निखिल जोशी, ‘तत्त्वबोध’, हायवे, चेकनाक्याजवळ, नेरळ (रायगड) — ४१० १०१ (अ) एप्रिल २००२ च्या अंकात मेहेंदळे यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यातील पुढील विधाने मला खटकली.
१. ‘देव ही एक मनोवैज्ञानिक गरज आहे’. २. ‘शाप, कुंडलिनी, रेकी . . . तत्सम शक्तींचा अभ्यास होत आहे.’ ३. ‘डत्दृदत्द्म . . . ध्वनिमुद्रिका . . . विश्वास वाटतो.’ ४. . . . ऐतिहासिक उत्तुंग व्यक्तिमत्त्वे म्हणजे राम, . . . अनुकरण
अपेक्षित आहे.’ त्या विधानांमध्ये मला पुढील चुका सापडल्या.
१. “placebo’ ह्या ‘औषधा’चा एक दुर्लक्षित गुणधर्म म्हणजे ‘वापरकर्त्याला औषध मनोवैज्ञानिक मार्गाने गुण देणारे आहे ह्या सत्याची जाणीव कस्न दिल्यावर औषधाचा परिणाम बंद होतो.’ “ ‘देव’ ‘द्रठड़ड्डडदृ’ चे काम करतो” असे मान्य करणाऱ्याला त्यापासून मानसिक पाठबळ मिळूच शकत नाही.
२. हे विधान मेहेंदळे कशाच्या आधारावर करतात? () ककक्र. वरील कोणत्याही पुस्तकात अशी नोंद नाही. (त्त) मेहेंदळेकडे प्रयोगशाळा आहे का? (त्त्त) मुळात या साऱ्या दाव्यांचे अस्तित्वच सिद्ध झालेले नाही तिथे त्यांची कारणमीमांसा कशी करता येईल?
३. ह्या शास्त्रशाखेस U.G.C. ने तरी मान्यता दिली आहे का? ‘वरदान देता येते’ हे सिद्ध केल्यावरच त्याचे ऊर्जाप्रसारण अभ्यासता येईल.
४. () राम-कृष्ण आदर्श नव्हते. पहाः “Riddles in Hinduism’ (त्त) ते ऐतिहासिक नव्हते. (त्त्त) “त्याची ‘अमुक-अमुक’ कृती मला अनुकरणीय वाटते तरीही त्याच्या यापुढील सर्व कृती मला आदर्श असतीलच असे नाही’ असे म्हणावे लागते. देवाला समर्पण लागते. (श्याम कुलकर्णीनी ‘आगरकरांना समर्पण करा’ असे सांगणे चूक
आहे. शिवाय तेव्हा माहितीचा स्फोट न झाल्याने त्यांची माहिती तारतम्याने घेतली पाहिजे.)
त्या लेखापुढे आपली टिप्पणी अपेक्षित होती. ती नसल्यामुळे हे लिहीत आहे.
(ब) १. श्री. अतुल सोनक यांची मुक्तछंद कविता प्रसिद्ध झाली आहे. तिच्यातील आशयावर मी टिप्पणी करू इच्छितो. (१) ‘पूर्वसंचिताच्या आधारे या जन्मीच्या निष्पाप लोकांचा देव छळ करतो’. या समजुतीवर (अतार्किक असली तरी) आस्तिकांचा विश्वास असल्यामुळे, देवाने केलेल्या सकृतदर्शनी (‘त्यांच्या दृष्टीने) अन्यायाची कारणमीमांसा केल्याचे समाधान मानणाऱ्या आस्तिकांवर या कवितेचा परिणाम होणार नाही. (त्त) Entropy च्या नियमामुळे Ordered System मधूनच ऊर्जा मिळत असल्यामुळे ‘जीवो जीवस्य जीवनम् ।’ या ऊक्तीचे समर्थन करावेच लागते. मुबलकतेच्या काळात अतिहीन स्वरावरील (आपल्याशी किमान साधर्म्य असलेल्या) सजीवाचे, (शक्य झाले तर केवळ द्रण्द्यदृद चे) शोषण करण्याचा आग्रह धरता येईल. आज मात्र भाजीपाल्यावरच जगता येईल अशी परिस्थिती नाही. (माकडीण आणि तिचे पिल्लू यांची गोष्ट प्रसिद्धच आहे.) म्हणूनच अन्नासाठी पशुहत्त्या करणे अयोग्य (पाप?) मानता येणार नाही आणि ‘हे पाप चालू आहे म्हणजे देव नाही’ हा युक्तिवाद समर्थनीय नाही.
२. श्री. अभय वैद्य यांनी ‘पत्नीचे नाव, आडनाव बदलू नये’ असे मत मांडले आहे. पुरुष जोडीदाराच्या घरी राहणे आणि पुरुष जोडीदाराच्या घरात कमाई देणे, या दोन कृतीद्वारे स्त्री भौतिक आणि आर्थिक दृष्ट्या पुरुष जोडीदाराच्या गटाचा भाग बनत असताना केवळ आडनाव बदलणे/न बदलणे गौण आहे. स्त्रीचे नावही (बहुतेकदा) तिच्या वडिलांनी ठरविलेले असते. एका पुरुषाने दिलेले नाव दुसऱ्याने बदलले नाही म्हणजे स्त्री स्वतंत्र होते, असे नाही. (घरजावई किंवा पत्नीपेक्षा कमी कमविणारे पुरुष हल्ली Dominant राहत नाहीत.) ही पुरुषप्रधान समाजव्यवस्थेची प्रतीके अशा दिखाऊ/भ्रामक प्रतीकांनी लपवून स्त्रीला स्वातंत्र्य मिळणार नाही. (घटस्फोटितेने पतीकडून पोटगी मागणे पुरोगामित्वाचे लक्षण आहे.)
दत्तप्रसाद दाभोळकर, ‘या’ हॉटेल, ग्रीन फील्ड लेन, सातारा — ४१५ ००१
सुधारकी विचार आणि त्यांच्या आधारे सुधारकी आचार पुढे न्यावयाचा असेल तर विचारांचे आदानप्रदान गरजेचे आहे. आपल्याला न पटणारे वा न आवडणारे विचार, विचाराला घेऊन त्यांना तर्कसंगत उत्तर देणे गरजेचे आहे. त्या ऐवजी एका बंदिस्त कोशात, आत्ममग्न अवस्थेला समाधी लावून बसणे किंवा तुम्ही माझी पाठ खाजवा मी तुमची पाठ खाजवतो असा काही प्रकार आजचा सुधारक करतो आहे काय? ।
१. फेब्रुवारी २००२ च्या आजच्या सुधारकच्या अंकात जयंत नारळीकर यांचा फलज्योतिषाच्या महाविद्यालयीन अभ्यासाला विरोध करणारा विस्तृत लेख प्रसिद्ध झाला.
२. मी स्वतः वैज्ञानिक आहे. माझा स्वतःचा फलज्योतिषावर विश्वास नाही. पण त्याचा महाविद्यालयीन अभ्यास होणे चुकीचे नाही तर गरजेचे आहे असे मला वाटते. असे वाटणारा एक मोठा वर्ग या देशात आहे असेही मला वाटते.
३. माझा या विचारावरचा लेख मी आजचा सुधारक कडे पाठवला. त्यांनी तो छापण्याची असमर्थता व्यक्त करून तो परत पाठवला. संपादकांचा निर्णय, जो अनेक गोष्टींवर अवलंबूत असतो, तो आपण सर्वांनी सहजपणे स्वीकारला पाहिजे हे मला अर्थातच मान्य आहे.
४. पण या विचारांची चर्चा आजचा सुधारकच्या व्यासपीठावर होणे मला गरजेचे वाटत होते. केवळ एकच बाजू घेऊन विचार थांबवणे हा भयप्रद प्रकार आहे. त्यापुढे मी संपादकांना कळवले की, लेखकाने स्वतः पुरस्कृत केलेला लेख म्हणून हा लेख आपण आजचा सुधारकमध्ये छापा. त्यासाठी येणारा सर्व खर्च मी देण्यास तयार आहे.
५. संपादकांनी यालाही नकार देणारे पत्र पाठवले. वर कळवले, आम्ही जाहीराती पण छापत नाही तर हे कसे काय शक्य आहे?—-विचारांची जाहिराती बरोबर तुलना करणारा हा प्रकार विलक्षण आहे!
त्याऐवजी संपादक मला कळवू शकले असते की, तुमचा लेख जेवढ्या पानांचा आहे. तेवढ्याच पानांचे त्याला उत्तर देणारा लेख छापून आम्ही ही चर्चा थांबवू व त्याचाही खर्च तुम्हाला द्यावा लागेल. अजूनही संपादकांनी अशी काही योजना माझ्यासाठी व इतरांसाठी सुचवली तर मी तिचे स्वागत करीन.
६. माझ्या व्यासपीठावर इतर विचारांची मुस्कटदाबी होईल. माझ्या धर्माच्याविरुद्ध जे बोलतात त्यांचे विचार माझ्या धर्मातील लोकांनी समजावून घेणेही पाप आहे अशी काही आत्यंतिक भूमिका आपण घेत आहोत का? म्हातारीने कोंबडे झाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे काही आपणाला वाटत आहे का?
विचार दाबून ठेवून नव्हे तर विचारांचे आदानप्रदान करून विचारांचा मुकाबला करावयाचा असतो. आज आपण नेमके हे करावयास तयार नाही. आपण घाबरतो आहे किंवा आपल्याच गुर्मीत आहोत–आणि नकळत डावी, पुरोगामी, सुधारकी विचारधारा समाजापासून अलग पडते आहे. . . .
[(१) दाभोळकरांची पाचव्या परिच्छेदातील सूचनादेखील मी मान्य करू शकत नाही
(२) मुळात नारळीकरांचा ‘विस्तृत’ लेख हा मराठी विज्ञान परिषदेच्या पत्रिकेतील आणखी विस्तृत आणि दाभोळकरांच्या (आणि इतर) मुद्द्यांच्या उत्तरादाखल लिहिलेल्या लेखाचा भाग होता. मी दाभोळकरांचा लेख नाकारतानाच त्यांनी मराठी विज्ञान परिषदेशी संपर्क साधावा असे सुचवले होते. ते त्यांना पटलेले दिसत नाही. असो!
—– संपादक
भ. पां. पाटणकर, ३-४-२०८, काचीगुडा, हैदराबाद — ५०० ०२७
आ. सु. च्या मे २००२ च्या अंकातील खडपेकरांचे पत्र वाचले. आ. सु. च्या संपादकांनी त्याला एक दीर्घ उत्तर दिलेच आहे. मीही माझ्या पद्धतीने उत्तर देतो.
१. प्रत्येक समाज कुठल्यातरी वादाने बांधला जाणे अपरिहार्य आहे ही खडपेकरांची धारणा चुकीची आहे. कारण कुठलाही वाद एक simplified मांडणी असते आणि समाजजीवन गुंतागुंतीचे असते. समाज चालतो तो त्याच्या अनेक घटकांच्या तडजोडीच्या व्यवहाराने.
२. ‘हिंदुत्ववाद’ ही सुद्धा एक अति-simplified कल्पना आहे. तुमचे-आमचे वाडवडील दोनशे वर्षांपूर्वी प्रत्यक्षात जी संस्कृती आचरत होते तिची तरफदारी आजचे हिंदुत्ववादीही करत नाहीत. मुसलमानी व इंग्रजी अमलाच्या काळात हिंदूंनी त्यांच्याकडून इतक्या गोष्टी उचलल्या आहेत की आपली संस्कृती निखालस-हिंदू अशी राहिलेली नाही. हिंदुस्थानी संगीतात मुसलमानांनी बदल आणले आणि पा चात्त्य संगीतानेही आणले. आपल्या कथा कादंबऱ्यांची घडण फ्रेंच-इंग्रजी वाङ्मयावर बेतलेली आहे. आपला पेहराव बदलला आहे. इंग्रजी भाषा आपल्या राष्ट्रीय जीवनाचा आधार झाली आहे.
३. सध्याची भारतीय एकात्मतेची भावनाच मुळी गेल्या काही शतकांत झालेल्या दोन घटितांवर आधारलेली आहे (१) सबंध भारत ब्रिटिश अमलाखाली एकत्र बांधला जाणे आणि (२) त्या अमलापासून मुक्त होऊन आधुनिक मूल्यांवर आधारलेला समाज निर्माण करण्याकरता झालेली देशव्यापी चळवळ —ती एकेका प्रांतापुरती होणे शक्यच नव्हते.
४. हिंदुत्ववाद्यांना या दोन्ही बदलांचे भान नाही. ते बदल घडवण्याकरता ज्यांनी परिश्रम केले त्यांनाही हिंदुत्ववाद्यांच्या लेखी काही मूल्य नाही. राष्ट्रीय स्वयंसेवकाला फक्त दोनच ‘परमपूज्य’ व्यक्ती माहीत. डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर. त्यापैकी गोळवलकरांशी उघडपणे नाते सांगण्याचे धाडस वाजपेयी आणि अडवाणी यांच्यासारखे ज्येष्ठ स्वयंसेवक आज करत नाहीत.
५. मग हिंदुत्व म्हणजे काय शिल्लक राहते ते कळत नाही. हिंदू ऐक्य म्हणजे अहिंदूंविरुद्धची आघाडी एवढाच अर्थ वारंवार व्यक्त होताना दिसतो. हिंदू समाजाला उत्कर्षाप्रत नेणारे तत्त्वज्ञान त्यात दिसत नाही. साहजिकच अधिकारपदी आलेल्या हिंदुत्व-वाद्यांना इतरांनी विचारपूर्वक आधारलेली धोरणे राबवावी लागतात. अशा या गैर-हिंदुत्ववादी धोरणांतूनच हिंदू समाजाची प्रगती होणार आहे. त्यांनाच जनतेचा पाठिंबाही मिळणार आहे.
ललिता गंडभीर, 65, Oxford Road, Newton, MA 02459, U.S.A. मातृत्वाच्या निमित्ताने, दोन प्र न :
आशा ब्रह्म यांचा लेख (जाने. २००२ वाचून मला पुढील प्र न विचारायचे आहेत.
१. पुरुषांचे गट शिकारीला निघत तेव्हा त्यांच्या मागे राहिलेल्या स्त्रिया इतर कोणत्याही पुरुषाच्या आकर्षणाला बळी पडू शकत आणि यावर उपाय म्हणजे जबरदस्त युगुल बंधनांची घडण होणे, असे आशा ब्रह्म लिहितात.
या विधानाला पुरावा आहे का? आदिकालीन व टोळीसमाजात मुक्त लैंगिकता प्रचलित होती. लैंगिक संबंधांमुळे मुले होतात हेही ज्ञान समाजाला नव्हते. स्त्रिया पुरुषाच्या आकर्षणाला बळी पडू शकत, ह्या विधानामागे स्त्रीचे लैंगिक पावित्र्य व विशिष्ट संस्कृती अभिप्रेत आहे. ह्या कल्पना तरी त्या समाजात होत्या का? तसेच विवाहाची कल्पना मनुष्य स्थायिक झाल्यावर, जमीन त्यांच्या मालकीची झाल्यावर मुलांच्या आनुवशिक हक्कासाठी निर्माण झाली असे मी वाचले. मुले वडिलांपासून झालेली नसली तरी चालत होते. (उदा. पांडव). स्त्रीपुरुषाच्या आकर्षणाला बळी पडते म्हणून विवाहबंधने निर्माण झाली याला पुरावा काय?
२. उत्क्रांती मानसशास्त्रज्ञ काय सांगतात ह्याविषयी आशा ब्रह्म लिहितात, स्त्रियांमध्ये स्पर्धावृत्ती आणि महत्त्वाकांक्षा पुरुषांपेक्षा सौम्य असतात. इ. इ., परिणामी हे (स्त्रीमधील) बालसंगोपनाला पोषक असे सर्वस्वी जेनेटिक गुण आहेत. स्त्रिया व पुरुष यांच्यामध्ये हे मूलभूत फरक आहेत. आशा ब्रह्म यांनी Environment & Conditioning ह्यांचा विचार केला आहे का?
केवळ स्त्री म्हणून मुलांचे संगोपन करावे लागते आहे, म्हणून वैतागलेल्या माता व अत्यंत प्रेमाने मुलांना संभाळणारे वडील व पुरुष मी पाहिले आहेत. माझ्या मते मुलांचे संगोपन करणाऱ्यांची एक वेगळीच जात असते. त्याचा लिंगाशी संबंध नाही
आशा ब्रह्म यांच्या अभ्यासात मुलांच्या संगोपनास स्त्रियाच योग्य, ह्यापेक्षा वेगळी विचारसरणी आली आहे का? त्यांनी (किंवा इतर कोणी) ह्या मुद्द्यांवर जरूर विस्ताराने लिहावे ही माझी विनंती.
३. आईचे अपत्यप्रेम आनुवंशिकतेने येत नाही. त्यासाठी कठोर प्रयत्नांची गरज असते, असे इयान ब्रॉकिंग्टन हा मानसशास्त्रज्ञ म्हणाला, असे आशा ब्रह्म लिहितात. हा मुद्दा व (स्त्रीमध्ये) बालसंगोपनाला पोषक असे सर्वस्वी जेनेटिक गुण आहेत, हा लेखातला सातव्या परिच्छेदातला मुद्दा परस्परविरोधी आहेत असे मला वाटते. ह्या परस्परविरोधाचा खुलासा करावा ही विनंती.
आशा ब्रह्म यांच्या ह्या लेखातील इतर मुद्द्यांशी मी सहमत आहे.
धनंजय बोकारे, २०१ श्री स्वामी आर्केड, वेस्ट हायकोर्ट रोड, धरमपेठ, नागपूर-४४० ०१०
मे २००२ च्या अंकातील श्री सुभाष आठले यांचा वैद्यकीयव्यवसाय हा लेख वाचला. प्रस्तुत व मागील अंकातील लेखात श्री आठले यांनी वैद्यकीय व्यवसायाचे चांगले विश्लेषण केले आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. परंतु काही मुद्दे खटकतात त्याबद्दल या पत्राचे प्रयोजन.
१. मानवी शरीर हे स्वतःची दुरुस्ती स्वतःच करणारे यंत्र आहे असे श्री आठले म्हणतात. हे बरेच वेळा खरे असले तरी विशेषतः शस्त्रक्रियेची जरूर असणाऱ्या आजारांबद्दल असे सहसा म्हणता येणार नाही. अशा आजारांमध्ये शल्यविशारदाच्या ज्ञानाची व कलाकौशल्याची परीक्षा असते. त्यामुळे कोणीही शस्त्रक्रिया करावी व रुग्ण बरा व्हावा अशी परिस्थिती नसते. या ‘कलेत’ नैपुण्य असण्याची नितांत जरूरी असते त्यामुळे कोणीही ‘मूर्ख’ उपचारक या शाखेत तरी व्यवसायिक यश मिळवू शकत नाही.
२. श्री. आठले यांचे असे म्हणणे आहे की वैद्यकीय व्यवसायात जास्त मेहनत करणाऱ्याला कमी मेहनताना मिळतो. सामान्य उपचारक हा अतिशय मेहनत करतो, त्यास सदैव सतर्क राहावे लागते. त्यास आपले ज्ञान काळाबरोबर व वैद्यकीय प्रगतीबरोबर सतत वृद्धिंगत करावे लागते. या सर्व आदर्श गोष्टी असल्या तरी कितपत वास्तववादी आहेत? आज किती सामान्य उपचारक आपणास हे कष्ट करताना/मेहनत घेताना दिसतात?
या उलट विशेषज्ञांचे काम सोपे असते, त्यांना कमी श्रम करावे लागतात व त्याचा त्यांना जास्त मोबदला मिळतो व कमी बुद्धिमत्तेत त्यांवर आपल्या क्षेत्रात पुढे राहणे शक्य असते असे म्हणणे म्हणजे विशेषज्ञांवर अन्याय आहे असे स्वतः एक अति विशेषज्ञ (super specialist) असल्यामुळे मला जास्त प्रकर्षाने वाटते.
एक सामान्य उपचारक बनण्यासाठी साडेचार वर्षे वैद्यकीय शिक्षण व एक वर्ष इंटर्नशिप कालावधी लागतो या उलट एक विशेषज्ञ बनण्याकरिता साडेपाच वर्षे अधिक दोन वर्षे ग्रामीण सेवा व तीन वर्षे निवासी डॉक्टर, असा प्रदीर्घ कालावधी लागतो. अतिविशेषज्ञ (super specialist) जर व्हायचे असेल तर आणखी तीन वर्षे—-म्हणजे एका तपाहून जास्त अशी ही तप चर्याच आहे. तसेच प्रत्येक अभ्यासक्रमाच्या सुरुवातीला प्रवेश मिळण्यासाठी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते.
एवढा प्रदीर्घ कालावधी पूर्ण होईस्तोवर उपचारकाचे वय तसेच कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात. व्यवसाय सुरू करताना लागणारे प्रचंड भांडवल, कर्जाचे हप्ते, व्यवसायातील वाढलेली स्पर्धा व लागू झालेला ‘ग्राहक संरक्षण कायदा’ —- जो उपचारकाला गुन्हेगार ठरवताना बरेच वेळा सारासार विचार करत नाही—-या सर्वांची टांगती तलवार डोक्यावर घेऊन हा विशेषज्ञ जेव्हा आपला व्यवसाय सुरू करतो तेव्हा त्याला जर सामान्य उपचारकापेक्षा जास्त मोबदला मिळाला तर त्यात कोणालाही गैर वाटू नये. आज वर्षभर सतत काहीना काही वैद्यकीय परिषदा जगभर सुरू असतात. यातील किती परिषदा सामान्य उपचारकांच्या असतात व किती विशेषज्ञांच्या हा विचार आपण केला तर सहज लक्षात येईल की आपले ज्ञान वाढावे, वैद्यकीय प्रगतीबद्दल आपल्याला माहिती असावी यासाठी कोण जास्त प्रयत्न करतो—-सामान्य उपचारक की विशेषज्ञ?
३. उपचारकाला कमी किंमतीची औषधे निवडण्यात रस नसतो असे बेजबाबदार वाटणारे विधान श्री. आठले करतात. वैद्यकीय व्यवसायाची अधोगती झाली आहे हे मान्य करूनसुद्धा येथे नमूद करावेसे वाटते की आजही आपल्या व्यवसायाची नीतिमूल्ये पाळणारे बरेच उपचारक आहेत. प्रत्येक सदसद्विवेक बुद्धी असणाऱ्या उपचारकाचा हा सदैव प्रयत्न असतो की आपला रुग्ण कमी खर्चाच्या परंतु परिणामकारक औषधांनी लवकरात लवकर बरा व्हावा.
औषध निर्मात्या कंपन्यांचे प्रतिनिधी (Medical representatives) जेव्हा उपचारकांना आपल्या औषधांची माहिती देतात तेव्हा त्यांचा जास्त भर औषधांच्या किंमती दुसऱ्या औषधांपेक्षा कमी असण्यावर असतो, ही वस्तुस्थिती माझ्या म्हणण्याला दुजोरा देते. ४. आरोग्यविम्याला ज्याप्रमाणे चांगली बाजू आहे त्याप्रमाणे वाईट बाजू पण आहे. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे उत्तर अमेरिका. तेथे संपूर्ण वैद्यकीय व्यवस्था आज विमाकंपन्यांच्या हातात आहे. तेथील स्वास्थ्य धोरण आज विमाकंपन्या ठरवीत आहेत. कोणत्या उपचारकाला आपल्या ‘पॅनेलवर’ ठेवावे, कोणाला ठेवू नये हे पण त्यांच्या हातात असते, त्यामुळे बरेच वेळा या उपचारकांचे सल्ले हे रुग्णापेक्षा विमाकंपनीच्या जास्त हिताचे असतात व त्यामुळे बरेचदा रुग्णाला आवश्यक ते उपचार मिळू शकत नाहीत.
तसेच या विमाकंपन्यांचे मान्य (Approved) उपचारक म्हणून मान्यता मिळावी म्हणून जो भ्रष्टाचाराला थारा मिळतो ते वेगळेच.
शेवटी एवढीच इच्छा व्यक्त करतो की आरोग्यविमा असावा परंतु त्यावर विमाकंपनीपेक्षा जागरूक आणि रुग्णाचे हित जोपासणाऱ्या उपचारकांचा ताबा असावा.
आजच्या घटकेला तरी ही इच्छा पूर्ण होताना दिसत नाही.