मासिक संग्रह: मार्च, २००४

संपादकीय

विज्ञान विशेषांकासाठी आलेल्या दोन लेखांचे उत्तरार्ध जागेअभावी या अंकात येत आहेत.
आजचा सुधारकचे स्नेही व सल्लागार डॉ. विश्वास कानडे यांचे नुकतेच निधन झाले. प्रा.प्र.ब. कुलकर्णीचा पुढील अंकातील लेख वाचकांना कानड्यांची ओळख करून देईल. कानड्यांनी आसुमधून विचारलेला प्रश्न, “प्राचीन भारतीय साहित्यात समाजरचनेबाबत काही चिंतन आढळते का?’ हा मात्र आजही अनुत्तरित आहे.
मोहन कडू व मधुसूदन मराठे या आमच्या लेखक-वाचक स्नेह्यांचेही नुकतेच निधन झाले. कडूंचे इट कांट हॅपन हिअरचे परीक्षण आम्हाला एक नवा, सक्षम लेखक मिळाल्याचा आनंद देत असतानाच अवघ्या 50 च्या वयात कडू वारले.

पुढे वाचा

पत्रसंवाद

विज्ञानाचे स्वरूप सांगणारा विशेषांक फारच चांगला झाला आहे. त्यात दिलेली माहिती प्रत्येक सुविद्य माणसाला माहीत हवीच.
सामान्य माणसाच्या जीवनात मात्र विज्ञान फारसे शिरत नाही. त्यातले काही न समजताही तो फोनची बटने दाबून, स्कूटरला किक मारून, कम्प्यूटरचा ‘उंदीर’ चालवून आपला कार्यभाग साधत असतो. त्याची बुद्धी स्थल-काल, द्रव्यगुण या पारंपारिक संकल्पनांशी जुळलेली असते. या सर्वच कल्पना जिथे विलय पावतात, ऊर्जेचा पुरावा असतो पण द्रव्याचा पुरावा नसतो, तरीही गुरुत्वाकर्षण शक्ती असते, स्थल-काल हे स्वतंत्र पदार्थ नसून ते एका जटिल गणिती संबंधाने जुळलेली कशाचीतरी रूपे असतात अशा ‘नेति, नेति’ कल्पना सामान्य मनुष्याच्या पचनी पडत नाहीत.

पुढे वाचा

पाण्याचे व्यवस्थापन आणि कायदेकानू (भाग १)

पाऊस आकाशातून पडतो. केव्हाही, कुठेही, कितीही पडतो. लोकांना वाटते पावसाचे पाणी फुकट मिळते. पाऊस आपल्या अंगणात आणि शिवारातच फक्त पडत नाही. रानावनात, डोंगर दऱ्यात . . . सर्वत्र पडतो. हे पाणी धरून ठेवावे लागते. वाहून न्यावे लागते, आयात-निर्यात करावे लागते, स्वच्छ ठेवावे लागते, पुढील पाऊसकाळ येईपर्यंत पुरवावे लागते, म्हणून पाण्याचे व्यवस्थापन करावे लागते. त्यासाठी लागणारे व्यवस्थापक, अभियंते, धरणे, कालवे, नळ, जलशुद्धीकरणाच्या सोयी, पंप, डिझेल, वीज या गोष्टी फुकट मिळत नाहीत. हा एक पूर्वनियोजित प्रचंड खटाटोप असतो, म्हणून ही व्यवस्थापनयंत्रणा उभी करावी लागते.

पुढे वाचा

सारे काही समतेसाठीच

परस्परावलंबन आणि नव्या पद्धतीचे अर्थकारण ह्या विषयीच्या मी लिहीत असलेल्या लेखांची सुरुवात अंदाजे दोनअडीच वर्षापूर्वी झाली. ही लेखमाला लांबत चालली आहे आणि ती तुटकपणे प्रकाशित झाल्याने तिच्यातील संगती राखणे अत्यंत अवघड झाले आहे. त्यामुळे ह्या एका लेखानंतर ही लेखमाला थांबवावी आणि ह्या विषयावर एक मुद्देसूद आणि बांधेसूद पुस्तक लिहून तयार करावे, असा विचार माझ्या मनात दृढमूल होऊ लागला.

श्री. भ. पां. पाटणकर, डॉ. चिं. मो. पंडित, श्री. मधुकर देशपांडे, आणि श्री. फाळके ह्या मंडळींनी ही माझी लेखमाला साक्षेपाने वाचली. आणि त्यांचे माझ्याशी असलेले मतैक्य आणि मतांतर नोंदवले ह्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे.

पुढे वाचा

गणिताचे समाजातील स्थान आणि कार्य (उत्तरार्ध)

गणिताचे महत्त्व किती याची जाणीव व्यापक समाजाला आहे का? गणित विषयात काम करणाऱ्याला समाज कशा प्रकारची वागणूक देतो? एकूण सर्वच विज्ञानक्षेत्र आणि खास करून गणित यांची चांगली कदर पाश्चात्त्य समाजाला निदान आधुनिक काळात तरी, असल्याचे दिसते. 19 व्या शतकाची सुरुवात होईपर्यंत केवळ गणितालाच वाहून घेतलेल्यांची संख्या फारच तुरळक होती. त्यानंतर मात्र गणितज्ज्ञांना, अगदी गणितासाठी गणित करणाऱ्यांनाही, पाश्चात्त्य समाजाने बऱ्यापैकी पाठिंबा दिल्याचे दिसते. अनेक विद्यापीठांची तसेच इतर विद्याकेंद्राची स्थापना, आणि काही गणितज्ज्ञांना तेथील राजेरजवाड्यांनी केलेले साहाय्य यावरून याची चांगली खात्री पटते. अर्थात काही अत्युत्कृष्ट व्यक्तींना जरूर तो पाठिंबा न मिळाल्याच्या घटना आहेत.

पुढे वाचा

विज्ञान ही काय चीज आहे? (उत्तरार्ध)

थॉमस कून यांचा वैज्ञानिक क्रांतींची संरचना (The Structure of Scientific Revolutions) हा ग्रंथ 1962 साली प्रसिद्ध झाला. त्यानंतरच्या चाळीस वर्षांत या ग्रंथावर जगात हजारो शोधनिबंध लिहिले गेले असतील. या ग्रंथामुळे विज्ञानाकडे बघण्याच्या एकूणच दृष्टिकोनात क्रांती घडून आली. विज्ञान म्हणजे काय हा विचार करताना कूनपूर्व आणि कूनोत्तर असे दोन कालखंड पडतात. अर्थात ते अगदी काटेकोर कालगणनेनुसार नव्हेत. कारण इ.स. १९६२ नंतरही कूनपूर्व कालखंडातील दृष्टिकोनाचा पाठपुरावा करणारे अनेक तत्त्वज्ञ आढळतात. किंबहुना कून यांच्या प्रबंधाने सुरू झालेली चर्चा अजूनही संपलेली नाही. एवढे मात्र खरे की १९६२ नंतर ज्याला कूनीय वा कूनोत्तर दृष्टिकोन म्हणता येईल तो रुजत गेला आणि सध्याचा विज्ञानाच्या अभ्यासाचा प्रचलित, अधिकृत, वर्चस्वी दृष्टिकोन तोच आहे.

पुढे वाचा

आकलनातील अडथळा

आपल्याकडे थोर व्यक्तींना देवपण देण्याची खोड आहे. यामुळे त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाला खरीखुरी बाधा जरी येणार नसली तरी आपल्या आकलनाला निश्चितच येते. त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाकडे आपण नेमकेपणाने पाहू शकत नाही. देवच म्हटल्यावर काय हो? तो काहीही करू शकतो. तो श्रेष्ठच असतो. त्याला वेगळ्या कष्टांची काही जरूरच नसते. दुसरे अशा ‘देवांच्या’ कर्तृत्वातून आपण कोणतीही प्रेरणा खऱ्या अर्थाने घेऊ शकत नाही. तो देव आहे, आपण मात्र माणूस. आपले हात लहानसे असतात. परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य त्यांत कुठून असणार — अशी एक सबब आपसूक तयार होते.

पुढे वाचा