“इतिहासाचे सर्व विद्यार्थी राजवाडे या अनुभवी संशोधकाला ओळखतातच. काही जणांना वाटते की अस्तित्वात असलेली सर्व नीतीची तत्त्वे अनादि अनंत आकाशातून उतरलेली आहेत आणि येणाऱ्या अनंत काळातही तशीच राहतील. त्यांना ही नीतीची तत्त्वे मोडणे ही गुन्हेगारी क्रिया वाटते. अशा लोकांना (राजवाड्यांचे लिखाण वाचून) जाणवेल की नीतीसुद्धा मानवी सर्जनशीलतेतून व उत्क्रांतीच्या इच्छेतून उपजलेली एक ‘वस्तू’ आहे, एखाद्या पटाशी किंवा सुरीसारखीच. राजवाड्यांच्या शोधितांबद्दलचे आमचे निष्कर्ष आम्ही राखून ठेवतो, कारण आमचे त्यांच्याशी बरेच मतभेद आहेत.”
[कॉ. श्री. अ. डांगे यांनी सोशलिस्ट या इंग्रजी मासिकाच्या मे-जून १९२३ या अंकात लिहिलेली ही टीप भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या ग्रंथाच्या इंग्रजी ‘धारावाहिक’ प्रकाशनाची प्रस्तावना आहे. डांग्यांनी त्याच ग्रंथाच्या मराठी आवृत्तीत ती पुन्हा नोंदली. (लोकवाङ्मय गृह, मुंबई, १९९४).]