मासिक संग्रह: ऑगस्ट, २००३

पत्रसंवाद

जॉर्ज ऑर्वेलच्या -1984′ या उपहासगर्भ पुस्तकातील शासनाची एक घोषणा ‘इग्नोरन्स इज स्ट्रेंग्थ’ ही आहे. या पुस्तकातल्यासारख्या शासनाविषयी घृणा बनविण्यासाठी हे पुस्तक लिहिले गेले. देवरायांच्या समर्थकांनाही ही घोषणा आवडत नसावी या गृहीतकावर पुढील लिखाण आहे.
औषधशास्त्रात प्लॅसिबो ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. खोट्या समजुतीचा सुद्धा औषधासारखा परिणाम घडत असेल तर त्यास प्लॅसिबो परिणाम म्हणतात. मात्र प्लॅसिबो परिणाम केवळ खऱ्या औषधाची परिणामकारकता तपासण्यासाठीच वापरला जातो. रोग निवारण्यासाठी प्लॅसिबोचे बुजगावणे वापरले जात नाही. फसवणूक करून लोकांवर अगदी त्यांच्या भल्यासाठीसुद्धा राज्य करू नये असा टूमन शो किंवा मेट्रिक्स या चित्रपटांचा विषय आहे.

पुढे वाचा

राजकीय व अर्थविषयक व्यवस्था : काही विचार व सूचना (लेख-१)

१. मूल्ये
न्याय, स्वातंत्र्य व समता या तीन मूल्यांवर कोणतीही मानवी व्यवस्था आधारलेली असावी. त्यामधील न्याय हे मूल्य सर्वात महत्त्वाचे आहे. कारण फक्त न्याय हे एकच तत्त्व घेतल्यास त्यातून स्वातंत्र्य व समता या दोन्ही गोष्टी योग्य प्रमाणात आपोआप विकसित होतात. न्याय म्हणजे फक्त कायद्याचे बंधन व पालन या अर्थाने नाही, तर मूलभूत अर्थाने न्याय हे तत्त्व घेतल्यास त्याचा
अतिरेक होऊ शकत नाही. त्यामुळे स्वातंत्र्य व समता नष्ट होऊ शकत नाहीत. न्यायामुळे स्वातंत्र्य व समता यांचा प्रमाणबद्ध विकास होऊ शकतो. उलटपक्षी स्वातंत्र्याचा अतिरेक झाल्यास ते विषमता व अन्याय दोन्हीला कारणीभूत होऊ शकते व पूर्ण समतेचा हट्ट धरल्यास स्वातंत्र्य व न्याय यांचा बळी जातोच, पण अखेर समताही बळी पडते.

पुढे वाचा

मांसाहार की शाकाहार?

हल्ली नेहमी असा प्र न विचारला जातो की, शाकाहार चांगला की मांसाहार चांगला? कोठेही पार्टीला जावे तर मांसाहार घेणे हे प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते. म्हणूनच अनेक लोक शाकाहार सोडून मांसाहाराकडे वळतात व त्यातच आपण धन्य झालो असे मानतात. मांसाहारामुळे शरीर धडधाकट होते व त्यामुळे दीर्घायुष्य लाभते आणि प्रकृती ठीक ठेवायची असेल, तर मांसाहार अपरिहार्य व आवश्यक आहे अशी एक विचारप्रणाली आहे. याच्या उलट शाकाहारी लोक म्हणतात की, शाकाहारी राहूनसुद्धा सुदृढ शरीर, तरतरीत मेंदू व दीर्घायुष्य मिळू शकते. याचे उदाहरण द्यायचे तर प्रसिद्ध इंग्लिश लेखक बर्नार्ड शॉ व आपल्याकडचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ सर सी.

पुढे वाचा

गांधीवाद विरुद्ध नथुरामवाद

संदर्भ : आ.सु. डिसेंबर 02 मधील श्री. मधुकर देशपांडे यांचा ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हा लेख एप्रिल 03 मधील श्री. शांताराम कुळकर्णी यांचा ‘हे चित्र पहा,’ हे पत्र:
कोणत्याही संत-महात्म्याच्या किंवा महापुरुषाच्या संदर्भात जनसामान्यात प्रामुख्याने तीन प्रकारचे लोक असतात. (1) द्वेषी (2) प्रेमी (3) कुंपणावरचे. रा.स्व.संघ, म.गांधी, पं.नेहरूंचा द्वेषी होता. ‘प्रेमी’ मध्ये दोन प्रकारचे लोक असतात. भक्त आणि वादी. भक्त आपल्या प्रिय संतमहंताचे गुणगान, आरत्या, भजने, भाषणे जोशात करतील, पण आचरण करीत नसतात (थोडेसे अपवाद वगळता). आचरणाच्या वेळी त्यांचा स्वार्थ उफाळून येतो.

पुढे वाचा

परस्परावलंबनाविषयी आणखी काही (१)

अंदाजे दोन वर्षांपूर्वी मी काही अर्थकारणविषयक लेख लिहिले. ह्या लेखांची सुरुवात खादीपासून केली असली तरी त्यांचा प्रतिपाद्य विषय ‘अर्थकारणातील सुधारणा’ हा आहे. माझ्या ह्या लेखांवर काही चांगल्या प्रतिक्रिया आल्या. त्यांमध्ये मुख्यतः डॉ. चिं. मो. पंडित आणि श्री. भ. पां. पाटणकर ह्या दोघांनी माझ्या लेखांत मनापासून स्वारस्य दाखविले. पाटणकरांच्या आणि पंडितांच्या काही मुद्द्यांवर माझे म्हणणे मी सुधारकाच्या अंकांमधून मांडले असले तरी त्यांच्या सर्व मुद्द्यांचा परामर्श व्यवस्थितपणे घेण्याची गरज आहे.

डॉ. पंडित ह्यांनी माझ्या सर्व लिखाणाचा अत्यन्त साक्षेपाने विचार केलेला आहे. अनेक ठिकाणी त्यांना माझ्याकडून अधिक स्पष्टीकरण हवे आहे; त्याचप्रमाणे जेथे त्यांचा-माझा मतभेद आहे, असेही मुद्दे त्यांनी निःसंकोचपणे मांडले आहेत.

पुढे वाचा

महाराष्ट्रातील पोरके पाणी (लेख-२)

धनवान व निर्धनातील भेदरेषा पाण्याने आखल्या जाणाऱ्या जलविषमतेची वाटचाल आपल्याला इथिओपिया व सोमालियातील हिंसक अनागोंदीकडे नेऊ शकते. काही राजकीय नेते, काही अधिकारी यांना याचे भान आहे. त्यांच्यामुळे काही सकारात्मक पावले उचलली जात आहेत.
चेन्नईजवळ मोठी नदी नसल्याने पिण्याच्या पाण्याची कायम रड असते. चेन्नई ते महाबलिपुरम परिसरातून पाणी उपसून टँकर सदासर्वकाळ पळताना दिसतात. ही पाण्याची खाण असली तरी ती काही अक्षय नाही. पातळी झपाट्याने घटू लागली. ती कोरडी पडली तर चेन्नई महानगरीची तहान भागविण्याकरिता रेल्वेने पाणी आणण्याशिवाय इलाज नाही, हे लक्षात आल्यावर पाणीपुरवठा सचिव शीला नायर यांनी पाण्याच्या उपशावर नियंत्रण आणले आणि समस्त इमारतींना पावसाचे पाणी साठवणे अनिवार्य असल्याचा आदेश काढला.

पुढे वाचा

विज्ञानाचे रूपांतरण

कालिदासाच्या ‘शाकुंतला’त एक प्रसंग आहे. दुष्यंत शिकारीच्या नादात कण्वाच्या आश्रमाजवळ येऊन हरणावर बाण रोखतो तेव्हा आश्रमवासी त्याला सांगतात की तसे करू नये, कारण पवित्र वनांत प्राण्यांची व झाडांची हिंसा निषिद्ध आहे. 1801 सालानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा फ्रान्सिस बुकॅनन कारवारच्या देवरायांबाबत लिहितो की देवरायां-मधील झाडे तोडायला गावप्रमुखामार्फत देवाची परवानगी घ्यावी लागते. परवानगी फुकट मिळते, पण ती न घेतल्यास देवाचा कोप होतो. पुढे तो म्हणतो की सरकारने ती मालमत्ता (देवराई) काबीज करू नये यासाठी घडवलेली ही क्लृप्ती आहे.
मला देवराया, देवतळी, पवित्र पशुपक्षी यांच्याबद्दल कालिदासाची भूमिका बुकॅननच्या भूमिकेपेक्षा कितीतरी श्रेष्ठ वाटते.

पुढे वाचा

मानवतेविरुद्ध गुन्हा (लेख-३)

शासकीय संगनमत

“गोध्र्यानंतरचा गुजरातेतील हिंसाचार हा राज्याच्या मुख्यमंत्र्याने व शासनाने केलेला संघटित गुन्हा आहे. सरकार व त्याचे अधिकारी यांनी जे केले, व जे केले नाही, त्यावरून हे उघड होते’.

गोध्र्यामागे काही पूर्वतयारी होती व ती एका मोठ्या कटाचा भाग होती, असे सिद्ध होण्याची वाट न पाहता मोदी व त्यांच्या मंत्रिगणाने बेजबाबदार विधाने करून ते सिद्धच झाल्यासारखे चित्र उभे केले. ओळखता न येणारी जळकी प्रेते ‘समारंभाने’ अहमदाबादेस नेणे, नंतरच्या हिंसेचे समर्थन करणे, हेही हिंसेचे मूळ ठरले, आणि त्याचा दोष ठामपणे मोदींकडेच जातो.

पुढे वाचा

विवेकवादी मनुष्याला कधी हसू येते काय?

विवेकवादाविषयी प्रचलित असलेल्या अनेक विलक्षण आक्षेपांपैकी एक आक्षेप असा आहे की विवेकवादी माणसे भावनाहीन असतात. हा आक्षेप इतका विपरीत आहे की सामान्यपणे शहाणी असणारी माणसेही जेव्हा त्याचा पुरस्कार करतात, तेव्हा हसावे की रडावे हे कळेनासे होते. वस्तुतः विवेकवाद ही एक अतिशय शहाणपणाची भूमिका असून तिचे स्वरूप नीट लक्षात घेतल्यास तिच्यात शंकास्पद किंवा विवाद्य असे काही शोधूनही सापडणार नाही अशी आमची समजूत होती. तिच्याविषयी अनेक खोटेनाटे, सर्वथा गैरलागू, असमंजस आक्षेप कोणी का घ्यावेत हे अनाकलनीय आहे. या (कु)प्रसिद्ध आक्षेपांपैकी या लेखाच्या शीर्षकात व्यक्त झालेला आक्षेप एक आहे.

पुढे वाचा

करायला गेलो एक !

ज्ञानाचा आग्रह जेवढा हिंदुधर्मात धरण्यात आला तेवढा विचार इतर कोणत्याही धर्मात नाही; परंतु अज्ञानी जन जेवढे हिंदु धर्मात आहेत तेवढे इतर धर्मांत नाहीत.
इमानदारीचा जेवढा आग्रह इस्लाम धर्मात आहे तेवढा इतर कोणत्याही धर्मात नाही; परंतु बेइमानीच्या जेवढ्या गोष्टी मुस्लिम राजकारणात आहेत तेवढ्या इतर कोणत्याही धर्मात नाहीत.
अपरिग्रहाचा जेवढा आग्रह जैन धर्मात आहे तेवढा इतरांचे ठायी आढळणार नाही; परंतु परिग्रहाच्या मूर्ती जेवढ्या जैनांमध्ये आहेत तेवढ्या इतरत्र दिसत नाहीत.
प्रेमाचा आग्रह जेवढा ख्रि चन धर्मात आहे तेवढा इतर धर्मांत नाही; परंतु धर्माच्या नावावर जेवढी युद्धे ख्रि चन धर्मीयांनी केली तेवढी अन्यत्र झाली नाहीत.

पुढे वाचा