिटी’ नावाच्या एका वेबसाईटवर हिंदू भारताच्या शत्रूची एक यादी झळकली आणि त्यात माझे नाव होते. नवजागृत, डाव्यांना विरोध करणाऱ्या, जहाल राष्ट्रवादी अशा त्या गटांना माझ्यासारख्या ‘गद्दार’ हिंदूंबद्दल खास द्वेष होता.
त्याच सुमाराला न्यूयॉर्क टाईम्स मध्ये एक बातमी आली की मुस्लिमांविरुद्ध हिंसेला आवाहन केल्यामुळे एका हिंदू वेबसाईटला सेवा पुरवणे तिच्या ‘सर्व्हर’ने थांबवले. पण बाय मायर कहाने यांच्या मुस्लिमविरोधी ज्यू गटाने रदबदली केल्याने ‘हिंदू युनिटी’ची वेबसाईट पुन्हा सुरू झाली. हा लेख लिहिणारा वेबसाईट चालवणाऱ्यांना भेटू शकला नव्हता, इतकी ती संघटना गुप्तताप्रेमी होती. मी मुलाखत मागण्यासाठी केलेल्या ई-मेल्सनाही त्यांनी प्रतिसाद दिला नव्हता. अखेर ‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ भाजपा’ या संस्थेच्या एका नेत्याकडून मला ‘हिंदू युनिटी’च्या बारोटियांचा फोन नंबर मिळाला. त्यांच्या ई-मेलनुसार ते संघटनेचे सदस्य नसून समर्थक होते.
फोनवर माझे नाव ऐकताच त्यांचा आवाज थंडावला. मी पाकिस्तानात जाऊन आल्यावर एक लेख लिहिला होता, आणि माझी पत्नी पाकिस्तानी होती यामुळे ते मला शत्रू मानत होते. “तू मला खूप त्रास दिला आहेस.’ असे ते म्हणाले. मी त्यांना भेटू इच्छितो हे ऐकल्यावर ते मला ‘हरामी’ आणि ‘कुत्ता’ म्हणाले. मी सेक्युलर नसून गोंधळलेला आहे, आणि पुढे बहुसंख्य झालेले मुस्लिम माझ्या तंगड्या तोडून मला धडा शिकवतील, असेही ते म्हणाले. मी भेटायला गेलो. १९९९ मध्ये कारगिल युद्ध सुरू असताना माझा मोना या पाकिस्तानी मुस्लिम मुलीशी विवाह झाला. लढाईकडे लक्ष न देता मोनाचे भाऊ, मी, तिचे वडील इंग्लंडातल्या भारत-पाक वर्ल्ड कप लढतीतच रस घेत होतो. एका प्रेक्षकाने फलक लावला होता, ‘शांततेसाठी क्रिकेट’. मला मी ‘शांततेसाठी विवाह’ करून अब्जाहून जास्त दक्षिण आशियाईंना प्रतीक पुरवतो आहे असे वाटत असे. यानंतरच्या लेखामुळे बारोटियांचे माझ्याकडे लक्ष गेले. हे शत्रुत्व वैयक्तिक नव्हते, राजकीय होते.
मला बिनचेहेयाचा शत्रू ही कल्पना सहन होत नव्हती, म्हणून त्यांना भेटून संवाद साधायची आस लागली होती. ‘‘या भेटल्यावर सत्य सांगेन आणि तुमचे मुस्लिमांबद्दलचे मत बदलेल.” ते म्हणाले. एका स्त्रीने दार उघडले आणि हाक मारून त्यांना बहुधा सदरा चढवायचे सुचवले. मला पाहिल्यावर ते म्हणाले, “चेहरा ओळखीचा वाटतो.’ वेबसाईटवरचा फोटो त्यांनी पाहिला होता, पण ते सांगायला माझी जीभ रेटेना. ते मला ‘इस्लामच्या जहरीपणा’ची नेहेमीची कंटाळवाणी यादी सांगू लागले. मुस्लिम सिनेनटांच्या हिंदू सिनेनट्या बायकांची यादी त्यांनी ऐकवली. जबरीने बाटवून त्यांचा ‘उपभोग’ घेतला जातो हे सांगताना त्यांनी हाताने पंपासारखी क्रिया करून एक हिंदी अपशब्द वापरला वारंवार. घरातली स्त्री, बारोटियांची भाची, मी परका असल्याने पुढे येत नव्हती. चहाबिस्किटेही ते स्वतः घेऊन आले होते. तिला सुंता आणि क्रियांचे ‘चित्ररूप’ वर्णन ऐकून काय वाटले असेल?
मला बारोटियांचा फोन नंबर देणारे म्हणाले होते की फाळणीत बारोटियांच्या कुटुंबाची कत्तल झाली होती. हे खरे नव्हते. फाळणीनंतर वर्षाभराने सहकुटुंब, सुखरूप बारोटिया सिंधमधून भारतात आले होते. हे त्यांच्या तोंडून ऐकल्यावर मला त्यांचा मुस्लिमद्वेष समजणे अधिकच अवघड वाटले. मी याबाबत थेट प्रश्न विचारता ते चडफडले, “मी तुझ्यासारखाच उदारमतवादी होतो, अडाणी, मूर्ख! इस्लाममध्ये तुमच्या सेक्युलरपणाला जागा नाही. ते काफिरांना मारा म्हणतात. इस्लाम हा धर्म नाही प्रदेश जिंकायला, बायकांवर बलात्कार करायला वापरायची राजकीय विचारप्रणाली आहे ती.” मी टिपणे काढत होतो आणि ते अधूनमधून मला त्यांची वचने लिहून घ्यायला खुणावत होते. “पाकिस्तानात हिंदू मारले जात असताना गांधी भाषणे देत होते. साला तुम घूमता है, हरामी! गांधीना मारले त्यादिवशी मी रिलॅक्स झालो.”
लवकरच बारोटिया मला शेजारच्या एका भारतीय उपाहारगृहात जेवायला घेऊन गेले. यजमान म्हणून ते आग्रह वगैरे करत होते, आणि स्वतःही चांगले जेवत होते. मला एक सुस्थित, समाधानी, थकलेला, वामकुक्षीच्या तयारीतला माणूस दिसत होता.
गुजरातेत हिंदूंनी अनेक मुस्लिमांना मारल्याने ‘ते’ घाबरले आहेत “यह गर्मी जो है, मैं सारे इंडिया में फैला दूंगा।” हे म्हणताना ते भजी खात होते. एक निवृत्त परदेशस्थ एका परदेशस्थांसाठीच्या स्वस्त खाणावळीत जेवत होता.
मला त्यांचा फोन देणाऱ्याने सांगितले होते की ते टायपिस्ट होते. “लीगल सेक्रेटरी होतो, १९७२ पासून पंचवीस वर्षे. मला भागीदारच समजायचे. अकरा सप्टेंबरनंतर त्यांना माझा मुस्लिमद्वेष हे वेड न वाटता बरोबर असल्याचे पटले.”
परतताना ते माझ्या पत्नीबद्दल असभ्य भाषेत बोलू लागले. नंतर माझ्या पत्नीने विचारले, “मग तू काय म्हणालास?” “काही नाही.” मी मनात टिपणे काढत होतो.
जेवण होत असताना बारोटियांनी मला मातृभूमीसाठी लढणाऱ्यांबद्दल मला उपकृत वाटायला हवे, असे सांगितले. मला हे कुठेतरी स्पर्टून गेले. त्यांनी मला पाकिस्तानसोबत जगणे जमेल असे का वाटते, असे विचारल्यावर मी ‘आम्ही नेहरूंची अनौरस प्रजा’ अशा अर्थाचे बोललो जणू नेहरूंचा उदारमतवाद हे पाप होते आणि ते मानणारे आम्ही अनौरस होतो. पण त्यांचा एक मुद्दा असाही होता की पाश्चात्त्यांशी वर्णसंकर (Tळीलशसशपरींळेप) नेहरूंनी करवला. आम्ही दोघेही नष्ट कसे, आमचे इतिहास जगाशी जोडलेले. मी इंग्रजीत लिहिणारा भारतीय. ते जर्मनीच्या हिटलरने प्रेरित संघाचे पाईक. दोघेही वेगवेगळ्या त-हेने नेहरूंसारखे व्हायला झटणारे. तशीही नेहरूंची सर्वग्राहकता अपवादात्मकच पण हिंदू-मुस्लिम तेढीला पारंपरिक न मानता तिची मुळे ताज्या इतिहासातच असल्याचे मानणे, हे नेहरूंचे वैशिष्ट्य. यामुळे नेहरूंना शहाण्या धोरणांमधून तेढ संपवता येईल असे वाटत असे.
बारोटियांनी बरीच कागदपत्रे व इतर ‘साहित्य’ दिले. मासलेवाईक होते. ‘परिस्थितिजन्य’ पुराव्याने नेहरू मुस्लिम असल्याचे सिद्ध होते, असा दावा होता. एका विवाहित स्त्रीचे ‘आराधन’ मुस्लिमच करेल, आणि हिंदू विवाहित स्त्रियांचा आदर करून अविवाहित मुलींना ‘देवी’ मानेल, असा युक्तिवाद होता. दोन त-हेची अनौरस प्रजा असते, एक ‘अवैध शरीरसंबंधांमधून’ जन्मलेली, आणि दुसरी ‘करणी आणि कथणीने घृणास्पद’ असलेली. हे वर्गीकरण करून गांधींना दोन्ही प्रकारांनी अनौरस ठरवले होते. अमेरिकनांना ‘जागे व्हायचे’ आवाहन होते. ‘मसल मॅन’ (गीलश्रश रिप)चा मुसलमान हा अपभ्रंश आहे, असे मत नोंदले होते. इस्लामच्या माथी अकरा सप्टेंबरच्या बऱ्याच आधीचा एक गुन्हा मारला होता जॉन एफ. केनेडीच्या हत्येचा. बारोटिया एका वाढत असलेल्या, सशक्त उपखंडीय मुख्य प्रवाहातल्या चळवळीतले ‘कडेचे’ कट्टरपंथी आहेत. त्यांच्यासारख्यांनी म्हणे चार अब्ज डॉलर्स इतका निधी उभारून अणुचाचण्यांनंतरच्या भारताविरुद्धच्या बंधनांचा जाच मंद केला.
मला लेखक (1ळींशीी) आणि दंगेखोर (1ळींशी) यांच्यासंबंधात बारोटियांची उग्र, हिंस्र भाषा महत्त्वाची वाटते. अशा आक्रस्ताळ्या, शिवराळ भाषेने विचारप्रवाहाचे सच्चेपण वादग्रस्त होऊन ती हल्ल्यांपुढे हळवी ठरते (लोगोळीशव । श्रिपशीरलश्रश). या भाषणबाजीत मध्यमवर्गी मार्दव नाही, उदारमताला थारा नाही. एका अर्थी हा गांधी-नेहरूंच्या आदर्शवादाच्या अपयशाला प्रतिसाद आहे. प्रत्यक्षात हा जनतेचा आवाज नाही, पण तो अडाण्यांचा आवाज न वाटता त्याला एक ‘वैधता’ मिळायला लागली आहे. अनेक वर्षे सत्तेत असलेल्या (काँग्रेस) समूहाला असणारा हा आक्रमक विरोध आहे. इंग्रजी जाणणाऱ्या अभिजनांनी भारताच्या झेंड्याखाली बारोटियांसारख्यांना जागा दिलीच नाही, हा बारोटियांचा सूर पटण्याजोगा आहे. अजाणतेपणे मी मनात त्यांच्या इंग्रजीच्या चुकांची चेष्टा करतो आहे, हे मला जाणवले. मीही त्यांच्यासारखाच लहान गावात जन्मलो आणि वाढलो. पुढे मी शहरात जाऊन इंग्रजी शिकलो. सेक्युलर झालो. विवेकवादी आणि उदारमतवादी झालो. ते (मात्र) आपल्या मुळांशी एकनिष्ठ राहिले. धर्म, एक संकुचित प्रकारचा राष्ट्रवाद त्यांनी टिकवला शहरांवर सूड उगवायला ते आततायी झाले. मला त्यांचा हेवा वाटत नाही, पण थोडी सहानुभूती नक्कीच वाटते. आणखी एका बाबतीत मला त्यांच्यात आणि माझ्यात साम्य जाणवते. शौर्यकथा आणि द्रोहाच्या कथांचे त्यांचे कल्पनाविश्व हे माझ्याही बालपणाच्या कल्पनाविश्वासारखे आहे. आणि ते माझे खाजगी विश्व नव्हते सार्वजनिक विश्व होते ते.
एक माझा लहानपणाचा अनुभव आठवला आणि त्यांना त्यांनाच कशाला, सर्वच ‘कडव्यां’ना तसला अनुभव आला असेल का, असा प्रश्न पडला. पाचसहा वर्षांच्या वयात आमच्या पाटण्यातल्या घराच्या बागेत खूप सरडे दिसायचे. रोड, खवलेदार, पिवळे तपकिरी रंगाचे सरडे. अनेकांच्या मानेखाली लाल पिशव्या असायच्या. मला त्यांची भीतीही वाटायची आणि एका दगडाच्या फेकीने मारायची दिवास्वप्नेही मी पाहात असे. शेजारच्या एका मुलाने एक सरडा मारून मला दाखवला. तो म्हणाला, “हे मुसलमान असतात, आणि ती लाल पिशवी ही दाढी असते. फाळणीच्या वेळी हिंदू पाठलाग करून मुसलमानांना ठार मारायचे, आणि त्यांनी मारले नाही तर मुसलमान हिंदूंना कापून काढायचे. एकदा एक मुसलमान पकडला गेला, आणि जीव वाचवायला त्याने दाढीने शेजारच्या एका विहिरीकडे खूण केली. विहिरीत तर मुसलमान लपून बसले होते! या गद्दारीमुळे त्याचा सरडा झाला, आणि आजही सरडे माणसांना मान वरखाली करून दाढीने विहिरी दाखवत असतात!”
अमिताभ कुमार यांच्या हज्बंड ऑफ अ फॅनॅटिक या आगामी पुस्तकातील एक उतारा ‘लंच विथ अ बायगट’ या नावाने जून २००४ च्या सेमिनारमध्ये प्रकाशित झाला. त्याचा हा स्वैर, संक्षिप्त अनुवाद. ताहिरभाई पूनावालांनी ‘नॅशनॅलिझम’च्या या आविष्काराकडे लक्ष वेधले.