उन्हाळा सुरू झाला की नागपूरकर रोजच्या वृत्तपत्रातले तापमानाचे आकडे आदराने वाचतात —- जसे “४५ होते काल!” असाच काही लोकांना वर्षभर ‘पाहावासा’ वाटणारा आकडा म्हणजे सेन्सेक्स हा शेअरबाजारासंबंधीचा निर्देशांक. तापमानात जसे फॅरनहाईट-सेल्सियस प्रकार असतात तसे शेअरांमध्येही सेन्सेक्स-निफ्टी प्रकार असतात, आणि ‘दर्दी’ लोक त्यांच्या तौलनिक विश्वासार्हतेवर वाद घालत असतात. मुळात शेअरबाजार देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती दाखवतो का, आणि निर्देशांकांचे चढउतार अर्थव्यवस्थेच्या तब्येतीचे चढउतार दाखवतात का, हे दोन्ही प्र न भरपूर वादग्रस्त आहेत. पण दूरान्वयाने तरी हे निर्देशांक अर्थव्यवस्थेच्या अगदी मर्यादित अंगांबद्दल काही तरी सांगतात.
मासिक संग्रह: जुलै, २००१
पत्रसंवाद
न. ब. पाटील, अ-३७, कमलपुष्प, वांद्रे रिक्लमेशन, मुंबई — ४०० ०५०
सृष्टिज्ञान मासिक ७३ वर्षांचे झाले. मराठी विज्ञान परिषदेनेही पस्तिशी ओलांडली. विज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावे हेच ह्या दोघांचेही उद्दिष्ट आहे. मागे वळून पाहण्याच्या उद्देशाने त्या दोन्ही संस्थांनी संयुक्तपणे पुण्यात एक छोटासा मेळावा दि. १९ व २० मे २००१ रोजी आयोजित केला होता. या प्रसंगी ‘विज्ञान वाङ्मय निर्मिती’ या विषयावर एक चर्चासत्र आयोजले होते. एका सत्रार्धाचे अध्यक्षत्वही मी केले. दि. १९ रोजी दुपारी १२.३० वाजता हे चर्चासत्र सुरू झाले. पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र आणि संपादन विभागाचे निवृत्त विभाग प्रमुख प्रा.
मला आस्तिक व्हायचे आहे
परमेश्वर आहे की नाही हा वाद बहुधा हजारो वर्षांपासून सुरू असावा आणि पुढे किती वर्षे चालू राहील हे त्या परमेश्वरालाच ठाऊक! किंवा, तो नसला तर, कुणास ठाऊक हे कुणास ठाऊक! त्यामुळे ज्या वादांतून काहीही निष्पत्ती होणे शक्य नाही, अशा वादांत हा वाद अग्रणी धरला जावा. ईश्वर नसल्याबाबतचे लाखो पुरावे, कारणे आणि शास्त्रीय मीमांसा नास्तिकांतर्फे दिल्या जातात. परंतु तितकेच अनुत्तरित प्रश्नही आस्तिकांकडूनही उपस्थित केले जातात. प्रथमतः दोनही पक्ष आपापली बाजू हिरिरीने मांडायला सुरुवात करतात, पुढे या वादाचे स्पांतर ‘श्रद्धा विरुद्ध चिकित्सा’ अशा वादात होते .
आय प्रेडिक्ट : डॉ. गोवारीकरांचे भारतीय लोकसंख्येबद्दलचे भाकित
डॉ. वसंत गोवारीकरांच्या ‘एक्स्प्लोअरिंग इंडियाज पॉप्युलेशन सिनॅरिओ’ ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती जानेवारी ९२ मध्ये प्रकाशित झाली. सुधारित दुसरी आवृत्ती जुलै ९३ मध्ये प्रकाशित झाली. डॉ. गोवारीकर महाराष्ट्राच्या चांगल्या परिचयाचे आहेत. भारतीय अवकाश संशोधन संघटनेच्या विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे प्रमुख, भारत सरकारचे विज्ञान-तंत्रज्ञान सचिव (१९८६-९१), पुणे विद्यापीठाचे कुलगुरू अशी अनेक पदे त्यांनी भूषवली आहेत. मौसमी पावसाची प्रक्रिया आणि हवामानाचे दूरदृष्टीचे भाकित वर्तवण्याबाबत त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले आहे.
विज्ञान, लोकसंख्या आणि विकास याबद्दलच्या त्यांच्या पुस्तकावर लोक-संख्यातज्ञांची प्रतिक्रिया मिश्र स्वरूपाची होती. राष्ट्रसंघाने त्यांना त्यांची मते तपशिलात मांडायला सांगितली, ज्यातून ‘द इनेव्हिटेबल बिलियन प्लस’ हा ग्रंथ घडला.
अमेरिकेत आ.सु. वाचकांशी हृदयसंवाद
आधी अमेरिकेत येणे झाले तेव्हा आजचा सुधारकचे चार वर्गणीदार होते. त्यातली एक माझी मुलगी आणि इतर तीन पद्मजा फाटकांनी मिळवून दिलेले. त्यांपैकी दिलीप फडणीस म्हणाले, चार आहेत त्यांचे चाळीस करू. त्यांना एकत्र आणू. एकत्र यावे हा विचार मनात होताच. Summit ला राजेन्द्र मराठे असतो. त्याच्याजवळ बोललो. (इथे एकेरी संबोधायला वेळ जावा लागत नाही. फारशी जवळीक लागत नाही, आपलीच जीभ रेटत नाही. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत.) आजचा सुधारक च्या वाचक-हितचिंतकांची पहिली सामूहिक गाठभेट झाली ती Summit लाच राजनकडे, सप्टेंबर १२, १९९८ ला. त्यावेळी आणि नंतरच्या पाठपुराव्यामधून वर्गणीदारांची संख्या ऐंशीवर गेली.
सनातन भूल
पृथ्वीवरील इतर देशांबद्दल मला फारशी माहिती नसल्याने त्यांच्या बाबतीत काही विधान करीत नाही. पण भारत या माझ्या देशाची मला जी माहिती आहे तीवरुन माझी अशी समजूत झाली आहे की या देशाच्या प्राचीन रहिवाशांवर एक मोठी भूल पडली. प्रारंभी यांची संख्या थोडी होती. पण कालांतराने ती वाढत गेली. लेखनकला भारतीयांना अवगत झाल्यापासून या भूलग्रस्तांची संख्या वेगाने वाढत गेली आणि मुद्रणकला अवगत झाल्यानंतर तो वेगही वेगाने वाढत गेला असावा. १९ व्या व २० व्या शतकात त्या वेगावर थोडी मर्यादा पडली पण एकूण भारतीयांची संख्याच वेगाने वाढू लागल्याने त्या सनातन भुलीच्या प्रभावाखालील जनलोक वाढतच राहिले.
खादी (भाग ३)
गरज आणि उत्पादन
खादीग्रामोद्योगप्रधान समाजरचनेमुळे खेड्यापाड्यांमधला पैसा खेड्यांतच राहतो, तो शहरांत जात नाही आणि पैसा खेड्यांतच खेळल्यामुळे शहरे त्यांचे शोषण करू शकत नाहीत अशा जो एक समज आहे —- आणि हा समज विकेन्द्रित अर्थव्यवस्थेचे म्हणजे खादीग्रामोद्योगांचे समर्थन करण्यासाठी वापरला जातो —- तो आता तपासून पाहू. तसे करताना पैसा म्हणजे काय आणि शोषण कशामुळे होते हे आपणापुढे स्पष्ट होईल अशी आशा आहे.
ग्रामीण प्रदेशात मुळात पैशांचा उपयोग फार थोडा असतो. पैशांशिवायच बराचसा व्यवहार पार पडतो. धान्याची किंवा इतर वस्तूंची देवाणघेवाण करून आपले आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याचा प्रघात फार प्राचीन आहे.
चौथ्या क्रांतीचे शिल्पकार नररत्न मुरली मनोहर जोशी!
युगायुगाच्या अंधकारानंतर भारतवर्ष पुन्हा एकवार सूर्यासमान तळपणार! देशात दुधाची गंगा वाहणार! अन्नधान्य, फळफळावळांची रेलचेल असेल. समस्त जनता धष्टपुष्ट आणि सुखी समाधानी असणार. रोगराईची निशाणी उरणार नाही. डॉक्टर मंडळी इतर क्षेत्रांत कौशल्याचा ठसा उमटवतील. चौसष्ट कलांमधून आपलाच ध्वज दिसेल. ऑलिंपिकची सगळी सुवर्ण पदके आपल्यासाठीच असतील. बकाल सिलिकॉनच्या व्हॅलीत स्मशान शांतता आणि ऐश्वर्याने नटलेल्या गंगेच्या खोऱ्यात जाल तेथे सोन्याचा धूर दिसेल. कुबेराला लाजवणारी आपली समृद्धी पाहून जगातले शास्त्रज्ञ, विद्वान रोजगारासाठी आपल्याकडे याचना करतील. अमेरिका, जपानमधील भारतीय दूतावासाबाहेर रांगा लागतील. ते पाहून एकेकाळची धनाढ्य राष्ट्र मनात जळफळाट करून घेतील.
आम्हाला विचारत का नाहीत?
एका गोष्टीचा मात्र जरूर विचार करायला हवा. आपल्या मुलांच्या आयुष्यासंदर्भातल्या ह्या महत्त्वाच्या निर्णयात आपलं स्थान काय? राजकारणी आणि सरकार यांच्या ताब्यात मुलांचे भवितव्य सोपवून नि िचंत रहाणं योग्य ठरेल का? आपल्याला केवळ कल्पनांचे पतंग नको आहेत. आपल्या मुलांसाठी आनंदाचं आणि चांगलं शिक्षण जर खरोखर हवं असेल तर आपल्यासाठी नेमकं काय भलं, काय नाही हे समजावून घेण्यासाठी आपण समर्थ व्हायला हवं. शासनाची भूमिका, त्यावर तज्ज्ञांनी नोंदवलेल्या प्रतिक्रिया यांचं आपल्या अनुभवांच्या कसोटीवर घासून वि लेषण करायला हवं, त्या समजावून घ्यायला हव्यात. अशा प्रकारच्या अभ्यासासाठी आवश्यक असणारी, विशेषतः सरकारच्या धोरणांसंदर्भातली माहिती सहजी उपलब्ध होत नाही.