मासिक संग्रह: जुलै, २००२

संपादकीय

समाजात सतत बदल होत असतात. आपल्यापैकी प्रत्येक जण आपापल्यापरीने असे बदल निरखत-नोंदत असतो, त्यांचे बरे वाईट असे मूल्यमापन करत असतो आणि हे सारे इतरांच्या निरीक्षण-मूल्यमापनाशी ताडून पाहत असतो. बहुतेक माणसांना ‘माझेच खरे’ असा गर्व नसतो. आपले विचार मांडणे, इतरांचे विचार समजून घेणे, नव्या भूमिका घडवणे, असे सारे व्यवहार आपण सतत करत असतो. ‘आता मी काय करू?’ ह्या प्र नाचे उत्तर आपण अशा विचारांच्या देवाणघेवाणीच्या पायावर उभे राहूनच देऊ शकतो. हे सारे करणाऱ्यांच्या विचारांत आणि कृतीमध्ये फार अंतर पडत नाही. पण ‘माझेच’ खरे ही वृत्ती बळावली तर त्यातून ‘अंतस्थ हेतू’, ‘हिडन अजेंडे’, असे सारे घडून कथणी आणि करणीतले अंतर वाढत जाते.

पुढे वाचा

लेखकांची ओळख

१. रेणू गावस्कर —- सुमारे पंधरा वर्षे डेव्हिड ससून इंडस्ट्रियल स्कूल या रिमांड होममध्ये कुठल्याही पदावर नसताना मुलांबद्दलच्या आत्मीयतेमुळे शिकवायला जात. वंचित मुलांसाठी सतत काम. इंग्रजी साहित्याचा आणि रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्याचा अनेक वर्षांचा अभ्यास.
२. जॉन होल्ट —- अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ. दुसऱ्या महायुद्धात सैन्यात भरती. नंतर शिक्षक म्हणून काम करताना मुलांच्या दृष्टीतून पाहून शिक्षणपद्धती असफल का ठरतात याचे वि लेषण. शेवटी शालेय शिक्षणपद्धतीत काहीच बदल घडत नाहीत म्हणून शाळाच बंद कराव्यात अशी मांडणी करू लागले होते. ‘How Children Learn’, ‘How Children Fail’, ‘Escape from Childhood’, ‘Learning all the Time’, ‘Instead of Education’, ‘Never too Late’, अशा अनेक पुस्तकांचे लेखन.

पुढे वाचा

सर्वांसाठी शिक्षण . . . ?

स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात ‘शिक्षण’ ही समाजातल्या वरच्या वर्गाची आणि पुरुषांची मक्तेदारी होती. ते तसे नसावे आणि समाजातल्या सामान्यातल्या सामान्य स्त्री-पुरुषांपर्यंत ते पोचावे, यासाठी गेल्या शतकात अनेक प्रयत्न झाले, चळवळी झाल्या. सर्वांनी शिकण्यामध्ये—-शहाणे होण्यामध्ये एकंदरीतच समाजाचीही उन्नती होणार आहे हा विचार हळूहळू पचनी पडला. त्याचे फलित म्हणूनच स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेने सर्वांपर्यंत शिक्षण पोचवणे ही
आपली जबाबदारी मानली.
एवढ्या मोठ्या खंडप्राय देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिक्षण पोचवणे ही गोष्ट विशेषतः आपल्यासारखा गरीब देशासाठी सोपी नि िचतच नाही. या अंकात निर्देश केलेले सगळे हेतू सर्व मुलांपर्यंत पोचावेत असे तत्त्वतः आपले ध्येय असणे ठीक आहे.

पुढे वाचा

प्रार्थना . . .

[या शब्दाला शाळेच्या संदर्भात एक खास वेगळा अर्थ आहे. शाळेचा दिवस सर्वांनी एकत्र जमून प्रार्थना म्हणून सुरू होतो. काही शाळांमध्ये रोज किंवा विशिष्ट दिवशी शाळासमाप्तीच्या वेळीही प्रार्थना म्हणण्याचा प्रघात आहे.
प्रार्थना या शब्दात ती कोणाला तरी केलेली विनंती असल्याचे जाणवते. पण प्रार्थना सर्वांनी म्हणताना मुलामुलींच्या मनात नेमके काय येत असेल? एका त-हेने प्रार्थना सर्वांनी म्हटलेले, वृंदगान किंवा समूहगान असते. संगीतात भावनांना उत्तेजित करण्याचे कौशल्य असते. एकत्रपणे संगीत गाता-ऐकताना त्याचा काही एक परिणाम मनांवर होणे साहजिक आहे. राष्ट्रगीताने किंवा स्फूर्तिगीतांनी देश-प्रेमाची भावना मनात भरून आल्याचा अनुभव अनेकांनी—-कदाचित सर्वांनी—-घेतला असेल.

पुढे वाचा

लैंगिकता शिक्षण कशासाठी? कुणासाठी?

‘आमच्या शाळेत लैंगिक शिक्षणाचा कार्यक्रम करायचाय. इ. ८ वी / ९ वी च्या मुलांसाठी/मुलींसाठी, तर तुम्ही याल का?’, असा प्र न प्रत्यक्ष किंवा फोनने, आणि सोबत एक त्याच मजकुराचे पत्र ही माझ्यासाठी वारंवार घडणारी गोष्ट. मी येईन’ असे म्हणते आणि विचारते, ‘हा कार्यक्रम का आयोजित करावा असे वाटते आहे?’ या प्र नाच्या उत्तरात, ‘आम्ही दरवर्षी करतो/आम्हाला तसा आदेशच असतो’, अशी उत्तरे तरी असतात किंवा मुला मुलींचा या वयात पाय घसरू नये, त्यांना आजारांचा, गर्भारपणाचा धोका समजावा असा समस्यानिवारणाचा हेतू असतो.
माझ्या प्र नाला अपवाद म्हणून सुद्धा आजवर एकानेही मुलामुलींना स्वतःच्या लैंगिकतेची जाणीव होताना न्यूनगंड येऊ नये, मोकळेपणाने प्र न विचारायला अवकाश मिळावा, असे उत्तर दिलेले नाही.

पुढे वाचा

आरोग्यशिक्षणाचा हेतू

“आरोग्यशिक्षणाचा माझा हेतू काय?”, असा माझ्या वैयक्तिक हेतूंबद्दल कोणी प्र न विचारला तर मी म्हणेन की “मला जे वैद्यकीय ज्ञान मिळाले आहे त्यातील किमान आवश्यक तो भाग तरी लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयाबद्दलचे गैरसमज दूर करण्यात मला आनंद वाटतो म्हणून मी हे काम करतो.” या वैयक्तिक आवडीच्या शिवाय तितकाच महत्त्वाचा हेतू म्हणजे आज सामान्यपणे जे आरोग्यशिक्षण दिले जाते ते बरेचसे असमाधानकारक आहे, त्यामुळे चांगले आरोग्यशिक्षण करणाऱ्या प्रवाहात भर घालावी या हेतूनेही मी आरोग्यशिक्षण देतो.
अगदी थोडक्यात सांगायचे तर आरोग्याबद्दल त्याच्या सामाजिक पैलूंकडे दुर्लक्ष करून फक्त जीवशास्त्रीय पैलूंवर लक्ष केंद्रित करणारे, अनावश्यक माहितीचा डोलारा मांडून तज्ज्ञांचा अकारण दबदबा निर्माण करणारे किंवा त्याहून वाईट म्हणजे “हा प्रकार फार गुंतागुंतीचा मामला आहे.

पुढे वाचा

विज्ञान-शिक्षणाचा हेतू

शिक्षणाबद्दल चर्चा ही बरीचशी ‘आंधळे आणि हत्ती’च्या गोष्टीसारखी होत असते. शिक्षणतज्ञ, शिक्षक, विद्यार्थी, पालक, समाज इ. प्रत्येक घटकाचा शिक्षणाकडे पाहण्याचा एक स्वतंत्र दृष्टिकोन आहे. शिक्षणाविषयीच्या चर्चेत सहभागी होणाऱ्या व्यक्ती आपापल्या दृष्टिकोनातून विषयाची मांडणी करत राहतात. एकमेकांशी संवाद साधण्याचा फारसा प्रयत्न होताना दिसत नाही. विज्ञान-शिक्षणाबाबत तर ही गोष्ट जास्तच प्रकर्षाने जाणवते. या संवादाच्या अभावामुळेच विज्ञान-शिक्षणाचा हेतू काय, या वरकरणी सरळ वाटणाऱ्या प्र नाचे उत्तर मात्र गुंतागुंतीचे होते.
भावी पिढीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, जिज्ञासू वृत्ती जोपासणे, या . . . उद्देशाने विज्ञान-शिक्षणाची आखणी व्हावी, अशी शिक्षणतज्ज्ञांची व समाजातील जबाबदार घटकांची अपेक्षा आहे.

पुढे वाचा

भाषा शिक्षण कशासाठी?

भाषेची गोष्ट ‘अति परिचयात् . . .’ अशी आहे. एक तरी भाषा प्रत्येकाला अवगत असते. म्हणून तिच्याबद्दल कोणी स्वतंत्रपणे विचारच करत नाही. भाषा ही गोष्ट आपल्या अवयवांसारखी आपण गृहीत धरतो. आपल्याला हात असतात, पाय असतात, तशी आपली एक भाषा असते. भाषाक्षमता उपजत असते, पण भाषा उपजत नसते. पहिली भाषा माणूस सहज शिकतो, इतकी सहज, की आपण ती प्रयत्नपूर्वक शिकलो आहोत, हेच त्याला जाणवत नाही. भाषा, विशेषतः स्वभाषा किंवा मातृभाषा आपल्याला ‘आपोआप’ येते, अशी एक समजूत असल्यामुळे पुढे ‘मातृभाषा कशाला शिकायची?’ ‘मातृभाषेचे कोश कशाला पाहिजेत?’

पुढे वाचा

शिक्षण? कोण कोणाला हा प्रश्न विचारतोय?

१. नुकत्याच आमच्या घरकामाच्या बाई काम सोडून गेल्या. त्या नववी पास झालेल्या होत्या. त्यांच्या जागी ज्या बाई आल्या त्या अक्षरशत्रू. त्यामुळे बरीच गैरसोय झाली आहे. पूर्वी बाई कामावर आल्या तरी मी घरी असणे आवश्यक नसे. कागदावर सूचना लिहून ठेवल्या की भागत असे.
माझ्याकडे कार्यालयात साफसफाई, झाडलोट करण्यासाठी एक शिपाई होता. पाच वर्षांनीपण कामाचे स्वरूप तेच राहणार. मग त्याच कामासाठी पगारवाढीच्या स्वरूपात मी दरवर्षी जास्त पैसे का द्यायचे? पण मी त्या शिपायाची उपयुक्तता वाढवली. त्याला मुंबईतले सर्व पत्ते शोधायला शिकवले. अगदी कागदावर नकाशा काढून देऊन.

पुढे वाचा

शिक्षणाचे बदलते हेतू : भारतातील दोनशे वर्षांचा इतिहास

कोणतीही समाजव्यवस्था ज्या अनेक खांबांवर उभी असते त्यांतील शिक्षण हा एक महत्त्वाचा खांब आहे. ‘शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे साधन आहे.’ हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो व उच्चारतो; पण हे अर्धसत्य आहे. शिक्षण हे जसे परिवर्तनाचे साधन आहे तसे ते परिवर्तन होऊ न देण्याचे, म्हणजेच आहे तीच व्यवस्था अधिक भक्कम करण्याचेही साधन आहे. उदाहरणार्थ भारतात ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य ह्या वरच्या तीन वर्णांव्यतिरिक्त अन्य समाजाला म्हणजे शूद्रातिशूद्रांना व सर्वच वर्णातील स्त्रियांना जे शिक्षण नाकारले गेले ते जातीच्या आधाराने उभारलेली पुरुषप्रधान रचना मजबूत करण्यासाठी. शूद्र जातीतील मुलांनाही आपल्या जातीचा धंदा चालविण्यासाठी आवश्यक ते शिक्षण आपल्या बापाकडून शिकण्याची केवळ मुभाच नव्हे तर सक्ती होती.

पुढे वाचा