(२२ मे २००० च्या ‘टाईम’ साप्ताहिकाचे सूत्र आहे ‘व्हिजन २१ — आपले काम, आपले जग.’ या अनुषंगाने लिहिलेल्या लेखांमध्ये एक लेख अमर्त्य सेन यांचा आहे, ‘विल देअर बी एनी होप फॉर द पुअर?’, नावाचा. या वाक्यातील काळाबाबतचे व्याकरण मजेदार वाटले —- “आशा ‘असेल’ का?’, असा प्रश्न आहे, “आहे का?” असा प्रश्न नाही ! सेन यांचा लेखही ठामपणे आशावादाला थारा देणारा नाही.)
प्रगती होते आहे की नाही हे तपासायला तुटवड्यांचा विचार करणे, तुटवड्यातली घट मोजणे, हे गर्भश्रीमंतीत होणाऱ्या वाढीच्या विचारापेक्षा जास्त चांगले. म्हणून भविष्य समजून घेण्यासाठी गरिबांचे जीवन कितपत नीटपणे व्यतीत होईल हे समजून घेणे आवश्यक आहे. “आहे का गरिबांसाठी काही आशा?”, या प्रश्नाचे उत्तर द्यायसाठी गरीब कोण हे समजायला हवे. काही प्रकारची गरिबी उघड असते. किंग लियर जिला ‘लूपड अँड विंडोऽड रँगेडनेस’ म्हणाला, तसली गरिबी ‘जाहीर’ असते. (हा फाटक्या कपड्यांचा उल्लेख आहे, आपल्या ‘चंद्रमौळी झोपडी’ सारखा). पण अनेक प्रकारचे तुटवडे असू शकतात, केवळ आर्थिक दारिद्र्यच नव्हे, हे लियरही जाणत होताच. गरिबीच्या निदानात आपण हुकुमशाही देशांच्या नागरिकांना नाकारले जाणारे नागरी हक्क आणि राजकीय स्वातंत्र्य यांचाही विचार करायला हवा. आफ्रिका आणि आशियातल्या पुरुषसत्ताक समाजातल्या दबलेल्या आणि सोशिक गृहिणी, शिक्षणाची संधीच नाकारली गेलेली निरक्षर मुले, बहुमताच्या सुलतानीपुढे आवाजही न उठवू शकणारे अल्पमतातले गट, ‘सुव्यवस्थे’च्या रक्षकांनी तुरुंगात डांबून छळवादात ठेवलेले भिन्न मतांचे लोक, या साऱ्यांना आपण समजून घ्यायला हवे.
ज्यांचा गरिबीच्या व्याख्येची व्याप्ती वाढवायला विरोध असतो त्यांना मुद्दे सोपे आणि नेमके (कोते, ‘अस्द’) ठेवायचे असतात. “रोजी एकदोन डॉलर्सपेक्षा कमी उत्पन्न किती जणांचे आहे?”, असल्या कोत्या वि लेषणातून गरिबांचे मोजमाप करणे, त्यांच्या संस्थेबद्दल सरधोपट भाकिते वर्तवणे, असे ‘सवंग’ प्रकार करता येतात. पण गरिबी अनेकांगी असते. राजकीय स्वातंत्र्ये नसलेले लोक, मग ते गरीब असोत की श्रीमंत, हे जीवनाच्या चांगुलपणातील एक मूलभूत घटकाला मुकलेले असतात. निरक्षरता, आरोग्यसुविधांचा अभाव, स्त्रिया–मुलींना ‘कमी’ समजून वागवले जाणे, असल्या सामाजिक ‘तुटवड्यां’बद्दलही असेच म्हणता येते.
आणि आर्थिक, राजकीय आणि सामाजिक दारिद्र्यांमध्येही काही जुळले-पणा असतो. हुकुमशाहीची वकिली करणारे विचारतात, “राजकीय स्वातंत्र्य विकासाला मदत करते का?” इथे राजकीय स्वातंत्र्य हाच विकासाचा एक घटक आहे, हे विसरले जाते. आणि या चुकीच्या प्रश्नाला चुकीचे उत्तरही दिले जाते, “ठोक देशांतर्गत उत्पादन (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट–जीडीपी) वाढीचे दर लोकशाही देशां-पेक्षा लोकशाही नसलेल्या देशांमध्ये जास्त असतात.” या वारंवार मांडल्या जाणाऱ्या श्रद्धेला (oft – repeated belief) प्रत्यक्ष व्यापक अभ्यासात कुठेही दुजोरा मिळत नाही. दक्षिण कोरियाने (हुकुमशाही पद्धतीने) जोरात विकास करून मग लोकशाही पुनःप्रस्थापित केली, हे बरोबर. पण (दक्षिण कोरियापेक्षा) कमी लोकशाही असलेल्या उत्तर कोरियात असे झाले नाही (कारण विकासाचा वेग वाढला नाही). (उलट) घाना व इथिओपिया या हुकुमशाही देशांपेक्षा लोकशाही असलेला बोट्स्वाना जास्त वेगाने विकसित झाला आहे. आणि जीडीपी–वाढीचा दर हा अर्थव्यवस्थेचा एकच महत्त्वाचा निर्देशांक नाही. राजकीय ‘उपासमारी’ कमी करण्याने त्या समाजाची आर्थिक उद्दिष्टे सोसायची ताकद नक्कीच वाढते. गरीब आणि दुबळ्यांना (the vulnerable) बोलायच्या संधी देणारे राजकीय व नागरी हक्क एकूण आर्थिक सुरक्षितता वाढवतात, असे भरपूर उदाहरणांतून दिसते. (जसे,) दुष्काळ नेहमी हुकुमशाही आणि सैनिकी अंमलाखालील देशांमध्येच पडतात. खुल्या लोकशाही देशांमध्ये एकही दुष्काळ पडलेला नाही, मग तो देश कितीका गरीब असेना. या उदहरणाने राजकीय स्वातंत्र्याचे सुरक्षिततेच्या बाबतीतले मूलभूत महत्त्व स्पष्ट होते. भारतीय लोकशाहीत अनेक दोष आहेत, पण तिच्या फायद्याच्या बाजूला स्वातंत्र्यानंतर एकही मोठा दुष्काळ न येऊ देणे, हे आहे. शेवटचा १९४३ चा दुष्काळ स्वातंत्र्याआधी चार वर्षे आला होता, आणि मी तो लहानपणी पाहिला आहे. याविरुद्ध चीन पहा. प्राथमिक शिक्षण, आरोग्यसेवा वगैरे अनेक बाबतीत भारताच्या बऱ्याच पुढे असलेल्या या देशाच्या इतिहासाला सर्वांत मोठा दुष्काळ १९५९-६२ मध्ये पडला, आणि त्याने सुमारे तीन कोटी माणसांचा बळी घेतला. आजही दुष्काळ भोगणारी उत्तर कोरिया, इथिओपिया आणि सुदान ही तीन्ही राष्ट्रे सैनिकी हुकुमशाही असलेली आहेत. लोकशाही दुष्काळांपासूनच रक्षण करते असे नाही. दक्षिण कोरिया आणि इंडोनेशियांना वेगवान विकास होत असताना तिथल्या गरिबांच्या मनात लोकशाहीचे विचार फारसे आले नसतील. पण या देशांना अडखळवणारी आर्थिक अरिष्टे आली, तेव्हा ज्यांची आयुष्ये ठेचकाळली अशा गरिबांना राजकीय — नागरी हक्क नाहीत, हे तीव्रतेने जाणवले. आज दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, थायलंड व इतरत्रही लोकशाही हा कळीचा प्रश्न झाला आहे.
लोकशाही स्वतःतच मूल्यवान आहे. ती नेहेमीच आर्थिक क्षेत्रात परिणाम-कारक नसतेही. पण आपत्ती पुढ्यात उभी ठाकली, की मग मात्र आर्थिक दुर्बलांना लोकशाही देत असलेल्या ‘आवाजा’ची गरज भासते. आशियातल्या (नुकत्याच निवळलेल्या) आर्थिक अरिष्टाचा धडा हाच की सामाजिक सुरक्षा — व्यवस्था (social safety-net), लोकशाही हक्क आणि (गरिबांचे) राजकीय प्रतिनिधित्व, यांना महत्त्व आहे. राजकीय दारिद्र्य (मात्र) आर्थिक दारिद्र्याला दुणावते. पूर्व आणि आग्नेय आशियाचा अनुभव असेही दाखवतो की सामाजिक दारिद्र्य हरवल्यास विकासाची फळे विस्तृतपणे चाखली जातात आणि आर्थिक विकासाला चालना मिळते. भारताची चूक फक्त बाजारपेठी संधींना दडपण्याची नव्हती तर विस्तृत निरक्षरतेसारख्या सामाजिक दारिद्र्याकडे दुर्लक्ष करण्याचाही त्यात मोठा भाग होता. भारताने जे पेरले ते उगवले, कारण भारताने उच्च शिक्षणावर दिलेल्या भरामुळेच आज तिथे जोमदार सॉफ्टवेअर उद्योग उभा आहे, आणि हा एक परिणाम आहे. पण (यासोबतच) अाअधिक लोकांना निरक्षरच ठेवणारे सामाजिक दारिद्र्य आर्थिक दारिद्र्यात परिणत झाले आहे. जर मी भविष्याबद्दल आशावादी असलोच, तर ते यामुळे की मला जगभर लोकशाहीची मागणी वाढताना दिसते. सोबतच सामाजिक न्यायाच्या आवश्यकतेची वाढती जाणीव दिसते. आशिया, लॅटिन अमेरिका, आफ्रिकेतही लोकशाहीला मुकलेले क्षेत्र नव्याने लोकशाहीकडे वळत आहे. भारत, बांगलादेश व इतरत्रही प्राथमिक शिक्षण, दोन्ही लिंगांच्या व्यक्तींना न्याय देणारे व्यवहार, वगैरेकडे जास्त लक्ष दिले जात आहे. (असा) माझा आशावाद ‘बिनशर्त’ नसून ‘सशर्त’ आहे. पण आपण गरिबीचा विचार व्यापकपणे आणि औदार्याने केला तरच गरिबांना आशा ठेवायला आधार मिळेल.
(सेन यांचे लिखाण थोडेसेच सुलभीकृत केलेले आहे. पण हे अंश वगळता व थोडी कंसांमधील पूरके वगळता हे भाषांतर शब्दश: केलेले आहे.)
अशा ग्रंथांना कमीत कमी उत्तम कादंबरीचा किंवा काव्याचा तरी दर्जा द्यावा. कादंबरी ही काल्पनिकच असते आणि तरीही इंग्रजीत एक म्हण आहे की “In history, only the names and dates are true; In literature, only the names and dates are untrue.”
इतिहासातल्या सनावळीवस्न आणि वंशावळींवरून आपल्याला समाजा-विषयी जितके ज्ञान होते त्यापेक्षा जास्त ज्ञान तत्कालीन कथा-काव्यांतून होते. त्यातून आपल्याला मानवी संवेदनांचे जास्त ज्ञान होते. आणि असे ज्ञान देणाऱ्या काही कलाकृती चिरंजीवी होऊन राहतात.
परवाच मी पसायदानाचे सगळे शब्द आठवण्याचा प्रयत्न करत होतो व पुन्हा पुन्हा म्हणून पाहत होतो. मी म्हणत असलेल्या शब्दांचा अर्थ माझ्या मुलाने विचारला (वय ४५, शिक्षण M. Tech.). मी अर्थ सांगितल्यावर तो एकदम म्हणाला : “काय grand idea आहे !’ या पसायदानात कोणतेही सत्य सांगितलेले नाही. कोणतेही नेमनियम घालून दिलेले नाहीत, कोणताही कायदा घालून दिलेला नाही, दुबळ्यांचे शोषण करण्याची कोणतीही व्यवस्था त्यात नाही. कर्मकांडावर किंवा धर्मशास्त्रावर, मनुस्मृतीवर करता येणारी टीका पसायदानावर करता येत नाही. अशा या grand idea वर लुब्ध होणे हा जर विवेकवादाच्या दृष्टीने गुन्हा असेल तर तो गुन्हा मी करत असल्याचे कबूल करतो.
या माझ्या गुन्ह्यामुळे झालेय काय की माझा नास्तिकपणा धार्मिक लोकांना सुद्धा बोचत नाही. १९५७ सालची गोष्ट. मी व माझे दोन मित्र भोपाळला एकत्र राहत होतो. आमच्यापैकी कोणीच धार्मिक प्रवृत्तीचा नव्हता. समोर आमचा एक दुबे नावाचा मित्र राहत असे. तो नियमित पूजा–पाठ करणारा. एक दिवशी आम्हाला म्हणाला की दोस्तांनो, तुम्ही तर नुसती मौजमस्ती करण्यातच वेळ घालवता. काही देवाधर्माचे कराल की नाही? की अगदी नास्तिक आहात? मी म्हटले अरे दुबे, देव आहे आणि देव नाही या म्हणण्यात मला तर काही फरक दिसत नाही. तो म्हणाला, असे कसे? मी म्हणालो, देव आहे म्हणणाऱ्या संतांना विचारले की देव कुठे आहे तर ते म्हणतात “तुझे आहे तुजपाशी.” देव कुठेतरी स्वर्गात बिर्गात आहे असे ते म्हणत नाहीत. नास्तिक तरी काय म्हणतो? कुठेतरी स्वर्गात किंवा देवळात देव आहे ही कल्पना तो अमान्य करतो. मग आस्तिकपणा आणि नास्तिकपणा यात भेद राहिला कुठे? मी माझे अस्तित्व अमान्य करतो आहे का?
हे संभाषण मी काही वर्षांनंतर नागपूरचे अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचे वेदान्ता-चार्य वैद्य आष्टीकर यांना सांगितले तेव्हा ते म्हणाले “पाटणकर, तुम्ही हे सर्व जर मनापासून म्हणत असाल तर तुम्हाला धर्म उत्तम समजला असे मी म्हणेन.” असेच अभिप्राय (एकदोन पराकोटीचे) मला इतरांनीही दिले आहेत.
या प्रतिक्रियांवरून मी असा निष्कर्ष काढतो की कर्मकांड, धर्मशास्त्र, अंधश्रद्धा यांच्यापलीकडे जाणारा एक खरा धर्म आहे याची धार्मिक लोकांनाही जाणीव आहे. कर्मकांडे, धर्मशास्त्रे वगैरे ज्यांनी तयार केली त्यांचा उद्देश दुर्बलांचे शोषण करण्याचा असेल पण या सीमांपलीकडे असणाऱ्या धर्माला ते दोष चिकटवता येत नाहीत.
या वेगळ्या धर्मांकडे मी सत्याचे निवेदन म्हणून पाहतच नाही. पण जीवनाची मूल्ये रसाळ पद्धतीने दाखवणारे एक चिंतन आहे असे मात्र म्हणतो. एखाद्या अजरामर कादंबरी इतके तरी मूल्य त्याला आहे असे पुन्हा एकदा म्हणतो.
डिफेन्स कॉलनी, दौंड, जि. पुणे