सामाजिक सेवा आणि (पहिल्या महा-)युद्धासाठी (शत्रुराष्ट्रांना) द्यावा लागणाऱ्या नुकसान भरपाईसाठी सरकारने ‘पोकळ पैसा’ छापल्यामुळे प्रचंड भाववाढ झाली. प िचमी राष्ट्रांनी भाववाढ रोखण्यासाठी लादलेल्या उपयांमुळे अनेक जण बेकार झाले. लोकांच्या भ्रमनिरासातून मतदारांचे उजव्या व समाजवादी पक्षांमध्ये ध्रुवीकरण झाले. दोन्ही पक्ष पहिल्या युद्धातून वाचलेल्या युद्ध साहित्याने सज्ज अशा मोठाल्या खाजगी सेना बाळगू लागले. यांच्यातील झटापटींपासून दूर राहणे (टागीसारख्या) तरुण प्राध्यापकाला काही काळ शक्य होते.
दुभंगलेल्या लोकशाही ऐवजी टोटॅलिटेरियन हुकूमशाही ऑस्ट्रियात प्रस्थापित होणे हे नोकरशाही, सेना, कॅथलिक चर्च आणि उजव्या राजकीय पक्ष-यंत्रणांना
आ चर्यकारकपणे ‘रुचकर’ वाटले.
[1937-38 च्या सुमाराची स्थिती वर्णन करणारा हा टागी — अॅन आर्टिस्ट एंजिनीयर या ग्रंथातला उतारा आम्हाला चिं. मो. पंडितांनी पुरवला.]