चोरांची एकाधिकारशाही
. . . कोणास ठाऊक, कोण लुटारू त्याच्या डोळ्याच्या कोषातून सारे काही खोदून घेऊन गेले आणि त्याच्या नकळत त्याच्या विचार-कोषात एक नियंत्रक मशीन बसवून गेले. परिणामी बाहेस्न चेहेरा तसाच दिसतो पण मेंदूत चित्रविचित्र विचार घिरट्या घालत राहतात. लुटारू आजकाल या देशाच्या बहुसंख्य डोक्यांचे नियंत्रण करत आहेत. याचा परिणाम म्हणून नियंत्रित माणसे देश आणि देशवासीयांना इजा पोचवणारे विचार करतात, आचरण करतात आणि वर स्वतःला सचोटीचे आणि विवेकी समजतात. सारे काही लुटारूंच्या मनासारखे घडते. लुटारूंचा हेतू एकच आहे, शोषितांच्या गोटात कधी हिंसात्मक किंवा सशस्त्र प्रतिकार दिसूच नये, आणि हिंसेचा आणि शस्त्रे बाळगण्याचा अधिकार फक्त शासकांनाच असावा.
महाश्वेता देवीं
[महाश्वेता देवींच्या अक्लांत कौरव (नई दिल्ली १९८१) या कादंबरीतून, गुजरातच्या पार्श्वभूमीवर ‘द्रष्टे’ वाटलेले हे चित्रण.]