19 व्या शतकात पा चात्त्य जगातही धर्म, कर्मकांड, अंधश्रद्धा यांचे साम्राज्य होते. खरे तर डार्विनने 1838 मध्येच उत्क्रांतीची उपपत्ती (theory of cvolution) मांडणारा Origin of Specics नावाचा ग्रंथ लिहिला होता. परंतु डार्विनची ‘उत्क्रांतीची उपपत्ती’ पारंपारिक पा चात्त्य मनाला रूचणारी नव्हती. केवळ यासाठीच त्याने हा ग्रंथ उपपत्ती सुचल्यावर लगेच प्रकाशित केला नाही. एव्हढेच नव्हे, तर त्याने आपल्या पत्नीलाही सांगितले होते की उत्क्रांतीवरचे आपले लेखन अपेक्षेप्रमाणे आपल्या हयातीत झाले नाही, तर या विषयावरची आपली हस्तलिखिते आपल्या मृत्यूनंतरच प्रकाशित करण्यात यावी. ख्रि चन धर्मानुसार ईश्वरानेच सर्व काही घडवून आणले आहे. सृष्टी ही त्याचीच निर्मिती आहे, आणि ‘मानव’ ही तर त्याची सर्वोत्तम निर्मिती आहे. इतर शास्त्रज्ञांनी ख्रि चन धर्माला रूचतील, मानवतील किंवा तडजोड म्हणून ज्यांना धर्म स्वीकारू शकेल असेच विचार मांडले. एकट्या डार्विननेच भौतिकवाद, नैरर्गिक निवड आणि अनियत किंवा यदृच्छ विभिन्नतेवर भर दिला होता. डार्विनचे विचार बरोबर असूनही तो म्हणतो, “नि चन धर्म किंवा ईश्वरवाद यांवर आघात करून, त्या विरूद्ध बोलून फारसे काही साध्य होणार नाही. माणूस जेव्हा स्वतः सगळे समजून-उमजून शहाणा होईल तेव्हाच त्याला विज्ञानाच्या मार्गावर नेता येईल. म्हणूनच धर्माविषयी मी कधीच काहीही लिहिले नाही. विज्ञान हाच माझा प्रांत आहे.’ म्हणूनच उत्क्रांतीची उपपत्ती डार्विनच्या अभ्यासिकेतच पडून होती.
सुमारे 21 वर्षांनी ए. आर. वॉलेस नावाच्या शास्त्राज्ञाने उत्क्रांतीचे विचार मांडायला सुरुवात केली. तेव्हा डार्विनच्या लक्षात आले की आपल्याला आता आपला ग्रंथ प्रकाशित करायलाच हवा, अन्यथा वॉलेसच्या नावावर ‘उत्क्रांतीचे श्रेय’ जमा झाले असते; आणि डार्विनची सगळी मेहनत, त्याचे श्रम याला काहीच अर्थ उरला नसता. मग डार्विनने (origin of species) प्रसिद्ध केला. उत्क्रांती होऊन गेली आहे असे गृहीत धरूनच डार्विनने हा ग्रंथ लिहायला सुरुवात केली; म्हणून या ग्रंथात उत्क्रांती कशी झाली असावी, त्यामागची कारणे काय असू शकतील याचे विवेचन त्याने केले आहे. उत्क्रांती मागील कार्यपद्धती काय असू शकेल हे सुद्धा लिहिले आहे. पण या यंत्रणेची (Mechanism) दिशा नेमकी काय आणि कशी असेल हे डार्वनला सुचत नव्हते. बरेच सिद्धान्त, गृहितके मांडूनही त्याचे समाधान होत नव्हते. या दरम्यान त्याने केवळ करमणूकीकरता (Malthus on Population) वाचायला घेतले. आणि ते वाचाता-वाचता त्याला नैसर्गिक निवडीची कल्पना सुचली. तो म्हणतो, “जगण्यासाठीचा झगडा, त्यासाठी प्राण्यांच्या बदलणाऱ्या सवयी यांचे मी निरीक्षण केले होते आणि हे पुस्तक वाचतांना माझ्या लक्षात आले की विभिन्नता असली तरच जीव जगतील अन्यथा लोप पावतील. याचा परिणाम म्हणून नवी जात तयार होईल.’ या सर्व बदलांसाठी डार्विनची शब्दरचना होती ‘रूपांतरित अनुवंश’ (descent with modification) ‘उत्क्रांती हा शब्द तेव्हा नव्हताच. डार्विनच कशाला, उत्क्रांतीचे दुसरे अभ्यासक लामार्क आणि हेकेल यांनाही हा शब्द वापरला नव्हता. लामार्क याला रूपांतरण किंवा रचनांतरण (transformation) म्हणतो, तर हेकेल स्वरूपांतरण (transmutation) म्हणतो.
डार्विनने ‘उत्क्रांती’ हा शब्द न वापरण्याला एक कारण असेही होते की 1744 मध्ये जर्मन जीवशास्त्रज्ञ हॉलरने ‘उत्क्रांती’ हा शब्द गर्भविज्ञानाच्या आणि गर्भविकासाच्या संदर्भात वापरला होता. पण त्याचा हा सिद्धान्त बाद झाला. नंतर ऑक्सफर्ड शब्दकोषाप्रमाणे त्याचा अर्थ ‘विकास’ असा होऊन तो ‘रूपांतरित अनुवंशा’ ऐवजी वापरण्यात येऊ लागला. परंतु डार्विनचा ‘उत्क्रांती म्हणजे विकास’ याला कायमच विरोध होता. स्पेस्नरमुळे ‘उत्क्रांती’ हा शब्द चलनात आला आणि या संदर्भात विकासाचा निदर्शक ठरला. Principles of Biology (1864-67) या पुस्तकात स्पेन्सरने अवयवांतील बदलांसाठी (organic change) ‘उत्क्रांती’ हाच शब्द वापरला. शिवाय बदल ही अवयवांची आंतरिक गरज असू शकते किंवा बदल अंगभूत असू शकतात हे स्पेस्नरच्या नजरेतून सुटले. (बऱ्याच शास्त्रज्ञांनी याकडे लक्ष वेधले आहे) अंतर्गत आणि बाह्य प्रेरणांमुळेच ‘बदल’ संभवतात यावरच त्याने जास्त भर दिला. शिवाय बहुतेक शास्त्रज्ञांनी, अभ्यासकांनी अवयवातील बदल म्हणजे त्यांची रचना अधिक क्लिष्टते कडे झुकणार असे गृहीतच धरले होते. त्यामुळे ‘उत्क्रांती’ म्हणजे विकास असेच रूढ होत गेले. डार्विनचे मत होते की अवयवांतील बदल वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी स्वीकारलेल्या क्लिष्ट अनुयोजना असू शकतात, किंबहुना बहुतेक वेळा असेच असते. स्टीफन जे गूल्ड Ever Since Darwin या पुस्तकात म्हणतात की ‘डार्विन’ जर आपण सखोल अभ्यासला असता तर आज सामान्य माणसात उत्क्रांतीविषयी जे गैरसमज आहेत ते सहजच टाळता आले असते.
उद्योगमाऊली अपार्टमेंटस्, प्लॉट नं. 6, ज्ञानेश्वरनगर, गारखेडा, औरंगाबाद