वरील शीर्षकाचा श्री. सत्यरंजन साठे यांचा लेख साधना साप्ताहिकाच्या २७ एप्रिल २००२ च्या अंकातून घेऊन आजचा सुधारक च्या जून २००२ च्या अंकात छापला आहे. लेखातील विचार पाहता तो तथाकथित बुद्धिवादी आणि सेक्युलरवादी लोकांना संघ आणि संघपरिवारासंबंधी जी कायम कावीळ झाली आहे त्याच दृष्टिकोनातून लिहिला गेला आहे असे माझे स्पष्ट मत आहे. हजारो वर्षांची जुनी परंपरा आणि प्राचीनता असलेल्या हिंदू जीवनशैलीत सतत सत्य, अहिंसा, सहिष्णुता, विचार, उच्चार आणि आचार-स्वातंत्र्यांचा उद्घोष केलेला आहे. श्री. ज्ञाने वरांच्या पसायदानात ‘जो जे वांछील तो तें लाहो प्राणिजात’ या आधी ‘दुरितांचे तिमिर जावो, वि व स्वधर्मसूर्ये पाहो’ असे म्हटले आहे. सर्व वि वातील मानवांचे आणि प्राणिजाताचे मंगल यात चिंतिले आहे परंतु त्यानंतरच ‘खळांची व्यंकटी सांडो’ आणि ‘तया सत्कर्मी रती वाढो’ असेही म्हटले आहे. गेल्या हजार/बाराशे वर्षांचा इतिहास पाहता कितीही सहनशीलता धारण केली आणि कितीही निर्वैर वृत्तीने वागायचे ठरविले तरी खलप्रवृत्तीचा वाकडेपणा काही जात नाही हे दिसून आले आहे. तुकारामांनी स्पष्टपणे म्हटलेच होते की ‘भले तरी तरी देऊं कांसेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणूं सोटा’। महात्मा गांधींनी अहिंसेचा पुरस्कार केलेला असला तरी दुर्बलांच्या अहिंसेला काहीही मोल नाही हे नि िचत. सबलाची अहिंसा निर्माण होण्यासाठी प्रथम आपण खऱ्या अर्थाने सबल होणे आवश्यक आहे. भरतखंडात प्राचीन काळापासून वस्तीला असलेला समाज विखुरलेला होता, संघटित नव्हता, त्याचमुळे कुणीही यावे आणि राज्य करूनी जावे अशी या देशाची स्थिती होती. गतानुगतिकता, रूढिग्रस्तता, अज्ञान, नसत्या कर्मकांडात गुंतलेला हा देश होता. त्याचमुळे हजारो वर्षांची मोगलांची अमदानी या देशावर होती. त्यातून हिंदू-मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक येथे बहुसंख्येने राहिले. कट्टरता, कठोरता, असहिष्णुता आणि गैरमुस्लिमांप्रती निर्ममता हेच मुल्ला/मौलवींचे कायमचे धोरण होते. हे धोरण त्यांच्या कुराण आणि शरियतच्या आदेशानुसारच होते. कुराणातील किमान ३६ आयतांमधून स्पष्टपणे म्हटलेले आहे की जे लोक काफिर आहेत, मूर्तिपूजक आहेत त्यांना प्रथम प्रेमाने आपल्याकडे वळवा नंतर जोर-जबरदस्ती करा व शेवटचा उपाय म्हणजे त्यांना या जगातून नष्ट करा. सर्व वि व ‘हिरवे’ करण्याच्या आपल्या ध्येयाची विस्मृती कधीही होऊ देऊ नका. कट्टर मुस्लिमांचे ध्येय/धोरण सतत हेच राहिले आहे हे आपण स्वातंत्र्योत्तर ५५ वर्षानंतरही पाहत आहोत. फाळणीनंतर जे हिंदू पाकिस्तानात राहिले तेथे त्यांची काय स्थिती आहे हे पाहणे आवश्यक आहे. सुरुवातीला १० टक्के असलेली हिंदूंची संख्या आता २ टक्क्यांपेक्षाही खाली उतरलेली आहे. हिंदूंना आपले कोणतेही धार्मिक सण सार्वजनिकपणे तेथे करता येत नाहीत. त्याउलट भारतात सर्व नागरिकांना समान स्वातंत्र्य दिलेले आहे. सुरुवातीला २ कोटी असलेल्या मुस्लिमांची संख्या आता १४ कोटी एवढी झालेली आहे. शरियतच्या कायद्यानुसार कोणत्याही मुस्लिमाला कितीही बायका आणि कितीही मुले होऊ शकतात. प्रत्येक हिंदू-मुस्लिम दंग्यात मुस्लिमांचीच हानी होते. ते मागासलेले आणि दरिद्री राहतात. कारण मुस्लिम पर्सनल लॉनुसार त्यांना तेच अभिप्रेत आहे. कोणत्याही सुधारणांचे त्यांना वावडे आहे. मदरशांची भरमसाठ संख्या वाढलेली आहे. त्यातून आधुनिक शिक्षण न देता गतानुगतिक कट्टर मुस्लिम बनण्याच्या दृष्टिकोनातूनच शिक्षण दिले जाते.
वरील सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे गेल्या ५० वर्षांत आपण मुस्लिमांबाबत फारच संवेदनशील आणि हिंदूंबद्दल मात्र संवेदनशून्य झालो आहोत. त्याचमुळे काश्मिरातून गेल्या २० वर्षांत हजारो हिंदू पंडित विस्थापित झाले तरी त्याचे आपणास काही वाटत नाही. बांगला देशात शेख हसीनाच्या कारकिर्दीत हजारो हिंदू तरुणींवर आणि हिंदू कुटुंबांवर जिवाचे/अब्रूचे प्रसंग गुदरले तरी आपली मानसिकता ‘चलता है’ अशा त-हेचीच बनलेली आहे. ख्रि चन आणि मुस्लिमबहुल अशा वि वात, हिंदूंची जीवनपद्धती टिकवून ठेवण्यासाठी भारतामध्ये जर हिंदूंचे संघटन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची संघटना निर्माण झाली. दोनदा, तीनदा तिचे खच्चीकरण करण्यासाठी तिच्यावर बंदी आणली गेली आणि तरीही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्या संघटनेचा प्रवेश आणि विस्तार झाला आणि भारतीय राजकारणातसुद्धा तिला महत्त्वाचे स्थान मिळाले तर ते स्वागतार्हच म्हणावे लागले. संघटना जेव्हा मोठी होते तेव्हा त्यात काम करणाऱ्या सर्वांचीच मानसिकता एकसारखी नसते. त्यात काही लोक टोकाला जाणारे असतात. अशा टोकाला जाणाऱ्या लोकांच्या संयमाची एक सीमा असते. ती सीमा ओलांडायला लावणारे प्रसंग जर घडले तर ते गुजरात कांडासारख्या कांडात परिणत होतात. गोध्रा कांड घडले तेव्हा एवढी भयानक घटना घडल्यानंतर तथाकथित सेक्युलरवादी लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या? अयोध्येत शिलापूजन करून आल्यामुळे आणि ‘जय श्रीरामाच्या’ घोषणा दिल्यामुळे म्हणे एकदम २००० लोकांनी एकत्रितपणे रॉकेल आणि पेट्रोल घेऊन डबे जाळण्याचे कृत्य केले. त्या घटनेची भयानकता इतकी भीषण असूनही मुस्लिम झुंडशाहीचा अंतःकरणापासून निषेध करण्याचे धैर्य कोणी दाखविले नाही. कारण १४ कोटी लोकांचे गठ्ठा मतदान आपल्या हातून निसटेल म्हणून गोध्रा हत्याकांडात ज्या ५ तरुणींची अमानुष परवड झाली. त्यांच्या देहाचे तुकडे करून त्यांचे जे हिडीस प्रदर्शन करण्यात आले त्यातून जर कोणाचे रक्त खवळले नाही तर त्यांना माणूस तरी का म्हणावे हा प्र न निर्माण होतो. त्यांचे हत्याकांड तुमच्या घरात पोहोचले नाही तोवरच आदर्शात्मक नीतीचे पाठ देण्याचे बळ माणसाच्या तोंडात असते. आपल्यावर बितली म्हणजे सतत सहिष्णुपणे वागणाऱ्या हिंदूंच्या संयमाचाही अंत होतो. त्याची परिणती गुजरात कांडात होते. लेखक म्हणतो ही तर निर्दयतेची परिसीमा झाली. माणसांच्या समूहाने उत्स्फूर्तपणे केलेल्या कृतीला आवर घालणे अतिशय कठीण असते. १९८४ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर शिखांच्याही सर्रास कत्तली झाल्या त्या वेळची राजीव गांधींची प्रतिक्रिया होती की आधारवड पडल्यावर जमीन थोडी हादरणारच. महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रात आणि अन्य ठिकाणी विशिष्ट लोकांची घरेदारे जाळण्यात आली. हत्याही झाल्या. तीही उत्स्फूर्त प्रतिक्रियाच होती. एकनाथ महाराजांसारखा एखादाच संत असतो की एखाद्याने अंगावर धुंकल्यानंतर २५ वेळा गंगास्नान करून शांत राहतो. सामान्य माणूस मुस्लिमांचा आततायीपणा किती दिवस सहन करणार? आपल्या देशात राहावयाचे, सगळे स्वातंत्र्य उपभोगायचे, इस्टेटी बनवायच्या आणि निष्ठा मात्र पाकिस्तानला वहायची! आताच पोटो अंतर्गत अटक झालेल्या हुर्रियत नेता गिलानीची कथा काय सांगते? वि व हिंदू परिषदेसारखी एखादी कट्टर संघटना, आम्ही तुम्हाला खतम करून टाकू असे म्हणत नाही. फक्त तुम्ही आम्हाला नष्ट कराल तर तुमची खैर नाही असेच केवळ म्हणते. तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहा मग आम्हीही कायद्याची चौकट मोडणार नाही. गोध्यात काय, काश्मिरात काय किंवा बांगला देश/भारत यांच्या सीमेवर व अन्य ठिकाणीही मुस्लिमांनी सतत आगळीक करावयाची आणि आम्ही उदार मनाने त्यांना क्षमा करावयाची ही रीत कुठवर चालणार? तथाकथित सेक्युलरवाद्यांनी, आपल्या देशातील प्रमुख प्रसिद्धिमाध्यमांनी, विशेषतः इंग्रजी वृत्तपत्रांनी हिंदूंना नीतिमत्तेचे धडे गिरविणे प्रथम थांबविले पाहिजे. ‘आज तक’ या वृत्तवाहिनीवरून मोदींना हटवावे की न हटवावे या संबंधीची जनमत चाचणी घेण्यात आली त्याचवेळेस संसदेत सरकारविरोधात निंदाव्यंजक विधेयकावर चर्चा सुरू होती. मोदींना हटवावे या बाजूने ४३ टक्के तर हटवू नये या बाजूने ५७ टक्के मतदान झाले होते. इतर वेळेस हिरिरीने अशा चाचण्यांवर जोरदार चर्चा आयोजित केली जाते, या वेळेस मात्र चुप्पी साधण्यात आली. दिल्लीच्या एका संस्थेने ३१००० लोकांना प्र न विचारून अयोध्येत मंदिर बांधावे की काय करावे यासंबंधी मतप्रदर्शन करण्याची विनंती केली. ९५% लोकांनी मंदिर बांधावे म्हणून कौल दिला. ५% लोकांनी दवाखाना बांधावा म्हणून मत दिले. एका सेक्युलरवादी वृत्तपत्राने हेडिंग दिले, Build Hospital, Not Temple in, Ayodhya’ यांस काय म्हणावे?
Star News या वाहिनीवर बरखा दत्त •We, the people’ हा कार्यक्रम दर रविवारी आणि राजदीप सरदेसाई ‘The Big Fight’ हा कार्यक्रम दर शनिवारी राबवितात. त्यात पूर्वनियोजित त्यांच्या बाजूने बोलणाऱ्या वक्त्यांना प्राधान्य देण्यात येते. त्यांच्या एखाद्या संघपरिवारविरोधी वाक्यांला हमखास टाळ्या दिल्या जातात. नावाला एखादा परिवारातील वक्ता बोलविला जातो. त्याच्या कोणत्याही बोलण्याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले जाते. किंवा त्याचे म्हणणे मध्येच काटले जाते. श्री. पार्थसारथी या परिवारातर्फे बोलणाऱ्याने बरखा दत्तला बजावलेच की, मला बोलू द्यायचे नसेल तर तसे सांगा. मी गप्प बसेन पण माझे बोलणे तोडू नका. गुजरात दंग्यात १००० लोकांचे बळी गेले त्यात ५०० लोक हिंदू आहेत हे तुम्हाला माहीत आहे ? मुस्लिमांची जाळपोळ तुम्ही प्राधान्याने दाखवीत आहात तेव्हा गोध्यांतील हिंदूंचे परिवार आणि घरे तुम्ही दाखविलीत का? ५ मुस्लिम तरुणींच्या मृत देहांची गोध्यात जी विटंबना केली ती तुम्ही दाखविली का? बरखा दत्तजवळ उत्तर नव्हते.
साठेंनी जमातवाद हा शब्द संघ परिवाराला लावला आहे. साठेंनी कृपया एक तरी उदाहरण दाखवून द्यावे की जेथे या ‘जमातवादाने’ प्रथम स्वतः आक्रमण केले आणि विशिष्ट लोकांना अगदी निवडून मारले. अयोध्येत बाबरी ढांचा पाडला याचे कारण शतकांपासून चिघळत चाललेला वाद आणि विशेषतः गेल्या ५० वर्षांतील शासनाचा निर्णय देण्यातील वेळकाढूपणा याची तीव्र प्रतिक्रिया किमान १०,००० कारसेवकांच्या संयमाचा बांध फुटण्यात झाली.
या देशात राज्यघटनेत आतापर्यंत ८४/८५ वेळा दुरुस्त्या झाल्या. परंतु B.J.P. प्रणीत शासनाने जेव्हा घटनेत संशोधन करण्याची आवश्यकता घोषित केली तेव्हा मात्र एवढा गदारोळ झाला की जणु येथील राज्यघटना हे लोक मोडीत काढावयास निघाले आहेत! आपल्या देशाला खरा धोका मुस्लिम कट्टरवाद्यांकडून नाही, दहशतवाद्यांकडूनही नाही. खरा धोका आपल्याच देशातील बुद्धिभ्रष्ट झालेल्या लोकांचा आहे. या लोकांनी खरोखरीच आत्मपरीक्षण करून आपल्या (विवेकी)? बुद्धीची आणि (काविळी) दृष्टीची तपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे.
ज्या ज्ञानेश्वरांचा हवाला साजेंनी दिला आहे त्या ज्ञानेश्वरांनीच ज्ञानेश्वरीत पुढे असे म्हटले आहे (४ था अध्याय ५३ वी ओवी) ‘दैत्यांची कुळे नाशी। साधूंचा मान गिंवशी।’ थोडक्यात, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् हेच परमे वराच्या अवताराचे प्रयोजन आहे. परमेश्वराचा अवतार म्हणजे सात्त्विक शक्तीच्या प्रगटीकरणाचे प्रयोजन आहे. ज्याला साठे जमातवाद म्हणतात तो जमातवाद नसून परमेश्वरी शक्तीचा सामूहिक आविष्कार आहे.
२५७, शंकर नगर,
नागपूर