इंग्लंड आणि वेल्समधील रोमन कॅथलिक चर्चचे एक पुढारी गुरुवारी (६ सप्टेंबर २००१) एका मनमोकळ्या भाषणात म्हणाले की ब्रिटनमध्ये ख्रिस्ती धर्म जवळपास पराभूत झाला आहे.
बुधवारी (५ सप्टेंबर २००१) वेस्टमिन्स्टरचे आर्चबिशप कार्डिनल कॉर्मक मर्फी-ओकॉनर म्हणाले की आता शासनयंत्रणा व जनता यांच्या जीवनावर ख्रिस्ती धर्माचा कोणताही प्रभाव नाही. वाट चुकलेले (lapsed) कॅथलिक अश्रद्ध लोक व तरुण यांच्यापर्यंत ख्रिस्ती धर्म नेण्यास आता क्रांतिकारक पावले टाकायला हवी. टाईम्सच्या वृत्तानुसार कार्डिनल म्हणाले की आता सरकार व जनता यांच्या जीवनांना, सामाजिक व्यवहारांना आणि नैतिक निर्णयांना ख्रिस्ती धर्म पार्श्वभूमी पुरवत नाही. ते असेही म्हणाले की ख्रिस्ताची जागा संगीत, ‘न्यू एज’ व्यवहार, गूढविद्या-व्यवहार (occult practices) आणि पर्यावरण समस्या घेत आहेत. लोकांना अतिशायी (transcendent) विश्वाचे दर्शन देण्याची क्रिया आज या नव्या मार्गांनी होत आहे. गेल्या वर्षी चर्च ऑफ इंग्लंडचे आर्चबिशप ऑफ कैंटरबरी डॉ. जॉर्ज कॅरी म्हणाले होते की ब्रिटनमध्ये अघोषित (tacit) निरीश्वरवाद आहे. मर्फी-ओकॉनर कॅरींचीच री ओढत होते. ते असेही म्हणाले की कॅथलिक धर्मगुस्करवी झालेल्या बालकांशी दुर्वर्तनाच्या (child abuse) घटनांमुळे चर्चला लज्जित व्हावे लागून नुकसान झाले आहे. लहान मुलांच्या छळाच्या घटनांची धर्मगुरूंना पुरेशी माहिती नव्हती, आणि त्याबद्दलच्या आरोपांची गंभीरपणे दखलही घेतली गेली नाही.
अडुसष्ट वर्षीय मर्फी–ओकॉनरांची नियुक्ती गेल्या वर्षी पोप जॉन पॉल (द्वितीय) यांनी केली. अनेकांच्या मते ते उदारमतवादी व सुधारणावादी आहेत.
[रॉयटर्ज वृत्तसंस्थेच्या लंडन वार्ताहराने दिलेली ही बातमी आ.सु.चे सल्लागार सुभाष आठले यांनी पाठवली आहे.
१. धार्मिकता मानवी समाजातून नष्ट होऊ शकत नाही, आणि ती नेहेमी सत्प्रवृत्तीकडे नेते, या दोन ठासून मांडल्या जाणाऱ्या मतांचे फोलपण ही बातमी दाखवते. धर्माला ‘पर्याय’ म्हणून येणाऱ्या बाबींमध्ये संगीत आणि पर्यावरणी चळवळी येतात, हेही लक्षणीय आहे.
२. पण एक शक्यता अशीही वाटते की कार्डिनल ‘ख्रि चॅनिटी खतरे में है’ चा नारा ‘लगावत’ आहेत! ११ सप्टेंबर २००१ च्या घटनांनंतर उपजलेल्या पा चात्त्य देशांमधील असुरक्षिततेच्या भावनेतून या नाऱ्याला प्रतिसादही मिळेल, व मग सध्याच्या घटना ‘खऱ्या अर्थाने क्रूसेड-जिहाद-धर्मयुद्ध ठरतील. मग खरा खलनायक श्रद्धावाद आहे, हे आपल्याला कडू अनुभवांमधून दिसत राहील.
— संपादक