मासिक संग्रह: ऑक्टोबर , २०००

पत्रसंवाद

सेक्युलॅरिझम् (धर्मनिरपेक्षता) शब्द प्रथम कोणी वापरला?
‘सेक्युलॅरिझम्’ या संकल्पनेच्या आशयाबद्दल वेगवेगळे विचारप्रवाह आहेत आणि म्हणूनच १५० वर्षापूर्वी हा शब्द प्रथम वापरला गेला तेव्हापासून आजतागायत या विषयावर अविरतपणे चर्चा चालू असते.

१८५० साली हा शब्द पहिल्या प्रथम वापरणाऱ्या जॉर्ज जेकब हॉलयोकचा जन्म १८१७ साली, इंग्लडमधील बर्मिंगहॅम या शहरात झाला. तरुण वयात त्याची धर्मावर अढळ श्रद्धा होती. धर्मप्रसारकांच्या सभा-बैठकांमध्येही तो सामील होत असे, एवढेच नव्हे तर या श्रद्धेप्रीत्यर्थ आवश्यक असणारा खर्चही तो स्वतःच्या खिशातून करीत असे. या त्याच्या कार्यातून त्याची बढती झाली, आणि १८३६ मध्ये म्हणजे वयाच्या १९ व्या वर्षी तो दर रविवारी प्रवचनेही करू लागला.

पुढे वाचा