दुष्टचक्र

दुष्टचक्र बदलाची स्पष्टता नाही म्हणून उभारी नाही, उभारी नाही म्हणून शिस्त नाही, आणि शिस्त नाही म्हणून बदलाची शक्यता आणखी लांब गेली, असं दुष्टचक्र आहे, आणि ते सगळ्याच बाबतीत आहे. शिक्षणाच्या बाबतीत आहे, रोजगाराच्या बाबतीत आहे, वस्तीतल्या सुविधा मिळवण्याच्या बाबतीत आहे. राजकीय शिस्तीशिवाय उभारी फक्त नेत्यांनाच (स्थानिकही); बाकी जनता ‘गरीब बिचारी कुणी हाका’ अशीच.
दुसरं एक वाटतं. इतिहासाचं ओझं अजूनही वागवणाऱ्या या समाजाला ‘अमुक काम करायला घाण वाटते. त्यामुळे यातून बाहेर पडायला पाहिजे’ अशी ऊर्मी वाटत नाही. श्रमाचं महत्त्व मलाही पटतं, पण एकाच प्रकारचे श्रम एकाच समाजाला सतत करावे लागताना पाहिलं की हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. गावी करावी लागायची ती कामं आता शहरात येऊन करायची एवढाच तर फरक नाही पडला?
ह्या सगळ्याची छाया इथल्या रोजगाराच्या स्वरूपावर आहे असं वाटतं.
(सुजाता खांडेकर या झोपडपट्टीत साक्षरता मिहलांचे प्रश्न व संलग्न कार्य करणाऱ्या कार्यकर्तीच्या आशेविण आशा (ग्रंथाली, २०००) या पुस्तकातून.)
सुजाता खांडेकर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.