तापलेल्या आणि धूळभरल्या डांबरी रस्त्यावर एका स्त्रीचा, गीताबेनचा, नग्नदेह पडला आहे. तिचे कपडे जवळच अस्ताव्यस्त पडले आहेत. अंतर्वस्त्रांपैकी एक वस्तू तिच्यापासून फुटाभरावर आहे, तर दुसरी तिच्या डाव्या हाताने जिवाच्या आकांताने धरली आहे. तिचा डावा हात आणि धड हे रक्ताळले आहेत. धडावर खोल जखमा आहेत. डाव्या मांडीवर रक्त आहे आणि घोट यावर एक पैंजण. प्लास्टिकच्या चपला शेजारी आहेत. चित्राच्या मध्यावर एक वेडावाकडा, लाल, द्वेषभरला विटेचा तुकडा आहे—-बहुधा तिच्या मारेकऱ्यांनी तिचा अंत घडवायला वापरलेला.
गीताबेन अमदाबादेत २५ मार्चला दिवसाढवळ्या मारली गेली, तिच्या घराशेजारील एका बस-थांब्याजवळ. सध्या गुजरातेवर राज्य करणाऱ्या हिंदू अलगतावाद्यांच्या नजरेत ती हिंदू होती. तिचे महत्पाप म्हणजे तिने एका मुस्लिमावर प्रेम केले होते. संघ-परिवाराचे जमाव त्याला मारायला आले तेव्हा त्याला पळण्याचा अवसर मिळावा म्हणून ती मध्ये उभी ठाकली होती.
सिद्धार्थ वरदराज
[१९ एप्रिलच्या टाइम्स ऑफ इंडियातील सिद्धार्थ वरदराजनच्या ‘द मास्क इज ऑफ : अ टेल ऑफ टू हिंदूज’ या लेखावरून. टाइम्सची संपादकीय टिप्पणी अशी : . . . तिने पंतप्रधान वाजपेयींपेक्षा जास्त धैर्य दाखवले.’]