१० वैशिष्ट्ये —- इतर व्यवसायांपेक्षा वैद्यकीय व्यवसाय वेगळा आहे.
(१) मानवी शरीर हे बऱ्याच वेळा स्वतःची दुरुस्ती स्वतःच करणारे यंत्र आहे. सर्दी-पडसे-फ्ल्यू पासून क्षयरोग, विषमज्वर, हिवताप अशा रोगांपर्यंत बऱ्याच रोगांपासून शरीर आपले आपणच बरे होत असते—-बहुतेक वेळा. सण अज्ञानामुळे नक्की आपोआप बऱ्या होणाऱ्या रोगांसाठी देखील उपचारकाकडे जात असतो. त्यामुळे काहीही उपचार केले तरी सण बराच होतो—-इतकेच नाही तर उपचारकांनी चुकीचे उपचार केले तरी बहुतेक वेळा शरीर त्यावरही मात करून बरेच होते. त्यामुळे उपचारकाच्या ज्ञानाचा, कौशल्याचा व प्रामाणिकपणाचा कस लागतच नाही. त्यामुळेच शास्त्रीय व अशास्त्रीय (आयुर्वेद, होमिओपथी, नेचरोपथी, इलेक्ट्रोपथी, युनानी, बाराक्षार, सिद्ध, धनगरी, रेकी, ॲक्युपंक्चर वगैरे) उपचारांत, बुद्धिमान व मूर्ख, सर्वच प्रकारचे उपचारक व्यावसायिक यश मिळवतात.
इतर प्रकारची यंत्रे आपोआप दुरुस्त होत नाहीत. त्यामुळे यंत्र दुरुस्ती करणाऱ्याला यंत्राचे ज्ञान असावेच लागते. त्यामुळे त्यांत आयुर्वेदिक/होमिओपॅथिक यंत्रविज्ञान असू शकत नाही.
(२) मनाचा शरीरावर मोठा परिणाम होतो. मानसिक कारणांनी शारीरिक लक्षणे उद्भवतात व विविध इंद्रियांच्या कार्यात मानसिक कारणांनी बिघाड होऊ शकतो. त्यामुळे उपचारकाचे स्प, व्यक्तिमत्त्व, बोलण्यातील गोडवा, यामुळेही सणाला बरे वाटू शकते. तसेच औषध घेणे, उपचार करून घेणे, स्पर्श या केवळ क्रियांनीही बरे वाटू शकते—-मग गोळीत फक्त साखर किंवा पीठ भरलेले असले, तरीही बरे वाटते. यालाच “प्लॅसिबो” परिणाम म्हणतात. शरीराची आपोआप बरे होण्याची प्रवृत्ती व मानसिक परिणाम व प्लॅसिबो परिणाम या तीन घटकांमुळे “उपचारानंतर बरे वाटले” या घटनेचा अर्थ “उपचारांचा स्वयंसिद्ध परिणाम होऊन बरे वाटले”; “उपचारांचा काही परिणाम झाला नाही पण शरीर (व मन) आपल्या ताकदीने बरे झाले”; “उपचाराच्या प्लॅसिबो परिणामाने बरे वाटले”; “उपचारकाच्या व्यक्तिमत्त्वाच्या व वागणुकीच्या मानसिक परिणामाने बरे वाटले” या चार पैकी कोणताही एक किंवा थोड्या प्रमाणात त्यांपैकी अनेक, असा निघू शकतो. अर्थात् या घोटाळ्यामुळे उपचाराचा खरेच स्वयंसिद्ध परिणाम होतो का हे समजणे अवघड होते. या परिस्थितीत सर्वसामान्य शिक्षित, बुद्धिमान व्यक्तीलादेखील उपचार व उपचारक—यांचे मूल्यमापन करणे अशक्य होऊन बसते. उपचारांचे मूल्यमापन करण्यासाठी “डबल ब्लाइंड कंट्रोल ट्रायल्स व त्यांचे संख्याशास्त्रीय विश्लेषण’ ही स्वतंत्र उपशाखाच शास्त्रीय उपचारशास्त्रात तयार झाली आहे. ही उपशाखा कोणत्याही उपचारपद्धतीला वापरता येते—-पण अशास्त्रीय उपचार–पद्धतींमध्ये ती वापरली जात नाही. किंबहुना ज्या उपचारपद्धतीत (१) उपचारांमुळे आजार खरेच बरा होतो का (२) उपचारांमुळे गर्भ, लहानमुले, वृद्ध, इतर रोग असलेल्या व्यक्ती, इतर औषधे घेणाऱ्या व्यक्ती यांवर काय वाईट परिणाम होतो याचा अभ्यास केला जातो, त्याच उपचार पद्धतीला शास्त्रीय उपचार पद्धती म्हटले जाते.
(३) उपचारकांचे मूल्यमापन जास्त अवघड आहे, पण अशक्य नाही. ठरावीक कालावधीनंतर उपचारकांची पुनः पुनः, परीक्षा घेऊन त्यांच्या ज्ञानाची परीक्षा घेता येते, पण कामगिरीची नाही. उपचारकांच्या खर्च-परिणाम गुणोत्तराचे (Cost-Effectiveness) मोजमाप करण्यासाठी प्रत्येक उपचारकाने केलेल्या उपचाराची लिखित नोंद (Record) तयार करणे आरोग्यविमा कंपन्यांना शक्य असते, व उपचारांवरील खर्च मर्यादित ठेवण्यासाठी उपचारकांची खर्च-परिणामकारकता मोजण्यात त्यांना रसही असतो. त्यामुळे उत्तर अमेरिकेत, जेथे आरोग्य विमा कंपन्या उपचारांचा खर्च मोठ्या प्रमाणात उचलतात—-तेथे उपचारकांचे मूल्यमापन केले जाते. इंग्लंड मध्ये राष्ट्रीय आरोग्य योजनेचा खर्च सीमित ठेवण्यासाठी उपचारांची खर्च–परिणामकारकता मोजली जाते, पण उपचारकांची नाही. भारतात दोन्ही गोष्टी सध्या तरी अशक्य आहेत. उपचारकाची खर्च–परिणामकारकता या शब्दावस्न गैरसमज होण्याची शक्यता आहे. विमा कंपनीला व रुणालाही कमी परिणामकारक पण स्वस्त उपचारक अंतिमतः जास्त महाग पडतो. उपचारकाच्या मूल्यमापनात परिणामकारकताच जास्त महत्त्वाची. सारख्याच परिणामकारकतेसाठी कोणता उपचारक स्वस्त पडतो हे पाहिले जाते– -स्वस्ततेला प्राधान्य नाही!
(४) मेहनताना —- वैद्यकीय व्यवसायात जास्त अवघड काम करणाराला सर्वांत कमी मेहनताना असे उलटे गणित आहे, व त्यामुळे या व्यवसायात अनेक वैगुण्ये निर्माण झाली आहेत. प्राथमिक पातळीवरील सामान्य उपचारकाला (General Practitioner) सर्व वयांतील सर्व प्रकारच्या रोगांचे निदान व उपचार करावे लागतात. सर्दी-पडसे-खोकला, किरकोळ ताप-हगवण अशा नेहमीच्या रोग्यांच्या गर्दीतून सहसा न आढळणाऱ्या गंभीर रोगाचा सण नजरेतून निसटू नये म्हणून जागरूक राहावे लागते. मेंदूला जे माहीत नाही ते डोळ्याला दिसत नाही—- म्हणून दुर्मिळ रोगांची माहिती देखील डोक्यात ठेवावी लागते—-ती विसरू नये म्हणून, व वैद्यकातील नवीन प्रगती माहीत व्हावी म्हणून वाचन भरपूर वेळ करावे लागते. या सर्वांसाठी उच्च प्रतीची बौद्धिक क्षमता व व्यावसायिक बांधिलकी लागते. व या सर्वांसाठी सर्वांत कमी मेहनताना सामान्य उपचारकाला मिळतो.
द्वितीय व तृतीय पातळीवरील उपचारकांची विशिष्ट क्षेत्रातील तज्ज्ञता (Speciali-sation, Super Specialisation) जशी वाढेल, तसे ज्ञानाचे क्षेत्र अधिकाअधिक सीमित व अरुंद होत जाते, रोग्यांची संख्या कमी होते, आपापल्या अरुंद क्षेत्रांत जुनी माहिती झटकून ठेवणे व नवीन माहिती आत्मसात् करणे सोपे होते, वाचनही मर्यादित होते व तुलनेने कमी श्रमांत व कमी बुद्धिमत्तेत आपापल्या क्षेत्रात पुढारलेले राहणे शक्य होते. जशी विशिष्टता वाढेल तसे काम सोपे होते, पण मेहनताना वाढत जातो.
या काम-मोबदला असंतुलनातून वैद्यकीय व्यवसायातील दोन दुखण्यांचा उगम होतो—-एक म्हणजे जास्त अवघड व जास्त बुद्धिमत्ता लागणाऱ्या कामाकडे कमी बुद्धिमान व्यक्ती जातात, सोप्या कामाकडे अधिक बुद्धिमान. दुसरे दुखणे म्हणजे प्रथम पातळीवरील उपचारक आपल्याला मिळणाऱ्या मोबदल्यावर असंतुष्ट असल्याने सण पाठवण्यासाठी द्वितीय/तृतीय पातळीवरील उपचारकांकडून दलाली (कमिशन, कट पॅक्टिस) वसूल करू लागतात. द्वितीय/तृतीय पातळीवरील उपचारक (विशेषतः त्यांच्या व्यवसायाच्या सुरवातीच्या काळात) पाठवलेल्या रुणांवर पूर्णपणे अवलंबून असल्याने त्यांना दलाली द्यावीच लागते. नंतरच्या काळात, नाव झाल्यावर, सण सीधे त्यांच्या-कडे येऊ लागतात व त्यांना दलाली न देणे परवडते/शक्य होते. ते जर संस्थांमध्ये काम करत असले तर त्या संस्था व्यापारी तत्त्वावर काम करत असतात, व राजरोस, हिशेबात दाखवून दलाली देतात. [हे दलालीचे एक स्पष्टीकरण आहे—-पुष्टीकरण (पाठिंबा) नाही, तसेच एकमेव कारण नाही. द्रव्यलालसा हे देखील महत्त्वाचे कारण आहेच.]
(५) किंमती —- वाढती स्पर्धा व खुला बाजार यामुळे औषधे व इतर उपचार यांच्या किंमती कमी होत नाहीत. तसेच उपचारक आकारत असलेल्या फीची रक्कम कमी होत नाही. कारण या दोन्ही बाबतीत खरी खुली स्पर्धा होऊ शकत नाही. उपचारक औषधे लिहून देतो—-म्हणजे विशिष्ट बँडची औषधे घ्या म्हणून सांगतो, त्यावेळी औषधाची किंमत रुण देत असतो. त्यामुळे उपचारकाला कमी किमतीचे औषध थोडा त्रास घेऊन निवडण्यामध्ये रस नसतो—- त्याला त्याबद्दल काहीही बक्षीस (incentive) मिळत नसते. उलट महाग औषधे लिहिणारा तो जास्त चांगला उपचारक या समाजातील समजुतीमुळे स्वस्त औषधे लिहिणारा तो कमी दर्जाचा उपचारक असे ठरून त्याचे नुकसानच होण्याची शक्यता असते.
तसेच उपचारकाची निवड करताना उपचारकाची गुणवत्ता ठरवण्यासाठी लागणारी माहिती (त्याने उपचार केलेल्या सणांची संख्या, त्यातील बरे झाले त्यांची संख्या, व त्यासाठी आलेला एकूण खर्च यांची तुलनात्मक आकडेवारी) सणाला काय, कोणालाच मिळत नाही. स्वतःची योग्य रीतीने जाहिरात करणारा तो उत्तम उपचारक असेच म्हणावे लागते. स्वस्त पण चांगली औषधे विकत घेण्याचे स्वातंत्र्य रुणांना असत नाही. द्वितीय–तृतीय पातळीवरील उपचारक निवडण्याचे काम बऱ्याच वेळा कौटुंबिक डॉक्टरच करतो—-नाहीतर सांगोवांगीवर, श्रद्धेवर अवलंबून उपचारक निवडावा लागतो.—-म्हणजेच उपचारक निवडण्याचे स्वातंत्र्यही रुणाला प्रत्यक्षात नसते. त्यामुळे वाढत्या स्पर्धेचा फायदा सणाला मिळत नाही—-स्पर्धा वाढूनही किंमती वाढतच राहतात, व किंमतीचा गुणवत्तेशी संबंध राहतोच असे नाही. गुणवत्तेला अधिक किंमत मिळत नसल्याने गुणवत्ताही वाढत नाही.
(६) व्यवस्थापन व एकांडेगिरी :– बहुतेक सुधारलेल्या देशांमध्ये उपचारक स्वतःची रुणालये चालवत नाहीत. चर्चेस, सेवाभावी संस्था, विद्यापीठे, राज्यशासन, स्थानिक स्वराज्यसंस्था किंवा व्यापारी तत्त्वावर चालणाऱ्या कंपन्या रुणालये चालवतात. त्यामुळे उपचारकाची रुणालय–व्यवस्थापनाची डोकेदुखी, भांडवल उभारणी, कर्जफेड, गि-हाईक मिळवणे वगैरे अ-वैद्यकीय जबाबदाऱ्या यांपासून सुटका होते. पुरेशा सुविधा व पुरेसा नोकर वर्ग, (well equipped and well-staffed) असलेल्या सणालयात इतर सहकारी उपचारकांच्या बरोबर काम करण्यामुळे अभ्यासू (Academic) वातावरण तयार होते. संशोधन करण्यास सुविधा व वेळ मिळतो, शिकवता येते, शिकता येते, ठराविक वेळी काम, ठराविक इमर्जन्सी ड्युटी, दिवसातून काही वेळ कामापासून पूर्ण मुक्तता, निवांतपण (leisure), वैद्यकीय परिषदा व अभ्यासक्रम यांसाठी रजा यांमुळे ही व्यवस्था उपचारकांना सुखकारक व आनंददायी असते. अर्थात् अतिमहत्त्वाकांक्षेला आळा घालावा लागतो, सहकार्य करावे लागते, व्यवस्थापनाशी जुळवून घ्यावे लागते.
प्रत्येक उपचारकाला स्वतःची अशी तांत्रिक सामुग्री—-क्षकिरण यंत्रे, सी आर्म, लॅबोरेटरी, इ.सी.जी. मशीन्स्, ऑपरेशन थिएटर व त्यातील सामुग्री बाळगावी न लागल्याने एकंदर समाजाचा या सामुग्रीवरील खर्च कमी होतो, व ही सामुग्री पूर्णपणे पूर्णकाळ वापरली जाते व त्यामुळे त्यावरील प्रतिरुण खर्च कमी होतो. पण त्याच वेळी नोकरवर्गात पहारेकरी, व्यवस्थापक, कारकून, इतर सपोटींग नोकरवर्ग अशी भर पडून प्रतिरुण नोकरांची संख्या व त्यांवरील खर्च यात खूप वाढ होते व अंतिमतः ही मोठी सणालये खाजगी लहान स्रणालयांपेक्षा थोडी महागच पडतात. ती स्वस्त करण्यासाठी देवस्थाने चर्चेस, राज्यशासन, स्थानिक स्वराज्य संस्था यांना अनुदान द्यावे लागते, किंवा व्यक्तींकडून दान म्हणून किंवा मृत्युपत्राद्वारे निधि उपलब्ध करून द्यावा लागतो.
अशा मोठ्या रुणालयांच्या बाह्य रुण विभागांमार्फत काही प्रमाणात प्राथमिक पातळीवरील वैद्यकीय सेवा देता येते, तरीही विखुरलेल्या सामान्य उपचारकांची कौटुंबिक उपचारकांची गरज राहतेच. अशा कौटुंबिक उपचारकांनी ४ ५ जणांनी एकत्र येऊन उपचार केन्द्रे चालविल्यास अनेक फायदे होतात—-प्रत्येकाला काही प्रमाणात कामाचे विशेषीकरण करता येते—-म्हणजे एकाने लहान मुलांचे काम जास्त करायचे. एकाने त्वचारोगांमध्ये जास्त रस घ्यायचा. एकाने मधुमेह–रक्तदाब–हृदयरोग यांचा जास्त अभ्यास करायचा वगैरे. या कामाच्या/अभ्यासाच्या विशेषीकरणाचा फायदा उपचारक व सण दोघांनाही होतो. दुसरे म्हणजे क्लार्क, नर्स, वगैरे मदतनीस वर्ग ठेवून त्यांचा खर्च विभागून घेता येतो. तिसरे म्हणजे आजारपण, सहल, वैद्यकीय परिषदा यासाठी रजा घेतल्यावर रुणांची त्याच ठिकाणी उपचाराची सोय चालू राहते. अत्यवस्थ रुणांवर तात्पुरते प्रथमोपचार करतानाही एकाच्या जागी दोन– तीन उपचारक उपलब्ध असल्यास फायदा होतो. इमर्जन्सी ड्यूटी वाटून घेऊन रात्रीची शांत झोप मिळवता येते. त्याच ठिकाणी प्राथमिक तपासण्या (Investigations) व लहान सहान ऑपरेशनस् (ऑफिस प्रोसीजर्स) करणे मदतनीस व अधिक सोई असल्याने शक्य होते, त्यासाठी सणांना इतरत्र पाठवण्याची गरज राहत नाही, व सणांची धावपळ कमी होते.
(७) उपचारक-रुण संबंध —- मानवी शरीराची घटना व कार्यपद्धती, आजाराची विविध कारणे, त्यांमुळे होणाऱ्या शरीरातील बिघाडांची विविधता, औषधे व इतर उपचार आणि त्यांना शरीर देत असलेला प्रतिसाद,
आजाराचे कारण असलेल्या किंवा आजारामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक अवस्था या सर्वांमुळे व इतर अनेक घटकांमुळे वैद्यकशास्त्र इतके व्यामिश्र व अयांत्रिक (Complex and Non–mechanical, Non linear) झाले आहे की त्याचे शिक्षण घेण्याचा व उमेदवारीचा कालावधी इतर अभ्यासक्रमांच्या तुलनेने प्रदीर्घ असतो व एक उपचारक तयार करण्यासाठी समाजाला करावी लागणारी गुंतवणूक व उपचारकाला स्वतःला खर्च करावा लागणारा कालावधी, कष्ट व पैसा जास्त असतात. त्यामुळे कोणत्याही समाजात उपचारक तुलनेने दुर्मिळ व अधिक किंमती’, महाग राहणारच. रुण व डॉक्टर यांच्यामध्ये त्या विषयातील ज्ञान, वेळेची कमतरता व बऱ्याच वेळा आर्थिक स्थिती यामध्ये प्रचंड तफावत असते आणि ती कायमच राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत उपचारक-रुण संबंध कायमच विषम राहतात. ते दोन समान व्यक्तींमधील संबंध राहत नाहीत. भारतात तर रुणांना बऱ्याच वेळी उपचारकाबद्दल एकाच वेळी भीती वाटते व त्याच वेळी नको इतकी श्रद्धा उपचारकावर असते. इतकी तफावत, विषमता असलेल्या दोन व्यक्तींमधील संबंध निरोगी राहणे अवघड असते. सबळ व्यक्ती कळत–नकळत या विषमतेचा फायदा उठवण्याची शक्यता असते. तर दुर्बल व्यक्ती बऱ्याच वेळा निमूटपणे अन्याय सहन करत असली तरी काही वेळा त्याच्या असंतोषाचा स्फोट–वैयक्तिक किंवा सामूहिक रीत्या होण्याची शक्यता असते. हा स्फोट बरेचदा अयोग्य वेळी, अयोग्य जागी, अयोग्य प्रसंगी, व अयोग्य व्यक्तीच्या/संस्थेच्या विरुद्धही होण्याची शक्यता असते. अशा अयोग्य स्फोटांमुळे उपचारकांना नंतर कायमच असुरक्षित वाटत राहते, व उपचारक–रुण संबंध अधिकच बिघडतात.
म्हणून उपचारक व सण यांच्यातील विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रुणाने साक्षर होणे, सुशिक्षित होणे, आपले शरीर, नेहमी होणारे आजार, व त्यांची कारणे, प्रथमोपचार यांबद्दलची प्राथमिक माहिती मिळवणे, आपल्याला असणाऱ्या आजाराविषयी अधिक विस्तृत माहिती मिळवणे व अखेर उपचारकाबद्दल भीति, श्रद्धा किंवा फाजील आदर न बाळगणे हे या प्रयत्नांमधील महत्त्वाचे टप्पे आहेत.
उपचारक-रुण संबंधात रुणाचे समर्थन करण्यासाठी, त्याच्या बाजूने वजन पाडण्यासाठी आरोग्य विमा कंपन्या महत्त्वाची कामगिरी बजावू शकतात. रुणावरील उपचार कमीकमी वेळात, जास्तीत जास्त परिणामकारकतेने व कमीत कमी खर्चात होणे हे आरोग्य विमा कंपन्यांच्या फायद्याचे असल्याने त्या दोन सणालयांची किंवा दोन उपचारकांची खर्च-कार्यक्षमता अजमावतात व त्यांपैकी खर्च-कार्यक्षम रुणालया-कडेच किंवा उपचारकाकडेच विमाधारकांना पाठवतात. तसेच कोणत्या तपासण्या खर्च-कार्यक्षम आहेत, व कोणत्या निव्वळ परंपरा म्हणून केल्या जातात याची पाहणी करून कार्यक्षम तेवढ्याच तपासण्यांचे पैसे देतात. औषधांची/उपचारांचीही तशीच तपासणी करून अनावश्यक/खर्चिक उपचार-औषधे यांना पाठिंबा देत नाहीत. एकंदरीत व्यापारी तत्त्वावरील रुणालये, उपचारक व औषधकंपन्या या बलाढ्य त्रयीविरुद्ध लढण्यास त्या रुणाच्या बाजूने उतरतात, व त्याचा रुणास फायदाच होतो. याशिवाय ग्राहक संरक्षण कायदाही सणाचे उपचारकांच्या निष्काळजीपणापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न करतो.
(८) उपचारांचा वाढता खर्च —- विशेषज्ञांची फी, महाग व वारंवार कराव्या लागणाऱ्या तपासण्या, सुसज्ज व चकचकीत स्रणालयाचा वाढता प्रतिदिन खर्च, महाग औषधे व इतर उपचार यांमुळे वैद्यकीय खर्च सर्वसामान्यांना न परवडणारा असतो, व तरीही करावा लागतो. समाजाच्याच वाढत्या सरासरी वयामुळे व बारीक सारीक साथीच्या व जंतुजन्य आजारांचे प्रमाण कमी झाल्यामुळे गंभीर आजारांचे प्रमाण वाढले आहे व त्यांच्यासाठी जास्त दिवस जास्त महाग उपचार करावे लागतात. स्थानिक, राज्य व केन्द्र-प्रशासने निर्धन झाल्यामुळे सार्वजनिक आरोग्य-सेवेचे प्रमाण व दर्जा वाढणे अशक्य दिसते. अशा परिस्थितीत आरोग्य-विमा हे एकमेव उत्तर दिसते. धोक्यात (At risk) असणाऱ्या अनेकांनी सहकार्याने प्रत्यक्ष आजारी पडणाऱ्या व्यक्तीचा खर्च भागवणे म्हणजेच विमा. वर पाहिल्याप्रमाणे विमा कंपनी उपचारांचा खर्च मर्यादेत ठेवण्याचा आणि अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करू शकते.
अंतिम आजारामध्ये योग्य वेळी उपचार थांबवण्याचा किंवा मुळात उपचार सुख्च न करण्याचा निर्णय घेणे फक्त खर्चाच्या दृष्टीनेच शहाणपणाचे असते असे नाही.
धर्मादाय ट्रस्टनी चालवलेली सणालये वाढत्या खर्चापासून आपल्याला संरक्षण देतात. अशी रुणालये चालू करणे व चालू असलेल्या सणालयांना स्वयंसेवा, देणग्या व मृत्युपत्र यांद्वारे मदत करणे हे सुजाण नागरिकांचे कर्तव्यच आहे.
गोषवारा
१. उपचार, उपचारक व उपचारपद्धती यांचे मूल्यमापन करणे अवघड असले तरी ते केले पाहिजे.
२. प्रथम पातळीवरील सामान्य उपचारकाचे काम जास्त अवघड व महत्त्वाचे असते. त्याला अधिक मोबदला मिळावा. सामान्य उपचारकांनी ग्रुप प्रैक्टिस चालू केल्यास ते त्यांना व सणांना अधिक समाधान देईल.
३. वैद्यकीय खर्च भागवण्यासाठी व मर्यादेत ठेवण्यासाठी आरोग्यविमा प्रत्येकाने घ्यावा, व धर्मादाय रुणालयांना मदत करावी.
४. कोणत्याही व्यवस्थेचे निर्भेळ चांगले परिणाम होणार नाहीत. ग्राहक संरक्षण कायदा, आरोग्य-विम्याचे वाढते महत्त्व यांचे देखील काही वाईट परिणाम असणारच. त्यासाठी जागरुकता व व्यवस्थेचे पुनः पुनः परीक्षण, व त्यानुसार सुधारणा यांची आवश्यकता आहेच. कोणत्याही व्यवस्थेचे गैरव्यवस्थापन होऊ शकते. तरी झोपी जाणे समाजाला परवडणारे नाही.
२५, नागाळा पार्क, कोल्हापूर — ४१६ ००३