१. रेणू गावस्कर —- सुमारे पंधरा वर्षे डेव्हिड ससून इंडस्ट्रियल स्कूल या रिमांड होममध्ये कुठल्याही पदावर नसताना मुलांबद्दलच्या आत्मीयतेमुळे शिकवायला जात. वंचित मुलांसाठी सतत काम. इंग्रजी साहित्याचा आणि रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्याचा अनेक वर्षांचा अभ्यास.
२. जॉन होल्ट —- अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ. दुसऱ्या महायुद्धात सैन्यात भरती. नंतर शिक्षक म्हणून काम करताना मुलांच्या दृष्टीतून पाहून शिक्षणपद्धती असफल का ठरतात याचे वि लेषण. शेवटी शालेय शिक्षणपद्धतीत काहीच बदल घडत नाहीत म्हणून शाळाच बंद कराव्यात अशी मांडणी करू लागले होते. ‘How Children Learn’, ‘How Children Fail’, ‘Escape from Childhood’, ‘Learning all the Time’, ‘Instead of Education’, ‘Never too Late’, अशा अनेक पुस्तकांचे लेखन. त्यांतील
How Children Fail आणि How Children Learn ही विशेष गाजली.
३. अरविंद वैद्य —- गेली २५ वर्षे शिक्षणक्षेत्रात. मुंबईतील नंदादीप विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून २० वर्षे काम पाहिले. निवृत्तीनंतर शिक्षक-संघटनेच्या कामात, स्त्रीमुक्ती-आंदोलनात आणि शिक्षण व सामाजिक राजकीय संदर्भाच्या अभ्यासात मग्न.
४. चिं. मो. पंडित —- निवृत्त स्थापत्यशास्त्री (structural designer). कुटुंबव्यवस्था, शेती, पर्यावरण, अशा अनेक विषयांमध्ये रुची. आजचा सुधारकच्या वाचकांना आधीच सुपरिचित.
५. नीती बडवे —- पुणे विद्यापीठाच्या जर्मन भाषेच्या विभागात प्राध्यापक. भाषाशिक्षण हा विशेष रुचीचा प्रांत. अनेक परदेशी विद्यार्थ्यांना मराठी शिकवण्याचा अनुभव, त्यातूनही भाषा–शिक्षणाबद्दलची वेगळी समज.
६. डॉ. अनंत फडके —- जन-आरोग्य शिक्षण हा अभ्यासाचा, संशोधनाचा आणि कामाचा विषय. लोकविज्ञान संघटनेचे काम गेली अनेक वर्षे. सध्या सेहत या संस्थेत काम करतात.
७. कृष्णकुमार —- दिल्ली विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागात. शिक्षणाबद्दल सातत्याने अत्यंत परखड व मूलभूत विचार मांडणारे शिक्षणतज्ज्ञ. ‘राज समाज और शिक्षा’, ‘विचार की डर’, ‘चाईल्डस् लँग्वेज अॅण्ड टीचर’, अशा अनेक पुस्तकांचे लेखन.
८. शुभदा जोशी —- शिक्षणाने आर्किटेक्ट, अनेक वर्षांच्या व्यवसायानंतर आता गेली सात वर्षे पूर्णवेळ पालकनीती परिवाराच्या विविध उपक्रमांत मग्न. वस्तीत राहणाऱ्या मुलामुलींसाठी खेळघर, व आनंदसंकुल ही शिक्षण व आनंद यांची जोडी घालून देणारी कामे. पालकनीती मासिकाच्या संपादक-मंडळात.
९. नीलिमा सहस्रबुद्धे —- शिक्षणाने इंजिनियर. गेली सात वर्षे पूर्णवेळ पालकनीती परिवाराच्या विविध उपक्रमांची जबाबदारी घेत आहेत. ‘संदर्भ’ या शिक्षणविषयक द्वैमासिकाच्या प्रमुख संपादक.