पत्रव्यवहार

निखिल जोशी, ‘तत्त्वबोध’, हायवे, माथेरान रोडजवळ, नेरळ, रायगड – 410101 वादविवाद ज्ञानसंवर्धनासाठी आवश्यक आहेत. आ. सु.मध्ये अनेक विषयांवर वादविवाद झाले. परंतु त्यात खेळाचे नियम मोडणारी पत्रे कमी असत. एप्रिल 2004 च्या अंकातील वसंत त्रिंबक जुमडे यांचे पत्र त्यांपैकी आहे. बहुतेक वादांमध्ये काही मूलभूत गृहीतकांना दोन्ही पक्षांची मान्यता असते. जुमडे यांच्या “… चर्चा व त्यातून दोषारोप हे ज्ञानवृद्धीच्या दृष्टीने उपयोगी पडत नाहीत”, या दाव्यालाच बुद्धिप्रामाण्यवादाचा विरोध आहे, कारण “चर्चा हवी की नको”, या प्रश्नाचे उत्तर चर्चेने शोधले तर होकारार्थीच येईल. चर्चा नको अशी मागणी करणाऱ्या जुमडे यांना युक्तिवाद करण्याचाही हक्क नाही. मुदलातच खोट असलेले विचार छापण्यात आ.सु.चा काय उद्देश आहे?

गंमत म्हणजे आ.सु.ला पाठविलेल्या माझ्या आधीच्या पत्रात मी ज्या ठकार यांना अध्यात्मवादी संबोधिले त्यांनाच जुमडे यांनी विज्ञानवादी ठरविले आहे. 1=2 गृहीत धरून 100 = 200 हेही सिद्ध करता येते. तसेच छोट्या वाक्यांतून चुकीची गृहीतके पेरून जुमडे यांचे लेखन केलेले आहे. जुमडे यांचे मूळ वाक्य आणि माझ्या आक्षेपाचे कारण या क्रमाने मी आक्षेप दिलेले आहेत.

मूळ वाक्य : ज्ञानार्जनातच अज्ञान उघडे पडते . कारण : कोणत्याही बाबीचे मापन करण्यासाठी तिचा नमुना तपासासाठी पाठवावा लागतो. कोणत्याही गोष्टीचे मापन करण्याचा प्रयत्न केल्यास ती गोष्ट बदलते. किमान बदलाची किंमत हायझेनबर्गच्या अनिश्चितता सिद्धांताने ठरते. “2+2=4 हे सत्य मला अज्ञात आहे.” हा दावा खोटा असतो. अज्ञात होते.” असा दावा असू शकतो. अज्ञान उघडे पडणे म्हणजेच ज्ञान मिळणे होय. त्यात अंतर्विरोध नाही. मूळ वाक्य : “.. वस्तूंना दृश्य आणि अदृश्य अशा दोन बाजू असतात”, “अदृश्य बाजू रूपाला आधारभूत असते असे मानले (?). चैतन्यमय शिवाय या विश्वातील घटनांचे स्पष्टीकरण देता येत नाही”, “अध्यात्माचा पाया असणारा अनुभव पूर्ण इंद्रियातीत असतो.” कारण : विज्ञानाच्या मते इंद्रियांपलीकडे ज्ञान मिळविण्याचे मार्गच नाहीत. विज्ञानाची गृहीतके अध्यात्माचा पाया नाकारतात. त्यांचे सहजीवन शक्य नाही. आध्यात्मिक अनुभव या नावाने आलेले सारे अनुभव इंद्रियांना होतात आणि विज्ञानाचे नियम पाळून त्यांचे स्पष्टीकरणही करता येते. विषाणू, प्रिऑन आणि जनुकीय अभियांत्रिकीच्या उदाहरणांवरून सिद्ध होते की सजीवत्व, चैतन्य असे काही अस्तित्वातच नाही.

मूल वस्तू . कुणी निर्माण केले. . ” मूळ वाक्य : कारण: पूर्वी 92 मूलद्रव्यांचे प्रत्येकी शेकडो गुणधर्म गृहीत धरण्यापेक्षा इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या तीन कणांचे काही गुणधर्म गृहीत धरण्यात आले. त्यांच्या साहाय्याने 92 मूलद्रव्यांचे गुणधर्म सिद्ध करता येत असूनही त्यांना क्वार्कच्या गृहीतकाने सिद्ध केले. आता क्वार्कला स्ट्रिंग गृहीतक बाजूला टाकेल असे प्रयत्न चालू आहेत. कमी गृहीतके धरणारे सिद्धांत स्वीकारले जातात. देव या कणाच्या गुणधर्मावरून क्वार्कचे गुणधर्म सिद्ध होतात काय? मूलकण का बनले याचे उत्तर शोधण्याचा एकीकृत सिद्धांताचा प्रयत्न आहे. असा सिद्धांत कधीच बनणार नाही असे सिद्ध झाले तर केवळ “हे कण विनाकारण बनले” असा दावा विज्ञान करेल. अशा परिस्थितीतही अध्यात्माला “मूलकण देवाने बनविले” असे जाहीर करून “देव विनाकारण बनला” असे परिशिष्ट जोडावे लागेलच. देव स्वतःहून बनल्याचा दावा करणारे व देवाने स्वतःच्या आणि जगाच्या निमिर्तीने काय साधले याचे उत्तर नसणारे अध्यात्म (= देव + विशिष्ट नियम पाळणारे कण) आणि कण स्वतःहून बनले असा दावा करणारे व कण का बनले याचे उत्तर नसणारे विज्ञान (= विशिष्ट नियम पाळणारे कण) या प्रतिस्पर्धी सिद्धांतांपैकी कमी घटक असणारे विज्ञान निवडावे लागते.

मूळ वाक्य: “पाश्चात्त्यांनी… परंपरा सोडलेल्या नाहीत.” कारण : एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याला वासरू मारण्याचा परवाना मिळत नाही. मूळ वाक्य : ‘अध्यात्म निराशावादी नाही.’ हा परिच्छेद. कारण : पाप, पुण्य, स्वर्ग, नरक यांचे बुजगावणे सदाचारासाठी वापरणे योग्य नाही आणि उपयोगीही नाही, आस्तिक आणि नास्तिक यांचे समाजातील आणि गुन्हेगारांतील प्रमाण बघितले की हे सिद्ध होईल. संतांच्या शिकवणीतून गुलामगिरीविरुद्ध बंड न करण्याचा सल्ला मिळतो. “विठू महाराने आदिलशहाला जाब विचारून दम का भरला नाही?”, असा प्रश्न सावरकरांनी विचारला होता. दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्या ‘कल्चर अँड सिव्हिलायझेशन ऑफ एन्शंट इंडिया’ या पुस्तकाच्या जयंत गडकरी यांनी केलेल्या ‘प्राचीन भारतीय समाज-संस्कृती संवर्धन : ऐतिहासिक रूपरेखा’ या भाषांतरात दिले आहे की, गीता तर्कशुद्ध नाही, त्यात परस्परविसंगत विचार खुबीने गुंफलेले आहेत. त्यामुळे वाचक कोणत्याही कृत्याची तरफदारी करून जबाबदारी झटकू शकतो. मूळ वाक्य : भारताची प्राचीन प्रगती हा परिच्छेद.

” कारण: “वैज्ञानिकसुद्धा… गणिती रूप हे वाक्य लिहिणाऱ्या जुमडे यांनी स्वतःच तपासून पहावे की भारतीय लिखाण प्रतिभा या अवस्थेच्या पुढे गेले का? माकडाला टाईपरायटर बडवायला दिला तर कधी ना कधी शेक्सपियरची सर्व सुनीते ओळीने छापली जातील, तसेच प्रतिभेचे आहे. पुष्पक विमान जर बनविले तरी उडणार नाही. पाश्चात्त्यांच्या प्रमाणपत्राला विज्ञान किंमत देत नाही.

अध्यात्माला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पराभव करता येत नाही. 100% वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जगता येते. आत्मा कल्पना नाकारून देहाची वाढ करता येते. अध्यात्मवाद्याला मात्र भौतिक जीवनात पदोपदी बुद्धिप्रामाण्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वापरावा लागतो. देहाशिवाय ध्यान लावता येत नाही. सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडित: : या विचाराने जुमडे यांनी माघार घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. विज्ञानाला असे सवतेसुभे करण्याची काहीच गरज नाही. ते शक्यही नाही. विज्ञान आणि अध्यात्म यांच्या कार्यक्षेत्रात सामाईक भाग आहेत, कारण विज्ञान आक्रमक पवित्र्याने अध्यात्माच्या दाव्यांना आव्हान देते.

प्रकाश बुरटे यांनी एप्रिल 2004 च्या अंकात दावा केला आहे की विज्ञानाव्यतिरिक्त जीवनाला अनेक अंगे आहेत. मात्र त्यांनी या अंगांची यादी नमूद केलेली नाही. बुरटे यांना कला, भावना इ. अंगे अभिप्रेत असावीत. परंतु अध्यात्म इ. विज्ञानविरोधी अंगे अभिप्रेत असल्याचा गैरसमज होऊ शकतो. कला इ. अंगांचा लोकांना आज आधार घ्यावा लागत असला तरी ही अंगे विश्वासार्ह नाहीत. म्हणूनच मानवी जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये कार्यकारणभाव समजून घेऊन भविष्यातील घटनांची पूर्वसूचना मिळवून फायदा मिळविण्यासाठी विज्ञानाचाच वापर करावा लागतो. गणित, भौतिकी रसायन जीवशास्त्र → मानसशास्त्र, भावना समाजशास्त्र → नागरिकशास्त्र, इतिहास, कला हे सारे आधीच्या विषयांवर अवलंबून आहेत. त्यांच्यात वैज्ञानिक कौशल्य मिळविण्यासाठी प्रगती चालू आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाव्यतिरिक्त कोणती निर्णयप्रक्रिया तेवढाच फायदा मिळवून देते, ते प्रकाश बुरटे यांनी कृपया जाहीर करावे ही विनंती. या संदर्भात ‘विवेकी माणसांना कधी राग येतो का?’ हे संपादकीय अधिक प्रकाश टाकते. विज्ञानावर मानवी प्रज्ञेचे आरोपण करताना ‘वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली ‘व्यक्ती’ या शब्दप्रयोगाऐवजी विज्ञान हा शब्द वापरून कागद वाचविला जातो. [जुमड्यांच्या लेखावरील ठकार व जोशींच्या प्रतिक्रियांची तुलना करावी ! करावी ! – सं.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.