शशिकांत हुमणे, १२, राजीव सह-गृहनिर्माण संघटना, बांद्रा-कुर्ला संकुल, मुंबई — ४०० ०५१
एप्रिल महिन्यात १४ तारखेला डॉ. आंबेडकरांचा जन्मदिवस येतो. त्यानिमित्त एक जुने शुभेच्छापत्र पाठवीत आहे, ज्यात डॉ. आंबेडकरांचे मौलिक विचार आहेत. हे विचार एप्रिलच्या अंकाच्या मुख्यपृष्ठावर छापावे, तसेच नोबेल प्राईझविजेता इलियास कॅनेटी याचे त्याच पत्रातील विचार मे च्या अंकाच्या मुख-पृष्ठावर छापावे.
“ते” आणि “आपण’ हे हिंदुधर्मातील संपूर्ण जातीजमातींचे नाजुक दुखणे आहे. जातीशिवाय हिंदू किंवा हिंदुधर्म नाही. आणि हिंदूंशिवाय जगात इतरत्र कुठेही जाती-वेडेपणा व जाती-मत्सर उपलब्ध नाही. जातीच्या संसर्गरोगाची लागण मुस्लिम आणि ख्रि चन धर्मीयांनाही झाली असल्यास नवल नाही, परंतु या पापाचे धनी सुद्धा हिंदू आणि हिंदुधर्मच आहेत असे खेदाने म्हणावे लागते.