“तुम्ही स्वतःला दोन गटांमध्ये विभागून घ्या. एकात मुस्लिम, दुसऱ्यात हिंदू, म्हणजे आपापल्या मृतांची तुम्हाला काळजी घेता येईल”, भोपाळचे आयुक्त रणजित सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना म्हणाले. हे विद्यार्थी गॅस दुर्घटनेनंतर मदत करायला आले होते.
आयुक्तांच्या सूचनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटली. एका विद्यार्थ्याने विचारले, “अशा वेळी हिंदू आणि मुसलमानांत काही फरक असतो का?” दुसरा म्हणाला, “हे घडू देणारा देव तरी असतो का?” आयुक्त नंतर म्हणाले, “मी एकाएकी खूप क्षुद्र झालो. मला त्यांचे कोणत्या भाषेत आभार मानावे हेच कळेना.”
[डॉमिनिक लापिएर आणि जेवियर मोरो यांच्या “इट वॉज फाईव्ह मिनिट्स पास्ट मिडनाईट इन भोपाल” (फुल सर्कल, २००१) या पुस्तकातून.]