मासिक संग्रह: सप्टेंबर, २००४

“सुलभ’ भारत

१)तुम्ही वा तुमचे जवळचे नातलग अजूनही हाताने विष्ठा साफ करतात का ? जर ‘हो’, तर हे स्वतःच्या घरात करता की नगरपालिकेच्या स्वच्छतागृहात ?

२) तुम्ही वा तुमचे जवळचे नातलग घरी संडास नसल्याने उघड्यावर जाता का ? जर ‘हो’, तर हे गावात होते की खेड्यात ?

३) तुमच्या शाळेत संडास आहे का, की नसल्याने त्याची गरज पडल्यास तुमची गैरसोय होते? जर ‘हो’, तर तुम्ही हा प्रश्न कसा हाताळता?

४) तुमच्या टप्प्यात येणाऱ्या रेल्वे, बस स्थानकांवर, बाजारांत, धार्मिक व पर्यटनाच्या स्थळांमध्ये संडास आहेत का ?

पुढे वाचा

दुर्बोध!

तसेंच लोकस्थिति सुधारावयाची असेल तर ती आंतून सुधारली पाहिजे. लोकांमधील परस्पर-संबंध काय आहेत, त्यांनी स्थापिलेल्या संस्थांचे हेतु काय असतात, राजाचा अधिकार किती असावा आणि प्रजेचे हक्क कोणते आहेत, ते इतकेच कां असावेत आणि जास्त का नाहीत; धर्म, नीती, जाती इत्यादि बंधनें अस्तित्वांत कां आलीं व कशी आली हे व असलेच आणिक प्रश्न जे लाखों आहेत, त्यांवर समाजाची इमारत रचलेली आहे. तेव्हां या विषयांचे विवेचन ज्या ग्रंथांत येणार त्यांचे परिशीलनाने लोकस्थितींत अंतर पडेल यांत नवल ते कोणते ? उदात्त विचार, दूरदृष्टि, बुद्धीची कुशाग्रता, स्वातंत्र्याची प्रीति, आणि गुलामगिरीचा तिरस्कार, डामडौलाचा आळस, आणि साधेपणाची आवड, आपल्या देशाचा, भाषेचा आणि लोकांचा अभिमान, सत्याची चाड आणि सत्तेविषयी निर्भयपणा, मानसिक धैर्य, आणि सांग्रामिक शौर्य, निःस्पृहपणा आणि लांगूलचालनाचा द्वेष इत्यादि असंख्य सद्गुणांची स्फूर्ति अंतःकरणांत उत्पन्न होण्याला उत्तम ग्रंथाचे अध्ययनासारखा दुसरा मार्ग नाहीं.

पुढे वाचा

कृषि व ग्रामीण विकास (भाग-२)

महबूब उल् हक् ह्यांनी १९९० पासून मानव विकास अहवाल प्रकाशित करताना पारंपरिक अर्थशास्त्रीय विचाराला हादरे दिले व आव्हाने दिली. ती अशी:

(१)विकसनशील देशांनी काहीच प्रगती केली नाही असे समजणे/सुचविणे चूक आहे. त्यांची प्रगती देशोदेशांत कमीअधिक झाली असेल परंतु मानव विकासाचे निकष लावले तर त्यांनी बरीच प्रगती केली आहे.

(२)मानवविकासाकरता आर्थिक वृद्धी अनावश्यक आहे असे समजणे चूक आहे. आर्थिक वृद्धीशिवाय मानवी कल्याणात सातत्याची प्रगती होऊ शकत नाही. पण हेही समजणे चूक आहे. की आर्थिक वृद्धीने आपोआपच मानव विकास उच्च पातळीवर जाईल.

(३) दारिद्र्यनिर्मूलन हे उद्दिष्ट मानव विकासाच्या उद्दिष्टापेक्षा वेगळे आहे असे समजणे चूक आहे.

पुढे वाचा

अलीगढ मुस्लिम विद्यापीठात स्त्रिया

अलीगढ मुस्लिम विद्यापीठात शिरताना माझ्या दृष्टीला एक महान आंतराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेची प्रतिमा दिसत होती. तिथे तरुणतरुणींना मूलभूत आचारविचारांशी ओळख करून दिली जात असेल, शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणात अडकलेल्यांना ते बंध तोडण्याच्या वाटा दाखवल्या जात असतील, वगैरे वगैरे, पण माझ्या तिथल्या चार वर्षांच्या वास्तव्यात मला शिक्षण आणि प्रगती यांच्यातली भिंत अभेद्य का आहे, ते कळले. एक महत्त्वाचा भाग म्हणजे विद्यापीठाचा लिंगभेदाबाबतचा बुरसटलेपणा.

विद्यापीठात एक महिना काढल्यानंतर मला कळले की बारावीपर्यंतचे आणि पदवीपर्यंतचे अभ्यासक्रम मुलींना व मुलांना वेगळे ठेवत असत. हा विचार करण्याजोगा मुद्दा आहे का ?

पुढे वाचा

विवेकवाद – भाग २

(प्रथम प्रकाशन मे १९९० अंक १.२, लेखक – दि. य. देशपांडे) या लेखमालेच्या पहिल्या लेखांकात आपण ज्ञानक्षेत्रातील विवेकित्वाचा एक नियम पाहिला. तो नियम असा होता की ज्या विधानाच्या सत्यत्वाचा पुरेसा पुरावा उपलब्ध असेल अशाच विधानावर आपण विश्वास ठेवावा, आणि तो विश्वास पुराव्याच्या प्रमाणात असावा. तसेच विधानाचा पुरावा तपासण्याची शक्ती आपल्याजवळ नसेल तर त्या त्या ज्ञानक्षेत्रातील तज्ज्ञाला किंवा वैज्ञानिकाला प्रमाण मानावे.

नंतर आपण कर्मक्षेत्रातील विवेकाकडे वळलो, आणि आपली कर्मे विवेकी केव्हा होतील याचा विचार करण्यास आरंभ केला. आपल्या असे लक्षात आले की कर्माचा विचार आपण जसा साध्य म्हणून करू शकतो तसाच एखाद्या साध्याचे साधन म्हणूनही करू शकतो.

पुढे वाचा

शुद्धलेखनांतील अराजक परिणाम आणि उपाय (उत्तरार्ध)

मागच्या लेखांकांत अराजकाचे परिणाम काय झाले आहेत, ते स्पष्ट केले आहेत. ह्या अंकांत आपण उपायांकडे लक्ष देणार आहोत.

पहिला उपाय मला सुचतो तो असा की प्रमाणभाषेला प्रत्येकाने परकी भाषा मानून आपले दैनंदिन व्यवहार स्थानिक बोली भाषेत करावे. प्रमाणभाषेचे शिक्षण मातृभाषेचे शिक्षण म्हणून न देतां एक वेगळी, परकी भाषा म्हणून द्यावे. ही संपर्कभाषा आहे हा संपर्क, भूतकाळांत लिहिल्या गेलेल्या वाययाशी आणि निरनिराळ्या बोली जेथें बोलल्या जातात त्या त्या प्रदेशांशी आम्हांला साधावयाचा आहे असा विचार आपण सर्वांनी करावा. प्रमाण लिखित भाषेला मातृभाषा (घरगुती, दैनंदिन व्यवहाराची बोली) करण्याचा प्रमाद गेल्या शतकामध्ये मुख्यतः ब्राह्मणांनी केला ती त्यांची फार मोठी चूक झालेली आहे.

पुढे वाचा

आधुनिकोत्तरवाद, हिंदू राष्ट्रवाद व वैदिक विज्ञान (२)

एकोणिसाव्या शतकातील नव-हिंदुराष्ट्रवाद्यांनी अध्यात्मकेंद्री हिंदुत्वाच्या आधिभौतिक रूपावर आधुनिक विज्ञानाचा साज चढवायला सुरुवात केली. कर्मकांडे, निसर्गव्यवहार आणि मानवाची नियती यांच्यात साम्ये शोधण्याच्या प्राचीन पंडिती परंपरेचाच तो एक नवा अविष्कार होता. आजचे हिंदुत्वप्रचारक या लोकांचेच वारस आहेत.

आधुनिकोत्तरांचे मत असे विश्वाचे वास्तव रूप अनाकलनीय आहे. सर्वच समाज आपापल्या रचनेप्रमाणे विश्वाबाबतच्या ज्ञानाची पद्धतशीर ‘दर्शने’ उभारतात. सर्वच समाजांची दर्शने स्वेच्छ, रीलळीीरी असतात. त्यांच्यात सत्यासत्यतेवरून डावे उजवे करता येत नाही. त्यांची हवी तशी मिश्र रूपे घडवून वेगवेगळ्या समाजांना वेगवेगळी सांस्कृतिक विश्वे घडवता येतात. विश्वाबाबतच्या वेगवेगळ्या संकल्पनांमध्ये सारखेपणा शोधणे आधुनिकोत्तरांच्या ज्ञानशास्त्राला मान्य आहे.

पुढे वाचा

विसर्जित गणपती दान करा!

लोकांनी नैसर्गिक पाण्याच्या स्रोतात गणेशविसर्जन न करता त्या मूर्ती लाक्षणिक विसर्जन करून दान द्याव्यात हा या चळवळीचा मुख्य उद्देश आहे. या दान दिलेल्या मूर्तीचे निर्गत मग अन्य ठिकाणी पर्यावरणाला विशेष हानी न पोचविता केले जाते. पूर्णतः धार्मिक अंगाने विचार केला तर गणपतिविसर्जन हा भाग परंपरेचा अधिक आहे. प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी व सांगता पूजा केल्यानंतर गणपतीच्या मूर्तीत देवत्व नसते. त्यामुळे या आंदोलनाने धार्मिक बाबींमध्ये ढवळाढवळ होत नाही. याउलट लोकसंख्यावाढीमुळे, मूर्तीचे आकारमान वाढल्याने, त्यांच्या बनविण्याच्या पद्धतीत व साधनात बदल झाल्याने आणि नैसर्गिक जलस्रोतांची हानी झाल्याने पारंपारिक गणेशविसर्जन बदलले आहे.

पुढे वाचा

परिसंवाद

(चार विचारवंतापुढे पाच प्रश्न मांडले गेले. मांडणी जराजराशी वेगळी असूनही मतांचा गाभा मात्र समान असल्याचे दिसते.) प्रश्न १: भारतीय मध्यमवर्ग कोणत्या अर्थी इतर देशांमधील मध्यमवर्गापेक्षा वेगळा आहे ? आदित्य निगम: आर्थिकदृष्ट्या उपभोक्ता वर्ग सगळीकडे सारखाच असतो. राजकीय-सामाजिक चित्र मात्र (भारतात) गुंतागुंतीचे आहे. दलित, मुस्लिम, हिंदू असे राजकीय आशाआकांक्षांमुळे वेगवेगळे गट पडले आहेत पण ते वेगाने ‘वैश्विक’ होत आहेत. नेहरूयुगात अभिजनवर्ग इंग्रजी जाणणाराच असे. आज भाषिक, प्रांतिक इत्यादी गट विकसित होऊन काँग्रेसचे पतन झाले आहे, आणि प्रांतिक पक्ष वाढले आहेत. अशा परिस्थितीत एकच एक मध्यमवर्ग मानणे भ्रामक ठरेल.

पुढे वाचा