खेल खेल में दोन ‘गणिती’ कहाण्या सांगतो.
गणिताचे एक प्राध्यापक फळ्यावर एका सूत्रापासून दुसरे एक सूत्र सिद्ध करत होते. एका टप्प्यावर ते म्हणाले, “यावरून हे उघड आहे की . . .”, आणि त्यांनाच त्या टप्प्याच्या उघडपणाबद्दल (obviousness) शंका आली. फळा सोडून, टेबलखुर्ची गाठून त्यांनी वीसेक मिनिटे कागदावर काही गणित केले. शेवटी आनंदून उठत ते म्हणाले, “हो! ते उघड आहे!”
दुसरी कहाणी आहे, श्रीनिवास रामानुजन् इंग्लंडात होता तेव्हाची. रामा-नुजनचा गुरु जी. एच. हार्डी याने त्याला काही व्याख्याने ऐकायला पाठवले. व्याख्याता काही नवे निष्कर्ष ‘जाहीर’ करत होता.
मासिक संग्रह: एप्रिल, २००२
परिवर्तन: उन्नत मानवतेकडे झेप
प्रस्थापित व्यवस्थेचा इतका जबरदस्त पगडा समाजातील सर्वांवर—सामान्य जनांवर आणि त्यांच्या नेत्यांवर— असतो की ही सर्व मंडळी प्रस्थापित रीती व मूल्यांप्रमाणे वागत असताना, त्यातील दोष व चुका त्यांना दिसत असूनही, तो रुळलेला मार्ग सोडायला तयार होत नाहीत. प्रस्थापित व्यवस्थेमध्ये माणसे इतकी गुंतून राहण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण असे की त्या व्यवस्थेने मान्य केलेल्या सुख-कल्पना, त्या कल्पनांतील सुखप्राप्तीची साधने/मार्ग आणि एकंदर जनरीती/जगरहाटी यांच्याशी सर्व माणसे एकरूप झालेली असतात. दुर्योधन भरसभेमध्ये द्रौपदीचा विनयभंग, तिची विटंबना करीत असता सारे पांडव आणि भीष्म-द्रोणादी त्याविरुद्ध आवाज उठवीत नाहीत याचे कारण त्यांनी— सर्वांनीच स्वीकारलेली प्रस्थापिताशी बांधिलकी, गुलामी!
वैसार्थ
ब्रह्म, ब्रह्मज्ञान व ब्रह्मसाधना या तीन्हीसाठी ‘परमार्थ’ हा शब्द संत वापरतात. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ व अर्थ म्हणजे ज्ञेय वस्तू. म्हणून अनंत ज्ञेय वस्तूंमधील सर्वोत्कृष्ट वस्तू शोधून काढणे हाच परमार्थ. ब्रह्म किंवा आत्मा ही सर्वोत्कृष्ट वस्तू आहे म्हणून त्याचे ज्ञान म्हणजेच परमार्थ (दासबोध दशक १ समास ९). ब्रह्म कधी न ढळणारे अनंत, स्थिर आहे. ते कल्पनारहित आहे. ब्रह्मांडात ब्रह्मासारखे दुसरे काही नाही. केवळ सद्गुरूपदेशाने त्याचे ज्ञान होते व ते अनुभवावे लागते, वर्णन करिता येत नाही. (दासबोध दशक ७ समास २)
आत्म्याच्या प्रथम संकल्पनेसाठी ब्रह्म ही कल्पना प्रथम वैदिक काळात रुजू झाली.
आरक्षणाबद्दलचे गैरसमज आणि वास्तविकता
श्री दिवाकर मोहनी आपल्या लेखात (आ.सु. नोव्हेंबर, २००२) जातीनिहाय आरक्षणाचे पाऊल अर्थकारणाच्या दृष्टीने चुकीचे ठरले की काय अशी शंका घेण्यास (आज) पुष्कळ जागा आहे असे सांगून आरक्षणामुळे कोणतेही उत्पादन न करता व किंवा केलेच तर दुय्यम, तिय्यम दर्जाचे कस्न हक्क म्हणून मिळवावयाची रक्कम असे त्याला स्वरूप आले व परिणामी देशाचा नैतिक दर्जाच घसरला असे म्हणतात. श्री मोहनी यांच्या ह्या निष्र्कषानिमित्ताने आरक्षणाच्या वस्तुस्थितीवर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने या लेखाची गरज भासली व म्हणूनच लिहिण्याची तसदी घेतली आहे.
आरक्षणामुळे काही दलित/आदिवासी सरकारी कर्मचारी आपल्या कामात कामचुकारपणा कस्न ‘मुर्गी-चोरी’ सारखे छोटे गुन्हे करीत असतील असे जरी कबूल केले तरी त्यांचे हे गुन्हे इतर उच्चपदस्थ अधिकारी, जे बहुधा उच्चवर्णीयच असतात, ह्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारांच्या मोठ्या देशद्रोही गुन्ह्यांच्या प्रमाणात किती-तरी क्षुल्लक आहेत.
अभयप्रतिज्ञा
आजचा सुधारक हे मासिक गेली बारा वर्षे नागपूरहून अत्यंत निष्ठेने प्रसिद्ध केले जात आहे. ‘विवेकवादा’ला– – रॅशनॅलिझम’ला—वाहिलेले मासिक असे या मासिकाचे वर्णन करता येईल.
आजचा सुधारकच्या फेब्रुवारीच्या अंकात ‘माझी प्रतिज्ञा’ या नावाचा अभय विष्णुकांत वैद्य यांनी एक लेख लिहिलेला आहे. १ डिसेंबर १९९८ रोजी केलेली ही ‘भीष्मप्रतिज्ञा’ वाचून मी थक्क झालो. त्यांच्या ‘प्रतिज्ञे’चे पहिले वाक्य असे आहे–खालील अटींचे पालन झाले नाही तर अभय वैद्य त्या लग्नावर बहिष्कार
टाकेल:
(१) पत्रिका न बघता लग्न ठरलेले असावे. (२) मूहूर्त न बघता लग्नाचा दिवस ठरलेला असावा.
पर्यायी विकासनीतीची ओळख
नर्मदा बचाव आंदोलनाच्या निमित्ताने चर्चिल्या गेलेल्या अनेक प्रश्नांबरोबर पर्यायी विकासनीतीचा उल्लेख बऱ्याच वेळा केला जातो. प्रचलित विकासनीतीसंबंधाच्या असमाधानातून पर्यायी विकासनीती गेली कित्येक वर्षे मांडली जात आहे. पर्यावरण-वाद्यांचे एक नवीन फॅड आहे’ ह्या मतापासून ‘पर्यायी विकासनीती’ हीच शाश्वत विकासनीती आहे आणि त्याशिवाय तरणोपाय नाही ह्या मतापर्यंत ह्या संबंधात अनेक मते मांडली जातात. पण पर्यायी विकासनीती म्हणजे काय? ह्याचे साकल्याने विवेचन अपवादात्मकच दिसून येते. श्री दिलीप कुलकर्णी ह्यांनी ही उणीव ‘वेगळ्या विकासाचे वाटाडे’ (राजहंस प्रकाशन जाने. २००१, पृष्ठसंख्या १४८, मूल्य १२०/- रु.) ह्या पुस्तकाद्वारे भरून काढली आहे.
भारतीय तत्त्वज्ञान आणि आपले जीवन
माझ्या मित्राचा भाऊ मुंबईला असतो. ५९ वर्षाचा आहे. बी.ए. झाला आहे. नेव्हीत ११ वर्षे नोकरी, त्यानंतर १५ वर्षे मुंबईला नामांकित खाजगी कंपनीत सिक्युरिटी ऑफिसर म्हणून नोकरी व सध्या लेबर कॉन्ट्रक्ट घेणे, व एका कंपनीसाठी मुदत ठेवी गोळा करणारा एजंट म्हणून काम करणे—असा आतापर्यंत विविध प्रकारचा अनुभव गाठीस आहे. स्वतःचे घर आहे. बायको स्वतःच्या वेगळ्या जागेत दुकान व पैसे व्याजाने देण्याचा उद्योग करते, मुलगा चांगल्या नोकरीवर. अशा रीतीने आर्थिक स्थिती चांगली आहे.
११ वर्षांपूर्वी अपघाताने जखम झाल्याने मधुमेह व रक्तदाब हे विकार लक्षात आले.
धिस फिशर्ड लँड : लेख १
विवेक आणि उधळेपणा
[माधव गाडगीळ आणि रामचंद्र गुहा यांचे ‘धिस फिशर्ड लँड : अॅन इकॉलॉजि-कल हिस्टरी ऑफ इंडिया’ (ऑक्स्फर्ड इंडिया पेपरबॅक्स, १९९२) हे पुस्तक भारताची सद्यःस्थिती समजून घेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. अत्यंत शिस्तबद्ध संशोधन-पद्धती, प्रचंड आवाका आणि अनेक विषयांची सांगड घालण्याची लेखकांची हातोटी, हे स्तिमित करणारे आहे. या पुस्तकाचा संक्षेप करून काही लेखांमधून तो आ.सु.च्या वाचकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. खरे तर पूर्ण पुस्तक मराठीत यायला हवे—-मल्याळममध्ये केरळ शास्त्र साहित्य परिषदेने ते मागेच नेले आहे. पण त्रोटक स्पात तरी त्याला मराठीत आणू या.
चोरांची एकाधिकारशाही
चोरांची एकाधिकारशाही
. . . कोणास ठाऊक, कोण लुटारू त्याच्या डोळ्याच्या कोषातून सारे काही खोदून घेऊन गेले आणि त्याच्या नकळत त्याच्या विचार-कोषात एक नियंत्रक मशीन बसवून गेले. परिणामी बाहेस्न चेहेरा तसाच दिसतो पण मेंदूत चित्रविचित्र विचार घिरट्या घालत राहतात. लुटारू आजकाल या देशाच्या बहुसंख्य डोक्यांचे नियंत्रण करत आहेत. याचा परिणाम म्हणून नियंत्रित माणसे देश आणि देशवासीयांना इजा पोचवणारे विचार करतात, आचरण करतात आणि वर स्वतःला सचोटीचे आणि विवेकी समजतात. सारे काही लुटारूंच्या मनासारखे घडते. लुटारूंचा हेतू एकच आहे, शोषितांच्या गोटात कधी हिंसात्मक किंवा सशस्त्र प्रतिकार दिसूच नये, आणि हिंसेचा आणि शस्त्रे बाळगण्याचा अधिकार फक्त शासकांनाच असावा.
पत्रसंवाद
केशवराव जोशी, तत्त्वबोध, नेरळ (रायगड) — ४१० १०१
तुम्ही पान ४१५ वर मृतकांची बाबरीनंतरची आकडेवारी मागितली आहे म्हणून हा पत्रप्रपंच करीत आहे. सर्व कमिशननी हिंदूनाच दोषी धरले आहे.
सुरवातीलाच एक स्पष्ट करितो की आम्ही बाबरी मशीद पाडण्याच्या विरुद्ध आहोत. आम्ही बाबराची अवलाद नाही. राजवाडे, पोतदार, पगडी, खरे शेजलकरांचे अनुयायी आहोत आणि जे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात शिकवितात तेवढेच आम्ही मान्य करणार. “आयोध्येला राम जन्मला” व “बाबराने देऊळ पाडले’ असे इतिहासात शिकवत नाहीत.
“श्रीकृष्ण अहवालात’ पान २७ वर माहिती दिली आहे ती अशी आहे:
“मुंबईत डिसेंबर ९२ व जानेवारी ९३ मध्ये ९०० जण मेले.