1. माधव गाडगीळ: तीस वर्ष इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर, येथे संशोधन व अध्यापन. यापैकी तीन वर्ष सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेसचे प्रमुख. ‘पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर’ व इतर अनेक सरकारी, गैरसरकारी प्रकल्पांद्वारे सतत संशोधन. हार्वर्ड, स्टॅन्फर्ड व बर्कली येथे व्हिजिटिंग प्रोफेसर, पद्मश्री व अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार व सन्मान.
[190 शोधनिबंध, (रामचंद्र गुहांसोबत) ‘धिस फिशर्ड लँड’ व ‘इकॉलजी अँड इक्विटी, राव यांसोबत’ ‘नर्चरिंग बायोडायव्हर्सिटी,’ व ‘डायव्हर्सिटी : द कॉर्नरस्टोन ऑफ लाईफ’ आणि ‘इकॉलॉजिकल जर्नल’ ”]
2. हेमचंद्र प्रधान : प्राध्यापक व डीन, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, T.I.F.R. सांप्रत मुख्य कार्य विज्ञान आणि गणित शिक्षण या क्षेत्रात. येथे 20 हून अधिक पुस्तके प्रसिद्ध —- लेखक, सहलेखक, संपादक नात्याने. शिवाय 50 हून अधिक संशोधन लेख आणि 100 हून अधिक popular विज्ञानविषयक लेख.
3. कॉलिन टज् : प्राणिशास्त्रज्ञ, विज्ञान वार्ताहर, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या तत्त्वज्ञानकेंद्रात रीसर्च फेलो. [‘द डे विफोर यस्टरडे’ सकट नऊ पुस्तके.]
4. सुधीर पानसे : संचालक, Board of College and University Develpment, मुंबई विद्यापीठ; तत्पूर्वी साठ्ये महाविद्यालयात भौतिकी विभागप्रमुख व प्राचार्य. मुख्य संशोधन विषय-उष्मा गतिशास्त्र. पुस्तक : ‘वैज्ञानिक दृष्टिकोण आणि आपण’, प्रकाशक : लोकवाङ्मय गृह.
5. मिलिंद वाटवे : पुणे व बंगलोर येथे शिक्षण. पुण्यास गरवारे कॉलेजात सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक, अनेक पेटंटे. तीस शोधनिबंध, पैकी एकाचा भाग ‘सायन्स’ नियतकालिकाने उद्धृत केला. ऐंशीवर लोकप्रिय विज्ञानविषयक लेख. संगीताच्या ध्वनिफिती, विज्ञान-चित्रापटाचे दिग्दर्शन. दोन क्रमिक पुस्तकांचे लेखन. ‘आपली सृष्टी, आपले धन (भाग 1 ते 4)’, ‘आरण्यक’, ‘पक्ष्यांच्या गोष्टी’ ही ग्रंथसंपदा. अनेक सर्जनशील तरुण-तरुणींना मार्गदर्शन.
6. एम्. एस्. रघुनाथन : F.R.S., Prof of Eminence, T.I.F.R. Fellow and Prize-winner of Third World Academy. Algebraic Geometry, Lie Groups या क्षेत्रांत महत्त्वाचे काम.
7. प्रा. अनिल गोरे : पुणे विद्यापीठात संख्याशास्त्राचे प्राध्यापक, जीवशास्त्र व परिसरशास्त्रात सांख्यिकाच्या वापरात विशेष रस, कॅलॉरी, अॅरिझोना, मिशिगन इत्यादी विद्यापीठात ‘व्हिजिटिंग प्रोफेसर’. अनेक पुरस्कार व सन्मान.
[‘नराचा नारायण’ व ‘माकडचेष्टा’, ‘स्टॅटिस्टिकल अॅनलिसिस ऑफ स्टॅटिस्टिकल इकॉलजी’ ही दोन इतरांसोबत लिहिलेली पुस्तके.]
8. वि. शं. ठकार : विज्ञान, गणित व संगणक यांचा अभियांत्रिकीत सहभाग यावर संशोधन, अध्यापन व लेखन. [ ‘द पिक्चर ऑफ डॉरियन ग्रे’ व ‘काळाचा छोटा इतिहास’ ही भाषांतरित पुस्तके व ‘अभिनव मराठी-मराठी-इंग्रजी पर्यायशब्दकोश’]
9. सुलक्षणा महाजन : आर्किटेक्ट, मुंबई व मिशिगन विद्यापीठात अध्ययन. नागरी, तांत्रिक व पर्यावरणशास्त्रीय नियोजनाच्या क्षेत्रात संशोधन. भाभा अणुविज्ञान केंद्र व अनेक मान्यवर कंपन्यांमधील सखोल अनुभवानंतर सध्या रचना संसदेच्या कला अकादमीत व ‘जे. जे.’ मध्ये अभ्यागत म्हणून अध्यापन.
हुषारी—-आवश्यक आणि पुरेशी?
एकोणीसशे पन्नासच्या दशकात रेणुजीवशास्त्राच्या पहिल्या सुवर्णयुगात, इंग्लंडातील ऑक्स्फर्ड आणि (त्यापेक्षाही जास्त) केंब्रिज विद्यापीठांमधून विसावर असामान्य क्षमतेच्या विद्यार्थ्यांनी पदव्या कमावल्या. सामान्य तरुण वैज्ञानिकांपेक्षा हे खूपच प्रतिभावान, सर्जनशील, आपले म्हणणे स्पष्टपणे मांडणारे आणि वादविवादपटु असे होते. यांत अगदी वॉटसनच्या दर्जापर्यंतचे विद्यार्थी होते. वॉटसन अत्यंत हुषार तर होताच पण त्याहीपेक्षा जास्त असे की त्याला कशाबद्दल तरी हुषारी दाखवायची संधी मिळाली. इतरांच्या तुलनेत ही मोठीच जमेची बाजू होती. बुद्धीचा वापर करणाऱ्या इतर क्षेत्रांपेक्षा विज्ञानक्षेत्राला नेहेमीच हा फायदा असतो, आणि तो कौशल्याच्या सर्व पातळ्यांवर असतो. पहिल्या दर्जाचा वैज्ञानिक होण्याला ‘चमकदार’ हुषारी असणे आवश्यक नसते —- पुरेसे तर मुळीच नसते. विज्ञानामुळे झालेल्या अनेक क्रांतिकारक सामाजिक बदलांपैकी एक म्हणजे संशोधनाचे लोकशाहीकरण. कोणताही सबळ धादान्तवादी शहाणपण (कॉमन सेन्स) असलेला आणि साधारण कल्पनाशक्तीचा माणूस सर्जक वैज्ञानिके होऊ शकतो. जितपत आनंद स्वतःच्या क्षमता पूर्णपणे विकसित करण्यातून मिळतो, तितपत तो आनंदीही होऊ शकतो.
पीटर मेडावर (जेम्स. डी. वॉटसनच्या DNA च्या रचनेच्या ‘उकली’ची कहाणी सांगणाऱ्या द डबल हेलिक्स या पुस्तकाच्या परीक्षणातून.)