[‘साम्ययोग साधना’ (१६ मे २००१) या नियतकालिकातील हा लेख आ. सु. त सुरू असलेल्या विचारमंथनाचा भाग वाटला, म्हणून तो त्यांच्या सौजन्याने येथे घेत आहे. हा लेख मोहनींच्या लेखाला उत्तरादाखल लिहिलेला नाही. (तिरपा टाइप आ. सु. च्या संपादकाचा)]
१९०८ मध्ये गांधींच्या मनात चरख्याची कल्पना पहिल्यांदा आली. गिरण्या उभ्या राहिल्या तर विणकरांचे काय होईल, हा प्रश्न मनात उभा झाला आणि गांधी हातकताईच्या शोधात लागले. एका महिला कार्यकर्तीने गुजराथमध्ये विजापूरला कताई जाणणाऱ्या मुसलमान भगिनींचा शोध लावला आणि कताईचा जन्म झाला. १९१५ मध्ये गांधी प्रथम विणकर झाले.
मासिक संग्रह: ऑगस्ट, २००१
नैतिक उपपत्तींचे दोन प्रकार
नीतिशास्त्राच्या इतिहासाकडे थोड्या बारकाईने पाहिल्यास त्यातील नीतिशास्त्रीय व्यवस्थांचे किंवा उपपत्तींचे स्थूलमानाने दोन प्रकार आढळून येतात. त्यांना अनुक्रमे empirical आणि transcendental अशी नावे देता येतील. empirical म्हणजे अनुभववादी आणि transcendental म्हणजे अतिक्रामी. अनुभववादी उपपत्ती अर्थातच पंचज्ञानेंद्रिये आणि मन यांच्यावर आधारलेली; आणि अतिक्रामी म्हणजे सामान्य अनुभवांखेरीज अन्य ज्ञानस्रोतांवर विश्वास ठेवणारी. या दुसऱ्या वर्गातील उपपत्तीत intuition (साक्षात्कार)१ या ज्ञानसाधनाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो, उदा. goodness किंवा साधुत्व हा काही इंद्रियगोचर गुण नव्हे. तो जाणण्याकरिता अनेंद्रिय साक्षात्काराची आवश्यकता असते. तसेच कर्तव्याची कल्पनाही अनेंद्रिय साक्षात्काराशिवाय आकलन करणे अशक्य आहे.
नीती ही मानवनिर्मितच
“इतिहासाचे सर्व विद्यार्थी राजवाडे या अनुभवी संशोधकाला ओळखतातच. काही जणांना वाटते की अस्तित्वात असलेली सर्व नीतीची तत्त्वे अनादि अनंत आकाशातून उतरलेली आहेत आणि येणाऱ्या अनंत काळातही तशीच राहतील. त्यांना ही नीतीची तत्त्वे मोडणे ही गुन्हेगारी क्रिया वाटते. अशा लोकांना (राजवाड्यांचे लिखाण वाचून) जाणवेल की नीतीसुद्धा मानवी सर्जनशीलतेतून व उत्क्रांतीच्या इच्छेतून उपजलेली एक ‘वस्तू’ आहे, एखाद्या पटाशी किंवा सुरीसारखीच. राजवाड्यांच्या शोधितांबद्दलचे आमचे निष्कर्ष आम्ही राखून ठेवतो, कारण आमचे त्यांच्याशी बरेच मतभेद आहेत.”
[कॉ. श्री. अ. डांगे यांनी सोशलिस्ट या इंग्रजी मासिकाच्या मे-जून १९२३ या अंकात लिहिलेली ही टीप भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या ग्रंथाच्या इंग्रजी ‘धारावाहिक’ प्रकाशनाची प्रस्तावना आहे.